दिल्लीहून विशेष रेलगाड्यांचा शुभारंभ

  अखेर भारतीय रेल्वेने जाहीर केल्यानुसार काल विशेष प्रवासी रेलगाड्या येथून सोडण्यात आल्या. एकूण २२९९ प्रवाशांसह दिल्ली रेल स्थानकावरून त्या रवाना झाल्या. प्रथम संध्याकाळी एक रेलगाडी नवी दिल्लीहून दिब्रुगड येथे रवाना झाली व ४.४५ वा. नवी दिल्लीहून बंगळुरू येथे दुसरी ट्रेन सोडण्यात आली. नवी दिल्ली-विलासपूर विशेष ट्रेन १११७ प्रवाशांसह संध्या. ४ वा. सोडण्यात आली. तर ११२२ प्रवाशांसह दिल्ली-दिब्रुगड ट्रेन सोडण्यात ... Read More »

‘त्या’ ६० गोमंतकीय खलाशांची होम क्वॉरंटाईनसाठी पाठवणी

  मारेला डिस्कव्हरी या जहाजावरून विदेशातून गोव्यात आलेल्या ६० गोमंतकीय खलाशांचे १४ दिवसांचे सरकारी क्वारंटाईन पूर्ण झाल्याने त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मारेला या जहाजावरील ६० खलाशांना मुंबई बंदरात उतरवून त्यांची कोविड चाचणी केल्यानंतर गोव्यात प्रवेश देण्यात आला होता. पाटो – पणजी येथील एका हॉटेलमध्ये त्या खलाशांना सरकारी क्वारंटाईनखाली ठेवण्यात आले होते. सरकारी क्वारंटाईन पूर्ण झाल्यानंतर त्या ... Read More »

गोमेकॉत ४ नवीन संशयित कोरोना रुग्ण दाखल

  बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित ४ रुग्णांना काल दाखल करण्यात आले आहे. जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ४१३ चाचण्या नकारात्मक आहेत. गोमेकॉच्या खास कोरोना विभागात २ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, उत्तर गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये २ कोरोना संशयितावर उपचार सुरू आहे. आरोग्य खात्याने २९६ जणांना होम क्वारंटाईनखाली आणले आहेत. तर, ३०३ प्रवाशांना ... Read More »

कुंडईतील स्वयंअपघातात युवक जागीच ठार

कुंडई येथील सर्कलजवळील रस्त्यावर दुचाकीवरून पडून कुंडईतील युवक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. अपघात ठार झालेल्या युवकाचे नाव साईश प्रकाश कुंडईकर (वय २१) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साईश प्रकाश कुंडईकर हा जीए-०५ के-२३२७ या क्रमांकाच्या दुचाकीवरून फोंड्याहून कुंडईच्या दिशेने घरी परतत होता. रस्त्यावरील खड्‌ड्याचा अंदाज न आल्याने त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याचे डोके रस्त्यावर ... Read More »

झिंगन, बाला देवी यांना अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन

बचावपटू संदेश झिंगन आणि महिला संघाची स्टार स्ट्रायकर बाला देवी यांना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन दिले आहे. संदेश आणि बाला यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांची अर्जुन पुरस्कारासाठी नावे पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे एआयएफएफचे सरचिटणीस कुशल दास यांनी काल माहिती देताना सांगितले. बालादेवीने या वर्षाच्या सुरुवातीस स्कॉटिश महिला प्रीमियर लीगच्या रेंजर्स एफसी संघासमवेत १८ महिन्यांचा करार करीत इतिहास ... Read More »

बंगालच्या कुंडूला ‘ब्लिट्‌झ’चे जेतेपद

>> गोमंतकीय खेळाडूंची प्रभावी कामगिरी अखिल भारतीय पहिल्या ऑनलाईन ब्लिट्‌झ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पश्‍चिम बंगालच्या कस्तुव कुंडू याने पटकावले. बाणावली चेस क्लब व फातोर्डा पॅरेंट्‌स चेस क्लब यांनी सासष्टी तालुका बुद्धिबळ असोसिएशन व चेस. कॉम यांच्या संलग्नतेखाली ही स्पर्धा आयोजित केली होती. कुंडू याने ९ फेर्‍यांअंती ७.५ गुणांची कमाई केली. तामिळनाडूचा दिनेश राजन दुसर्‍या व प्रणेश एम. तिसर्‍या स्थानी राहिला. ... Read More »

महिला अंडर १७ फुटबॉल वर्ल्डकप पुढीलवर्षी

कोरोना विषाणूंमुळे पुढे ढकलण्यात आलेली १७ वर्षांखालील महिलांची भारतात होणारी फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा आता पुढीलवर्षी १७ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत होणार आहे. परिस्थितीतून सावरण्यासाठी लागणारा कालावधी ध्यानात ठेवून फिफाने हा निर्णय घेतला आहे. यंदा २ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा नियोजित होती. परंतु, संपूर्ण क्रीडाविश्‍वाला ब्रेक लागलेला असल्यामुळे फिफाने स्पर्धा तीन महिन्यांनी पुढे ढकलणे योग्य समजले ... Read More »

कोरोनासोबतचे जीवन

देशातील कोरोना रुग्णांची संख्या एका बाजूने दिवसागणिक साडे तीन ते चार हजारांनी वाढत असताना, दुसरीकडे सरकारने आपली कोरोनाविषयक रणनीती बदलण्याचा विचार चालवल्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पाचव्यांदा विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, त्या चर्चेचा मुख्य भर अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर होता, परंतु त्या आधीच केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेले विलगीकरणाबाबतचे नवे शिथील दिशानिर्देश, आरोग्य खात्याने कोरोना रुग्णांच्या चाचण्यांसंदर्भात ... Read More »

अर्थव्यवस्थेला उभारीसाठी पंतप्रधानांना विनंती

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गोव्यातील अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी खनिज उद्योग आणि पर्यटन व्यवसायाला चालना देण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीनंतर बोलताना काल दिली. लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यताही सावंत यांनी व्यक्त केली. या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या वेळी आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे, मुख्य सचिव परिमल राय, ... Read More »

संजीवनी कारखाना सुरू करावा : सुदिन ढवळीकर

  गोवा सरकारने २०२०-२१ या वर्षी ५ कोटी रु. खर्चून संजीवनी साखर कारखाना चालू करावा अशी मागणी मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल एका पत्रकाद्वारे केली आहे. संजीवनी साखर कारखाना बंद करण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर गोवा बागायतदारचे चेअरमन ऍड. नरेंद्र सावईकर व भाजपच्या गाभा समितीच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन कारखान्याबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याबद्दल ढवळीकर यांनी ... Read More »