भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्यास कारवाई : मुख्यमंत्री

मडगाव परिसरात सुमारे ४ हजार बिगर गोमंतकीय वेगवेगळ्या घरांमध्ये भाडेकरू म्हणून राहात असल्याचे आढळून आले आहेत. त्यांची पार्श्‍वभूमी कुणालाही माहीत नाही. या भाडेकरूंची संबंधितांनी पोलिसांना माहिती पुरविलेली नाही, नवा पोलीस कायदा आल्यानंतर यापुढे ओळख न ठेवता भाडेकरूना ठेवून घेणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
पोलीस खात्याला किमान हजारभर अतिरिक्त पोलिसांची गरज आहे. सरकारने ६०२ पोलीस शिपयांची भरती केली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पोलीस स्थानकांवरील पोलिसांची गरज भागविणे शक्य होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत एका प्रश्‍नावर सांगितले.
महनीय व्यक्तींच्या सुरक्षेसाठी असलेल्या काही पोलिसांना काढून त्यांना वाहतूक पोलीस विभागात पाठवून देण्याचा विचार आहे, असे ते म्हणाले. बॉम्ब निकामी करण्यासाठी प्रशिक्षण देऊन आणलेल्या काही पोलिसांनाही अन्य कामाची जबाबदारी दिली जाईल.

 

Leave a Reply