बाबूश, जेनिफरवर आरोप निश्‍चित

0
101

पोलीस स्थानक हल्ला प्रकरण
पणजी पोलीस स्थानकावरील हल्ल्याच्या प्रकरणी सांताक्रुझचे आमदार, बाबुश मोन्सेर्रात तसेच ताळगावचे आमदार जेनिफर मोन्सेर्रात व अन्य ३५ जणांविरुध्द म्हापसा येथील विशेष न्यायालयाने आरोप निश्‍चित केले. पुढील सुनावणी दि. १९ नोव्हेंबर रोजी होईल.२००८ सालातील या प्रकरणात पणजी पोलीस स्थानकावर हल्ला करून मोडतोड केल्याचा आरोप बाबूश, जेनिफर, तत्कालीन नगरसेवक टोनी रॉड्रीग्स व इतर ३७ जणांविरुद्ध होता. बाबूशने आरोपपत्रास आक्षेप घेतल्यानंतर विशेष कोर्टाने पुन्हा आरोपपत्र सादर करायला सांगितले होते. त्यानुसार कोर्टाने आरोप निश्‍चित केले.