बुखारींचे नवाज शरीफांना  निमंत्रण; मोदींना नाही

0
94

दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सयद अहमद बुखारी यांनी आपला १९ वर्षीय पूत्र शबान याला उत्तराधिकारी घोषित केले असून त्याच्या अभिषेकाच्या विधीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह अनेकांना निमंत्रणे देण्यात आली आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. २२ नोव्हेंबरला होणार्‍या ‘नबी शाही इमाम’पदाच्या अभिषेकासाठी मोदींना निमंत्रण दिलेले नाही कारण गुजरात दंगलींसाठी त्यांना मुस्लिमांनी अजून माफ केलेले नाही, असे बुखारी म्हणाले. गृहमंत्री राजनाथ सिंग, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, सोनिया व राहुल गांधी ही काही निमंत्रितांची नावे आहेत.