सरकारात सहभागाबाबत सेनेचा आज निर्णय

0
92

महाराष्ट्रातील भाजप सरकारात सहभागी होण्याबाबत शिवसेना आज निर्णय घेणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी काल उद्धव ठाकरे यांच्याशी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. सेनेला सरकारात यायचे असल्यास कोणत्याही पूर्वअटींशिवाय यावे, असे मत भाजपने व्यक्त केले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम विनामूल्य देणार असल्याचे काल शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील मुंबई क्रिकेट असोसिएशनने सांगितले.