आढावा बैठकीत मंत्री डावलतात

>> विरोधी पक्षाच्या आमदारांच्या तक्रारी राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर विविध तालुक्यांतील स्थितीची पाहणी करून सरकारला अहवाल देण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे ते मंत्री घेत असलेल्या बैठकांना आम्हांला आमंत्रित केले जात नाही, अशा विरोधी पक्षांच्या आमदारांच्या तक्रारी आहेत. ज्या ज्या मंत्र्यांना ज्या ज्या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे, ते मंत्री तालुक्यातील अधिकार्‍यांबरोबर बैठका घेऊ लागलेले ... Read More »

विकास दुबेला साथ देणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना बेड्या

कुख्यात गँगस्टर विकास दुबेशी असलेल्या संबंधांप्रकरणी कानपूर पोलिसांनी बुधवारी चौबेपूर पोलीस ठाण्याचे एसएचओ विनय तिवारी आणि उपनिरीक्षक के. के. शर्मा या दोघांना अटक केली. विकास दुबेवर आठ पोलिसांची हत्या केल्याचा आरोप आहे. उत्तरप्रदेश पोलिसांकडून विकास दुबेचा शोध सध्या सुरू आहे. उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने हमिदपूर जिल्ह्यात चकमकीत विकास दुबेचा जवळचा सहकारी अमर दुबेला ठार केले आहे. या हत्याकांडानंतर तिवारी आणि ... Read More »

‘लिजंडस्’मध्ये आनंदचा सहभाग

मॅग्नस कार्लसन चेस टूर स्पर्धेचा भाग असलेल्या ‘लिजंडस् ऑफ दी चेस’ स्पर्धेत भारताचा पाचवेळचा माजी विश्‍वविजेता ग्रँडमास्टर विश्‍वनाथन आनंद खेळणार आहे. १५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेची ही ऑनलाइन स्पर्धा २१ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत खेळवली जाणार आहे. ‘स्पर्धेसाठीचे निमंत्रण दोन आठवड्यांपूर्वीच मिळाले होते. परंतु, सहभागाचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला. यंदा बुद्धिबळाचे अपेक्षित सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. या ... Read More »

प्रसारकांविना क्रिकेट मंडळांचा संघर्ष

जागतिक स्तरावरील क्रिकेट मंडळांना भारतातील प्रसारक मिळणे कठीण बनले आहे. न्यूझीलंड क्रिकेटसाठी २०१७ सालापासून स्टार स्पोर्टस् हे प्रसारक होते. परंतु, आता किवी संघ प्रसारकाविना आहे. भारताच्या जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात झालेल्या न्यूझीलंड दौर्‍यानंतर न्यूझीलंड क्रिकेट व स्टार स्पोर्टस् यांच्यातील करार संपला असून स्टारने या कराराचे नूतनीकरण करण्यास अजूनपर्यंत उत्सुकता दाखवलेली नाही. पुढील दोन मोसमांसाठी भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर येणार नाही, हे ... Read More »

नवे आकलन

कोरोनाचा धोका जगाला कळला त्याला आता सहा महिने उलटून गेले आहेत. एखादी गोष्ट जेवढी जुनी होते, तेवढी तिच्याविषयी अधिकाधिक माहिती आपल्याला कळत असते. कोरोनाच्या बाबतीतही तसेच झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या संक्रमणाबाबत आजवर जे सांगितले आहे, त्याहून हे संक्रमण अधिक जटिल असल्याचे जगाला एव्हाना जाणवू लागले आहे. नुकतेच ३२ देशांतील २३९ वैज्ञानिकांनी जागतिक आरोग्य संघटनेला खुले पत्र लिहून कोरोना ... Read More »

कोविड इस्पितळ पूर्ण भरले

>> सरकारची कबुली : पर्याय विचाराधीन मडगाव येथील कोविड-१९ इस्पितळातील सगळ्या २२० खाटा आता भरल्या असून या इस्पितळातील खाटा वाढवण्याबरोबरच गरज भासल्यास लवकरच उत्तर गोव्यातही एक कोविड-१९ इस्पितळ सुरू करण्यात येणार असल्याचे काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. कोविड इस्पितळ व व्यवस्थापन यासाठीचा सरकारचा प्लॅन बी तयार आहे. त्यामुळे कुणी घाबरून जायची गरज नाही, अशी माहितीही राणे ... Read More »

राज्यात कोरोनाचे नवे ९० रुग्ण

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला असून नव्याने आणखी ९० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे गोव्यासाठी चिंतेची बाब बनून राहिली आहे. मडगाव येथील कोविड – १९ इस्पितळातील २२० खाटा भरल्याने आता कोविड रुग्णांसाठी आणखी इस्पितळ उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी म्हटले आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता १९०३ वर पोहोचली असून सध्या राज्यात ... Read More »

फोंड्यात अग्निशमन जवानही पॉझिटिव्ह

फोंडा पोलिसांबरोबरच आता अग्निशमन दलाचेही जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळू लागले आहेत. कुंडई येथील अग्निशमन दलाचा एक जवान जो कुर्टी येथील रहिवासी आहे, तो पॉझिटिव्ह आहे. याशिवाय पणजी मुख्यालयातही पॉझिटिव्ह सापडू लागल्याने इतरांनी आपापली चाचणी करवून घेण्यास प्राधान्य दिले असून फर्मागुढी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात कोविड निगा केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, वाडी – तळावली येथील एकाच कुटुंबातील तिघा ... Read More »

बनावट प्रमाणपत्र प्रकरणी कारवाईचे राज्यपालांचे पत्र

उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचे पुत्र रेमंड फिलीप फर्नांडिस यांनी अव्वल कारकून पदासाठी अर्ज करताना बनावट पदवी प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी त्यांच्यावर एफ्‌आय्‌आर नोंद करण्यात यावी, यासाठी आयरिश रॉड्रिग्ज यांनी जी तक्रार नोंदवली आहे, त्यासंबंधी योग्य ती कारवाई केली जावी, अशी मागणी करणारे पत्र राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांना लिहिले आहे. ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी गेल्या आठवड्यात राज्यपालांची भेट घेऊन त्यांना ... Read More »

‘सीबीएसई’चा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी होणार

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षा (सीबीएसई) बोर्डाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी नववी ते १२ वी इयत्तेचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात पर्यायाने जगात कोरोनाचा फैलाव जोरदार सुरू असून सीबीएसईला नववी ते १२ इयत्तेपर्यंतचा अभ्यासक्रम कमी करण्याचा सल्ला दिला होता, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी सांगितले. अभ्यासक्रम कमी करण्यासंदर्भात देशभरातील शिक्षण तज्ज्ञांकडून ... Read More »