लाडली लक्ष्मीचे धनादेश तीन महिन्यात अर्जदाराकडे

0
74

सरकारच्या लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी येणार्‍या अर्जांवर आता लवकर म्हणजे तीन महिन्यांच्या आत प्रक्रिया पूर्ण होऊन धनादेश संबंधितांपर्यंत पोचत असल्याची माहिती महिला आणि बालक कल्याण खात्याचे संचालक विकास गावणेकर यांनी दिली.
या योजनेखाली आतापर्यंत १८ हजार युवतींना लाभ मिळाला आहे. ६ हजार अर्ज पडून आहेत. ते डिसेंबर अखेरपर्यंत निकालात काढले जातील, असे गावणेकर यांनी सांगितले. वरील योजनेसाठी सरकारने योग्य ती तरतूद केल्याचे ते म्हणाले. सुरुवातीच्या काळात अर्जांवरील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यापेक्षाही अधिक काळ लागत होता. आता काम सुरळीत होत असल्याचे त्यांनी सांगितले.