दोन चोर्‍यांमध्ये ११ लाखांचा ऐवज पळविणार्‍या टोळीस अटक

0
99
म्हापसा व कोलवाळ येथील चोरी प्रकरणी पकडलेल्या चोरांसमवेत म्हापसा पोलिस निरीक्षक तुषार वेर्णेकर, रत्नाकर कळंगुटकर व इतर पोलीस (छाया : प्रणव फोटो)

म्हापसा, कोलवाळमधील चोरीचा मालही जप्त
म्हापसा पोलिसांनी येथील मार्केटमधील मोबाईलचे दुकान फोडून ४ लाख ५० हजार रुपयाचे किंमतीचे मोबाईल संच आणि मुशीर-कोलवाळ येथील राजाराम भट यांच्या घरातील मोबाईल, रोकड व लॅपटॉप व इतर वस्तू मिळून ६ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या वस्तू चोरणार्‍या चोरांच्या टोळीला अटक करून त्यांच्याकडील सुमारे ११ लाख रुपये किंमतीचा ऐवज ताब्यात घेतला. चुन्नी बेनकर नीसाद ऊर्फ सर्जू बेनकर नीसाद (२५), रा. नीसाय, मडगांव-मूळ उत्तर प्रदेश), रामचंद्र बेनकर नीसाद ऊर्फ सर्जू बेनकर नीसाद (१९), रा. डांगी कॉलनी म्हापसा मूळ उत्तर प्रदेश व फूलचंद ऊर्फ सर्जू बेनकर नीसाद (२१), रा. डांगी कॉलनी म्हापसा मूळ उत्तर प्रदेश) यांनी गेल्या १९ सप्टेंबर २०१४ रोजी रात्रीच्यावेळी म्हापसा पालिका बाजारपेठेतील चण्याच्या दुकानांच्या मागील बाजूला असलेल्या रांगेतील केवलपूरी गोस्वामी यांच्या मोबाईल दुकानांचे पुढील शटर्स वाकवून आत प्रवेश केला होता आणि आतील सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५८ मोबाईल संच दोन टॅबलेस्ट लंपास केली होती.
तर मुशरीवाडा- कोलवाळ येथील राजाराम भट व त्याच्या मित्राच्या घराच्या दाराची कडी मोडून आशिष हरमलकर (२०), रा. नागमळवाडा चिखली कोलवाळ), व सिध्देश ऊर्फ सिध्दू सुर्यकांत धारगळकर (२४), दाडाचीवाडी-धारगळकर) यांनी घरात शिक्षण २ लॅपटॉप, आयपॅड, एलसिडी, आयपॉड व डॉलर्स मिळून ६ लाख ५० हजार रुपयांचा माल पळविला होता. या पाचही जणांना म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे.
म्हापसाचे पोलिस निरीक्षक तुषार वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रत्नाकर कळगुंटकर, सदाशिव हन्सीकुट्टी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रत्नाकर कळगुंटकर, सदाशिव हन्सीकुट्टी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण सावंत, पोलिस केशव नाईक, आल्बीटो डिमेलो, सागर खोर्जुवेकर, अनंत च्यारी, विशाल नाईक, लक्ष्मीकांत नाईक, सुशांत चोपडेकर, दिनेश साटेलकर, रामा नाईक, फ्रॅन्की वाझ व तसेच श्रीराम साळगांवकर, सतीश सावंत, बाबी नाईक, अक्षय्य नाईक व गिरीश राऊळ, मॅलविन कार्दोज, हा तपास करून संशयितांना मुद्देमालसहीत गजाआड केले.