‘हिरोशिमा नागासाकी’च्या स्मरणार्थ पणजीत निदर्शने

0
90

जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉंब हल्ले करण्याची जी घटना घडली त्या घटनेला ६९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल ऑल इंडिया पीस ऍण्ड सॉलिडेअरीटी या संघटनेने येथील फेरीबोट धक्क्याजवळ निदर्शने केली. यावेळी बोलताना ख्रिस्तोफर फोन्सेका व ऍड्. सुहास नाईक म्हणाले की अण्वस्त्रांमुळे संपूर्ण जगाला मोठा धोका निर्माण झालेला आहे. हिरोशिमा व नागासाकीवर झालेला अण्वस्त्र हल्ल्यामुळे केवढा मोठा विद्ध्वंस झाला होता त्याची कल्पना संपूर्ण जगाला असल्याचे ते म्हणाले. भारताने अण्वस्त्रांच्या विरोधात भूमिका घ्यायला हवी, अशी मागणीही द्वयींनी यावेळी केली. पॅलेस्टाईनवर होणारे हल्ले निंदनीय असल्याचे फोन्सेका म्हणाले. ही सगळी हिंसा बंद व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. वरील संघटनेने फेरी धक्क्याजवळ दुपारी १२ ते १.३० या दरम्यान निदर्शने केली.