ब्रेकिंग न्यूज़

अन्न औषध प्रशासन देणार मिठाईवाल्यांना स्वच्छतेचे धडे

स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही काळजी न घेणार्‍या राज्यातील मिठाई तसेच अन्य अन्नपदार्थ विक्रेत्यांसाठी येत्या दि. १५ रोजी बांबोळी येथील अन्न आणि औषध प्रशासनाच्या सभागृहात कार्यशाळाचे आयोजन केल्याची माहिती संचालक सलीम वेलजी यांनी दिली.जनतेच्या आरोग्याचा विचार करून एफडीए वेळोवेळी वरील अन्न तयार करणार्‍या आस्थापनांची तपासणी करते. काही आस्थापन स्वच्छतेसंबंधीच्या नियमांचे पालन करीत नसतात. त्यांच्या विरुध्द वारंवार तक्रारी असतात अशा आस्थापनाच्या मालकांसाठी वरील कार्यशाळेचे आयोजन केले असून सुमारे शंभर जणांना त्यात सहभागी करून घेण्याचे ठरविले आहे, अशी माहिती वेलजी यांनी दिली. वरील कार्यशाळा आयोजित करण्यासाठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि मॅरिको लिमिटेड या कंपन्यांचे सहकार्य मिळाल्याचे ते म्हणाले.
दिवाळी सणाच्या निमित्ताने राज्यात मिठाईची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. त्यामुळे भेसळयुक्त मेवा व अन्य अपायकारक वस्तुंचा मिठाई बनविण्यासाठी गैरवापर केला जातो.
या पार्श्‍वभूमीवर जागृती म्हणूनच एफडीएने वरील उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. गणेश चतुर्थीच्या काळात राज्यातील अनेक आस्थापनांवर छापा टाकून भेसळयुक्त माल जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती.

 

Leave a Reply