फोंड्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस : १२ जणांना चावे

0
87

फोंडा येथे रविवारी व सोमवारी पिसाळलेल्या कुत्र्याने १२ लोकांना चावा घेतल्याने शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. सुमारे एका महिन्यानंतर अशी दुसरी घटना घडली आहे. यापूर्वी १८ लोकाना कुत्र्याने चावा घेतला होता. चंद्रकांत केरकर (७५) शांतीनगर-फोंडा यांच्यावर सकाळी ६ वा. कुत्र्याने हल्ला करून चार पाच ठिकाणी चावा घेतला. त्यांच्यावर आयडी इस्पितळात उपचार चालू आहेत. याच ठिकाणचे देवेंद्र प्रतापसिंग, रामचंद्र पास्वान, अमरेश शेट्टी, उषा वळवईकर, दिलीप पाल. कुर्टी येथील सुजाता पेडणेकर, जयंती कुर्टीकर, अनुराधा कुमारी, अक्षय कुमार व बोणबाग येथील देसराज यांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्यांनाही इस्पितळात नेऊन उपचार करण्यात आले.