Tag Archives: front

विनेश फोगाटला सुवर्ण

>> सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आशियाई खेळांमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गट कुस्तीत भारताच्या विनेश फोगाटने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत विनेशने जपानच्या इरी युकी या प्रतिस्पर्ध्यावर ६-२ अशी मात केली. या विजयासह विनेश आशियाई खेळांमध्ये कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू होण्याचा मान मिळविला. पहिल्या डावात विनेशने बेसावध असलेल्या जपानच्या प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्याचा प्रयत्न केला. विनेशचा ... Read More »

केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू

मुसळधार पाऊस व पुरामुळे आतापर्यंत ३५० पेक्षा जास्त जणांचा बळी गेलेल्या केरळमधील पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पॉप फ्रान्सिस यांनी आंतरराष्ट्रीय जनसमुदायाला केरळातील पूरग्रस्तांना मदत करण्याची हाक दिली आहे. शनिवारी केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० कोटींची मदत जाहीर केली होती. दरम्यान, पावसाचा जोर कमी झाला असून राज्य सरकारने रेड अलर्टची सूचना मागे घेतली आहे. महाराष्ट्र ... Read More »

१४ लाखांचे विदेशी चलन दाबोळी विमानतळावर जप्त

दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी केलेल्या कारवाईत एका विदेशी नागरिकांकडून चौदा लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा बंगळूरूहू दुबईला जाणार्‍या प्रवाशाकडे विदेशी चलन सापडले. कस्टम विभाग गोवाचे आयुक्त आर. मनोहर यांनी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी उशिरा रात्री बंगळुरू – गोवा – दुबई मार्गे जाणार्‍या एअर इंडिया (क्र. एआय- ९९३) विमानामधून बंगळुरूहून दुबईला जाणार्‍या एका विदेशी नागरिकांची झडती ... Read More »

६० हजार बायो शौचालये खरेदीच्या प्रक्रियेला गती

>> कचरा व्यवस्थापन महामंडळाची निविदा जारी >> २०१९ पर्यंत राज्य हगणदारी मुक्तीचे ध्येय गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने ६० हजार बायो शौचालयांच्या खरेदीसाठी निविदा जारी केली असून सरकारने डिसेंबर २०१९ पर्यंत राज्याला उघड्यावरील शौचापासून मुक्त करण्याचे ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या कामाला आता गती मिळणार आहे. गोवा राज्य विकासकामामध्ये आघाडीवर आहे. परंतु, देशपातळीवर गोवा राज्य हगणदारी मुक्तीमध्ये मागे आहे. राज्यात दोनच जिल्हे ... Read More »

बजरंगला गोल्ड

अंतिम फेरीत जपानच्या ताकातानी दायची याचा कडवा प्रतिकार ११-८ असा मोडून काढत भारतीय कुस्तीपटू बजरंग पूनिया याने भारताला १८व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात बजरंग पूनियाने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना उझबेकिस्तानच्या खासानोव सिरोजुद्दिन याचा पहिल्या फेरीत तांत्रिक वर्चस्वाच्या आधारे १३-३ असा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पूनिया प्रारंभी ०-३ असा पिछाडीवर पडला ... Read More »

महाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

Read More »

अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन

एका युगाची समाप्ती >> देशात ७ दिवसांचा दुखवटा >> आज गोव्यात सार्वजनिक सुटी >> आज संध्याकाळी अंत्यसंस्कार कविमनाचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले अजातशत्रू, धुरंधर, मुत्सद्दी राजकारणी तथा देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे प्रदीर्घ आजाराने येथील अ. भा. आयुर्विज्ञान महाविद्यालय इस्पितळात काल निधन झाले. प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे ९३ वर्षीय वाजपेयी गेल्या ९ आठवड्यांपासून या इस्पितळात दाखल होते. अखेर आजाराशी प्रदीर्घ ... Read More »

अटलबिहारी वाजपेयी गोवा भेटीवर आले असताना सूर्यास्ताचा आनंद लुटताना. Read More »

विश्‍वविजेता फ्रान्स अव्वल

>> फिफा क्रमवारी >> जर्मनीची १५व्या स्थानी घसरण विश्‍वविजेत्या फ्रान्सने १७२६ गुणांसह काल गुरुवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत पहिले स्थान मिळविले आहे. पहिल्याच फेरीत आव्हान आटोपलेल्या माजी विजेत्या जर्मनीची १५व्या स्थानी घसरण झाली आहे. १५ जुलै रोजी फ्रान्सने कोरियाचा ४-२ असा पराभव करून विश्‍वविजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर फिफाने प्रथमच क्रमवारी जाहीर केली आहे. वादग्रस्त ठरलेली जुनी पद्धत बदलताना फिफाने नवीन पद्धतीचा ... Read More »

पणजी-मडगाव महामार्गावर चार तास वाहतूक का

>> सततच्या प्रकारामुळे प्रवाशांत संताप; तातडीने उपायाची मागणी गेल्या काही दिवसांपासून पणजी-मडगाव महामार्गावर ‘मेगा ब्लॉक’ होऊ लागलेला असून काल सोमवारी या मेगा ब्लॉकने कळस गाठला. काल या महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ खोळंबल्याने मडगावहून पणजीच्या दिशेने येणार्‍या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे पणजीहून मडगावच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीतपणे चालू होती. मात्र मडगावहून येणारी वाहने तब्बल चार ... Read More »