आझमच्या टी-२० संघात सहा भारतीय

पाकिस्तानचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील विद्यमान कर्णधार बाबर आझमने भारत आणि पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश असलेला संयुक्त टी-२० संघ निवडला आहे. त्याने निवडलेल्या आपल्या संघात ६ भारतीय खेळाडूंचा समवेश केला आहे. क्रिकबझसाठी हर्षा भोगले याच्याशी बोलताना बाबरने हा संघ निवडला आहे. बाबरने स्वतःच्या साथीत सलामीवीर म्हणून भारताचा विस्फोटक फलंदाज हिटमॅन रोहित शर्माला पसंती दिली आहे. तिसर्‍या स्थानासाठी कोणताही संकोच न करता बाबरने ... Read More »

गरज विश्वासाची

‘भिवपाची गरज ना’ हे जनतेच्या मनावर ठसवण्यासाठी सध्या राज्य सरकारचा जोरदार आटापिटा चाललेला दिसतो. कोरोना हा कसा सर्दी, पडशासारखा क्षुल्लक आजार आहे हे सांगून झाल्यानंतर आता सरकारने ‘कोरोना रुग्णा’ची व्याख्याच बदलून टाकली आहे. ज्याच्यात कोरोनाची बाह्य लक्षणे दिसतील त्याचीच कोरोना चाचणी होईल आणि त्यात पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यालाच ‘कोविड रुग्ण’ म्हटले जाईल व उपचारासाठी त्याची रवानगी कोविड इस्पितळात होईल असे सरकारने ... Read More »

नव्या २९ कोरोना रुग्णांत २२ मांगूरशी संबंधित

>> राज्यातील सध्याची कोरोना रुग्णसंख्या २९३; मुख्य सचिवांची मांगूरला भेट राज्यात कोरोना पॉझिटिव्ह नवीन २९ रुग्ण काल आढळून आले असून त्यात मांगूर हिलशी संबंधित २२ रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्हची सध्याची रुग्ण संख्या २९३ झाली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ३५९ एवढी झाली असून त्यातील ... Read More »

शिरोलीत सापडले चार नवे कोरोना रुग्ण

>> सत्तरीत कोरोनाचे रुग्ण झाले अकरा सत्तरीत कोरोनाचे काल चार रुग्ण सापडले असून तेथील कोरोनाचे एकूण अकरा रुग्ण झाले आहेत. यापूर्वी मोर्ले-सत्तरीत चार, शिरोली-सत्तरीत दोन व गुळेलीत एक रुग्ण सापडले होते. काल मोर्ले येथे त्यात चार रुग्णांची भर पडली. शिरोलीत कोरोनाचा प्रसार झाला आहे. मोर्ले सत्तरीत कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर ती व्यक्ती शिरोलीत गेली असता तिथे कोरोनाचा प्रसार झाला. शिरोलीतील सोमवारी ... Read More »

दररोज सापडणार्‍या कोरोना रुग्णांमुळे मुरगाव तालुका भीतीच्या छायेखाली

वास्कोत काल १३ कोरोना रुग्ण सापडल्याने वास्को शहराबरोबर संपूर्ण मुरगाव तालुका भीतीच्या छायेखाली आहे. राज्याचे मुख्य सचिव परिमल राय, पोलीस महासंचालक जसपाल सिंग, आरोग्य सचिव नीला मोहनन तसेच दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी काल मांगोरहिल येथील प्रतिबंधित क्षेत्रात फेरफटका मारून एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी येथील नागरिकांनी त्यांना भासत असलेल्या अडचणीविषयी कैफीयत मांडली. मांगोरहिल आणि आसपासच्या भागात कोरोनाबाधितांची संख्या ... Read More »

देशातील कोरोना रुग्णसंख्या २.६६ लाख

>> केंद्र सरकार म्हणते सामाजिक प्रसार नाही! भारतातील कोरोनाबाधितांची संख्या २.६६ लाखांच्या पुढे गेली असून जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये देशाने याआधीच पाचवे स्थान नोंद केले आहे. त्याच बरोबर आशियातील कोविड-१९च्या मोठ्या प्रमाणातील प्रकरणांमुळे यासाठीचे भारत हे एक मोठे केंद्र ठरले आहे. तसेच गेल्या १० दिवसांपासून भारतात दररोज सरासरी ७९०० कोरोना बाधित सापडल्याची नोंद होत आहे. दरम्यान, काल (दि. ... Read More »

ज्योतिरादित्य शिंदेंना कोरोना; केजरीवालांचा अहवाल निगेटिव्ह

  कॉंग्रेस सोडून काही काळापूर्वीच भाजपवासी बनलेले ज्योतिरादित्य शिंदे व त्यांची आई माधवी राजे शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून उपचारांसाठी त्यांना येथील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. याआधी भाजपचे प्रवक्ते संबित पात्र यांनाही कोरोना संसर्गामुळे इस्पितळात दाखल केले होते. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. ताप आल्याने व घसा दुखत असल्याने ते ... Read More »

वेस्ट इंडीज संघ इंग्लंडमध्ये दाखल

कर्णधार जेसन होल्डर याच्या नेतृत्वाखाली तीन कसोटी सामन्यांची ऐतिहासिक मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ काल मंगळवारी इंग्लंडमध्ये दाखल झाला. विंडीजमध्ये करण्यात आलेल्या खेळाडूंच्या व साहाय्यक पथकाच्या चाचणीत सर्वजण निगेटिव्ह असल्याचे आढळून आले होते. सोमवारी दोन वेगवेगळ्या विमानांतून कॅरेबियन बेटांवरील सर्व खेळाडूंना एकत्र करण्यात आले. यानंतर खासगी चार्टरमधून सर्व खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल झाले. ‘क्रिकेटसाठी आम्ही उचलेले हे सर्वांत मोठे पाऊल आहे,’ ... Read More »

पाकिस्तान संघाचा युनिस फलंदाजी प्रशिक्षक

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने मंगळवारी माजी कर्णधार युनिस खान याची इंग्लंड दौर्‍यासाठी पाकिस्तान संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून तर मुश्ताक अहमद याची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक व गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनिस यांच्यासह ही दुकली काम करणार आहे. पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हा दौरा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार आहे. दोन्ही संघात तीन टी-ट्वेंटी ... Read More »

आशिया चषकाबाबत निर्णय लांबणीवर

ऑस्ट्रेलिया येथे ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेविषयी आयसीसीने आपला निर्णय जाहीर केल्यानंतरच आशिया चषक टी-ट्वेंटी स्पर्धेचा निर्णय घेण्याचे सोमवारी झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) ऑनलाईन बैठकीत निश्‍चित करण्यात आले. आशिया चषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे. स्पर्धेचे यावेळेस पाकिस्तानकडे आहे. परंतु, भारत पाकिस्तानात जाणार नसल्यामुळे त्रयस्थ ठिकाणी किंवा अन्य दुसर्‍या देशात ही स्पर्धा होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा स्थगित ... Read More »