एफसी गोवाला चाहत्यांचा उत्तम पाठिंबा

0
116
वास्कोच्या टिळक मैदानावर एफसी गोवाच्या खेळाडूंचा सराव पाहाण्यासाठी फुटबॉल चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. तर दुसर्‍या छायाचित्रात झिको यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करताना एफसी गोवाचे खेळाडू.

येत्या १२ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या पहिल्या हीरो इंडियन सुपर लीग (आयएसएल)मधील आठ संघापैकी एक असलेल्या एफसी गोवाला आतापासूनच चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. युवा व वयस्क दोन्ही वर्गातील चाहते एफसी गोवा संघाला पाठिंबा देत आहेत. त्यापैकी काहीजण फ्रान्सचा माजी फुटबॉलपटू रॉबर्ट पिरीस जो आर्सेनचा त्या काळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जायच्या त्याचे उत्कट चाहते आहेत. तर काहीजण आपल्या पदलालित्यामुळे आणि कोणत्याही पोझिशनवर खेळण्याचे सामर्थ्य असलेला सर्वांचा आवडता खेळाडू असलेला स्थानिक हीरो क्लिफर्ड मिरांडा, ड्रिबलिंग आणि फिनिशिंग कौशल्य असलेला एडगर मार्सेलेनो आणि आक्रमक मध्यपटू ऑलविन जॉर्ज यांचे चाहते आहेत. परंतु या सर्वांपेक्षा संघाचे प्रशिक्षक झिको यांचे ते चहेते आहेत.
या चाहत्यांनी एफसी गोवाचे खेळाडू सराव करीत असलेल्या वास्कोच्या टिळक मैदानावर दररोज मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आहेत.
२८ वर्षीय फुटबॉलपटू रायस मास्कारेन्हास याने यावेळी बोलताना सांगितले की, एफसी गोवा हा एक संतुलीत संघ आहे. संघात अनेक युवा खेळाडू आहेत, जे या खेळाप्रती समर्पित आहेत. त्यात त्यांच्या भाग्याची गोष्ट म्हणजे त्यांना झिको यांचे मार्गदर्शन लाभत आहे, असे तो म्हणाला.
मरेडिओऍक्टिव इंटरटेंटमेंटचे व्यवसायिक भागिदार आणि एक फुटबॉल प्रेमी रिचर्ड डायस यांनी एफसी गोवा संघाची लाईनअप अविश्वसनीय असून आपण आर्सेनेलचा फॅन आहे. त्यातच रॉबर्ट पिरीस आणि आंद्रे सांतोस यांचा संघात समावेश असल्याने त्याचा खेळ पाहणे हे आमच्यासाठी रोमांचक असेल. मी एफसी गोवाने सेझा फुटबॉल अकादमी आणि अंडर-१९ भारतीय संघाशी खेळलेले मित्रत्वाचे सामने पहिले. ते खरोखरच चांगले खेळले, असे डायस म्हणाला.
एक कलकार आणि माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू योलांडा सोझा एफसी गोवाची संघनिर्मिती ही एक चांगली संकल्पना आहे. त्यात झिको सारखे मोठे नाव त्यांच्या पाठिशी आणि त्यामुळे आम्हाला निश्‍चितच एक पाऊल पुढे जाण्यास मदत मिळेल, असे तिने सांगितले.
टिळक मैदानावर उपस्थित असलेल्या नोएल रॉड्रिगीज या ६५ वर्षीय वयस्क फुटबॉलप्रेमीने सांगितले की, मी माझ्या लहाणपणासून टिळक मैदानावर अनेक सामने बघितले आहेत. मी कधीच कल्पनाही केली नव्हती की, झिको किंवा रॉबर्ट पिरीससारखे खेळाडू गोव्यात येऊन आमच्या स्थानिक खेळाडूंना अशा स्पर्धांत खेळण्यासाठी प्रशिक्षण देतील.
गोवा एफसीचा पहिला सामना १५ ऑक्टोबर रोजी चेन्नेईन संघाशी होईल.