इमाम बुखारींना जाळण्याचा प्रयत्न

0
77

जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांना भेटण्यास दिले जात नसल्याने रागावून एका ३२ वर्षीय माथेफिरू युवकाने बुखारींना जाळण्याच्या इराद्याने त्यांच्यावर केरोसीनची बाटली फेकून मारण्याची घटना घडली.पश्‍चिम बंगालचा रहिवासी असलेल्या कमलाउद्दीन नामक या युवकाला नंतर सुरक्षा रक्षकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. इमाम ‘मगरीब’चा नमाज अदा करत असताना ही घटना घडली. भेटू न दिल्यामुळे तसे केल्याचे युवकाने पोलिसांना सांगितले.