विस्तारवादाचे युग संपले ः मोदी

>> लेह दौर्‍यात पंतप्रधानांचा चीनला इशारा जगाच्या विकासासाठी शांतता आवश्यक आहे. गेल्या काही काळात विस्तारवादानेच मानवतेचा विनाश आरंभला आहे. ज्यांना विस्तारवाद हवा आहे त्यांनी कायम जागतिक शांतीपुढे धोका निर्माण केला. अशी विस्तारवादी भूमिका घेणार्‍या शक्ती पूर्णपणे संपल्या किंवा मागे हटल्या. संपूर्ण जग आज विस्तावादाविरोधात एकवटले असून भारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. संपूर्ण जगाने आपल्या जवानांचा पराक्रम पाहिला आहे. ... Read More »

चित्रपट नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन

प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान (७२) यांचे गुरूवारी दुपारी निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्या अनेक दिवसांपासून इस्पितळात उपचार घेत होत्या. दि. २० जून रोजी त्यांना गुरुनानक इस्पितळात नेण्यात आले होते. याआधी त्यांची केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. सरोज खान यांनी २ हजारांहून अधिक गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ‘देवदास’मधील ‘डोला रे ... Read More »

चाचणीसाठी धारगळच्या रेडकर इस्पितळाची निवड

भारत बायोटेक आणि इंडियन कॉन्सील ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त सहकार्याने तयार केलेल्या कोविड १९ लसीच्या चाचणीसाठी ओशेलबाग धारगळ येथील रेडकर इस्पितळाची निवड करण्यात आली आहे. इस्पितळाचे डॉ. सागर रेडकर यांनी याबाबत सांगितले की, सर्व सोपस्कार कागदोपत्री झाल्यानंतर लस इस्पितळात उपलब्ध होणार आहे. हे इस्पितळ कोविड रुग्णांसाठी नाही. त्यामुळे मार्गदर्शक तत्त्वांनुसारच निवडक इच्छुक स्वंयसेवकांना लस दिली जाईल अशी माहिती त्यांनी ... Read More »

बाबर करू शकतो ‘त्या’पेक्षाही चांगली कामगिरी ः इंझमाम

२०१५मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या पाकिस्तानच्या विद्यमान मर्यादित षट्‌कांच्या कर्णधाराने आतापर्यंत शानदार कामगिरी केलेली आहे. त्याची तुलना भारताचा विद्यमान आक्रमक कर्णधार विराट कोहलीशी केली जात आहे. परंतु पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकच्या मते बाबर अजूनही त्याने केलेल्या आतापर्यंतच्या कामगिरीपेक्षा आणखी सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. बाबरने आतापर्यंत खेळलेल्या २६ कसोटी सामन्यांतून १८५०, ७४ वनडेतून ३३५९ तर ३८ टी -२० लढती खेळताना १४७१ ... Read More »

कोरोनावरील लस १५ ऑगस्ट रोजी येणार

>> भारत बायोटेकद्वारे पहिली स्वदेशी बनावटीची लस देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत कोरोनावरील आजारासाठी तयार करण्यात आलेली पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस उजत-दखछ ही १५ ऑगस्ट रोजी लॉंच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत बायोटेकने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे. भारत बायोटेक आणि ... Read More »

… आम्ही चालवू हा पुढे वारसा!

 निलांगी औदुंबर शिंदे गुरुपूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरूने दिलेलं ज्ञान आत्मसात करणं. गुरूकडून मिळवलेलं ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं. गुरूने दिलेल्या ज्ञानामुळे आपलं जीवन यशस्वी झालं यासाठी सतत गुरूबद्दल कृतज्ञ असणं. या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा आणि आदर करणं म्हणजे खरं गुरुपूजन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः | गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नः ॥ आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस ... Read More »

बोरकरांचे काव्यतीर्थ साकारुया

 घनश्याम बोरकर गोव्यातील कोकणी आणि मराठी भाषेतील एक महान कवी आणि गोवामुक्ती-संग्रामातील एक स्वातंत्र्यसैनिक, कविवर्य पद्मश्री ‘बा. भ. बोरकर’ यांचे स्मारक, बोरी गावाचेच नव्हे तर गोव्याचे वैभव ठरेल. हे एक सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक केंद्र म्हणून विख्यात व्हावे आणि भारताचे हृदयंगम ‘काव्यतीर्थ’ म्हणून उदयास यावे हीच परमेश्‍वर चरणी प्रार्थना! कविवर्य बा. भ. बोरकर हे मराठी आणि कोकणी भाषेतील एक समर्थ, महान कवी ... Read More »

दोष कुणाचा?

– माधुरी रं. शे. उसगावकर शिक्षक विद्यार्थ्यांना नाना उदाहरणे देऊन मोबाइलच्या गैरवापराला आळा घालण्याच्या प्रयत्नात असायचे. डोळ्यांवर ताण येतो. रात्रीच्या वेळी तर अपुर्‍या प्रकाशात मोबाइल वापरू नये असेही सुचवले जायचे. परंतु आजच्या पद्धतीत मोबाइलवर ऑनलाइन क्लासेस चालतात. त्याचा अनिष्ट परिणाम मुलांवर, तरुणाईवर झाल्यास दोष कुणाचा? बघता बघता २०२० वर्षाचे सहा महिने संपले. हा काळ कोरोना विषाणूच्या महामारीच्या थैमानातून जात आहे. ... Read More »

पावसाळा आणि जिभेचे लाड

 गौरी भालचंद्र बाहेर कोसळणारा पाऊस, अंगावर शहारे आणणारा हवेतला गारवा, हातातल्या कपातला वाफाळता चहा हे दृश्य जोडीला चमचमीत भजी, वडापाव किंवा तत्सम काहीतरी चटकदार खाऊ असल्याशिवाय पूर्णच होत नाही. हातगाडीवरती ठेवलेली कणसं, छोटी शेगडी आणि त्या निखार्‍यांना फुलवत कणसं भाजून देणारा मनुष्य… पावसाळ्याच्या सुमारास दृष्टीस पडणारं हमखास दृश्य. आताशा तर साधी कणसं मिळतच नाहीत, सगळीकडे स्वीटकॉर्नच मिळतात. मग ही कणसं ... Read More »

निसर्गाचा जीवनदाता ः ‘पाऊस’

रश्मिता रा. सातोडकर (शिरोडवाडी-मुळगाव) अगदी त्रासिक जिवाचा विसर पडून मोहिनी घालणार्‍या जगात वावरल्याचा भास केवळ पाऊसच देऊ शकतो. सर्व सजीवांबरोबरच निसर्गाला जीवनदान देणारा हा पाऊस. डोळे मिटून जर या पावसाचा आस्वाद घेतला तर आपल्या मनातल्या भावना, संवेदना नक्कीच कोर्‍या कागदावर उमटून येतील! आपण प्रत्येकजण वयानुसार लहानाचे मोठे होत जातो. त्याचप्रमाणे आपल्यात वयानुसार कितीतरी बदल जाणवत असतात. एखाद्यावेळी आपण लबाड असलेले ... Read More »