महालेखापाल अहवाल सनसनाटी नको : जेटली

0
94

महालेखापालांनी आपला अहवाल माध्यमांचे मथळे होण्याकरिता सनसनाटी बनवू नये असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘कॅग’ना सांगितले आहे. २ जी आणि कोळसा वाटप घोटाळ्यात संभावित नुकसानाचे मोठे आकडे ‘कॅग’कडून घोषित करण्यात आल्यानंतर हेच मत कॉंग्रेसने व्यक्त केले होते. लेखापालांनी काम करताना लक्षात ठेवले पाहिजे की ते यापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयाचे केवळ परीक्षण करीत आहेत. निर्णय घेताना व त्याच्या अंमलबजावणीत योग्य प्रक्रिया पाळली आहे का, एवढेच त्यांना पाहायचे असते, ‘ऑडीटर’ म्हणजे ‘ऍक्टिव्हिस्ट’ नव्हे, असे जेटली कॅग परिषदेत बोलताना म्हणाले.