सकारात्मक राजकारणाचे प्रतीक बना : मोदी

0
88

रालोआ खासदारांसोबत पंतप्रधानांचे चहापान
सकारात्मक राजकारणाचे प्रतीक बना असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या घटक पक्षांतील सर्व खासदारांना केले. पंतप्रधान बनल्यानंतर आपल्या पंतप्रधान निवासस्थानी आयोजित पहिल्याच अशाप्रकारच्या चहापानाच्या कार्यक्रमात मोदींनी रालोआ खासदारांशी संवाद साधला.‘स्वच्छ भारत’, ‘खासदार आदर्श ग्राम’, ‘जन धन’ अशा योजना देशभरात यशस्वी करण्यासाठी खासदारांनी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रात संभाव्य शिवसेना – भाजप युतीच्या पार्श्वभूमीवरही या चहापानास महत्त्व आले होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे केंद्रातील मंत्री अनंत गीते यांच्यासह सर्व शिवसेना खासदार उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी पंतप्रधानांनी खासदारांशी सरकारसमोरील विविध मुद्द्यांसंबंधी चर्चा केली तसेच त्यांची मते जाणून घेतली असे राजीव प्रताप रुढी यांनी सांगितले. संसदीय मंत्री वैकय्या नायडू यांनी समन्वयन केले. अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी ‘जन धन’ बाबत, मजूर मंत्री नरींदर सिंग तोमर यांनी मजूर सुधारांविषयी, ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांनी ‘आदर्श ग्राम योजनेविषयी’ सर्वांना माहिती दिली.