गोव्यात मद्यबंदी अशक्य : मिश्किता

0
84

मद्य हा गोव्याच्या संस्कृतीचा एक भाग आहे. ख्रिश्‍चन असो किंवा हिंदू असो त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणार्‍या स्वागत सोहळ्यांनाही मद्याचा वापर होत असतो. त्यामुळे गोव्यात त्यावर बंदी घालणे शक्यच नाही, असे प्रदेश भाजपचे प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिश्किता यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
केरळ सरकारने मद्यावर बंदी घालण्यासाठी आणलेल्या विधेयकावर प्रतिक्रिया विचारली असता, डॉ. मिश्किता यांनी वरील भाष्य केले. श्री रामसेनेवर बंदी घालण्यासाठी कायदा नाही. कायदा आणि सुव्यवस्था कोलमडू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून १४४ कलमाचा वापर करूनच अशा संघटनांना रोखणे शक्य असते.
या विषयावर राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांनी केंद्रीय कायद्याचा वापर करून श्रीरामसेनेवर बंदी घालण्याची माणगी केली होती. त्यावर त्यांचे लक्ष वेधले असता, खासदार नाईक यांना कायद्याचे अर्धवट ज्ञान आहे. त्यांनी आपल्या वकिलीचा वापर बेकायदेशीर कृत्यांसाठीच केल्याचे मिश्किता यांनी सांगितले.