राज्यात कोरोनाचा चौथा बळी

>> नवीन ७२ पॉझिटिव्ह रुग्ण राज्यात कोरोना पॉझिटिव्ह एका ६६ वर्षीय ताळगाव येथील व्यक्तीचे मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये मंगळवारी मध्यरात्री निधन झाले असून राज्यातील कोरोना बळींची संख्या ४ झाली आहे. दरम्यान, राज्यात काल नवीन ७२ रुग्ण आढळून आले असून कामराभाट-करंजाळे आणि बोरी-शिरोडा येथे आयझोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर, जुवारीनगरात नवीन २४ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह ... Read More »

फातर्प्यात १० नवीन रुग्ण

फातर्पा आंबेमळ येथे काल आणखी १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने फातर्प्यात रुग्णसंख्या २१ झाली आहे. एक परिचारिका पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्या कुटुंबातील लोकांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे फातर्पा सरपंच मंदा देसाई व केपेचे मामलेदार लक्ष्मीकांत देसाई यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. दरम्यान, फातर्प्यातील तो भाग निर्बंधित क्षेत्र करण्याची तयारी चालू आहे. दरम्यान, सासष्टी तालुक्यातील मडगावात १२, आंबेली २३, लोटली ११, नावेली ... Read More »

बस्तोडा-ऊसकईतील अपघातात एक ठार

म्हापशाहून बस्तोडामार्गे ऊसकई मार्गांवर काल बुधवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास एका दुचाकीचा टायर फुटून अपघात झाला. यात शशांक श्यामसुंदर शेट हा युवक ठार झाला. तर त्याचे वडील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे. शशांक शेट व त्याचे वडील एका स्कूटरवरून येत असताना बस्तोडा उसकई मार्गावर पोचताच दुचाकीचा टायर फुटला. त्यात चालक शशांक हा मरण पावला. तर त्याचे वडील ... Read More »

कोरोनाचा सामाजिक संसर्ग नाही ः मुख्यमंत्री

यापूर्वी केलेल्या आपल्याच विधानाशी फारकत घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल, राज्यात कोरोनाचा सामाजिक संसर्ग नसल्याचे मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यात कोरोनाचा सामाजिक संसर्ग झालेला आहे असे मी यापूर्वी म्हटले होते. मात्र त्या संबंधी बारकाईने अभ्यास केल्यानंतर राज्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग झाला नसल्याच्या निष्कर्षावर आपण आलो असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत अशा भागांत गेलेल्या लोकांनाच ... Read More »

चिंबलमध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन

उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी इंदिरानगर चिंबल येथील काही भाग मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. इंदिरानगर या झोपडपट्टी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १० झालेली असून सुमारे ६१ घरांचा मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये समावेश केला आहे. तर सभोवतालच्या घरांचा बफर झोनमध्ये समावेश केला आहे. Read More »

‘मोप’साठी अतिरिक्त जमीन संपादनास मंजुरी

>> मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, मुख्यमंत्र्यांची माहिती बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोप येेथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २३६७ चौ. मी. एवढी अतिरिक्त जमीन संपादित करण्यास मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच विमानतळाची धावपट्टी ३७५० मीटर ऐवजी ३५०० मीटर एवढी करण्याचा निर्णय यावेळी झाला. साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता १५० वरून २५० टीपीडी ... Read More »

येत्या तीन दिवसांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता

येथील हवामान खात्याने २ ते ४ जुलै दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळण्याचा इशारा काल दिला आहे. दरम्यान, मागील चोवीस तासात काणकोण येथे सर्वाधिक ५.३१ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मागील आठ दिवसात पावसाचे प्रमाण कमी होते. सोमवारपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून काल मंगळवारी सायंकाळी राज्यात जोरदार पाऊस पडला. मागील चोवीस तासांत १.६७ इंच पावसाची नोंद ... Read More »

जडेजा सर्वांत मौल्यवान भारतीय कसोटीपटू

‘विस्डेन’या क्रिकेटसंबंधी सर्वांत जुन्या व लोकप्रिय मासिकाने रवींद्र जडेजा याची २१व्या शतकातील भारताचा सर्वांत मौल्यवान खेळाडू म्हणून निवड केली आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही प्रकारांत जडेजा सर्वोत्तम कामगिरी करत असल्यामुळे त्याची या बहुमानासाठी निवड झालेली आहे. जडेजाला या मध्ये ९७.३ गुण मिळाले आहेत. जगातील प्रत्येक खेळाडूचे तुलनात्मक मूल्यांकन करून त्यांना एमव्हीपी (मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर) रेटिंग देण्यात आले. यामध्ये ... Read More »

‘एबी’च्या आयपीएल संघाचा धोनी कप्तान

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स याने आपल्या सार्वकालिक आयपीएल इलेव्हन संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनी याच्याकडे सोपवले आहे. चौथ्या क्रमांकासाठी एका खेळाडूची निवड करणे कठीण गेल्याने एबीने स्वतःसह केन विल्यमसन व स्टीव स्मिथ यालासुद्धा संघात सामावून घेतले आहे. क्रिकेटसंबंधी माहिती देणारे संकेतस्थळ असलेल्या ‘क्रिकबझ’ वर समालोचक हर्षा भोगले यांच्याशी बोलताना डीव्हिलियर्सने संघ जाहीर केला. डीव्हिलियर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातील आपला माजी ... Read More »

मेस्सीने नोंदवला विक्रमी ७००वा गोल

अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी याने बुधवारी रात्री ला लिगाच्या सामन्यामध्ये आपल्या कारकिर्दीतील ७०० व्या गोलची नोंद केला. कारकिर्दीत ७०० गोल करणारा मेस्सी हा दुसरा सक्रिय खेळाडू आहे. बार्सिलोनाच्या लिओनल मेस्सीने बुधवारी कॅम्प नाऊ स्टेडियमवर ऍटलेटिको माद्रिद विरूद्ध झालेल्या सामन्यात ७०० वा गोल झळकावला. या सामन्याच्या ५०व्या मिनिटाला मेस्सीने पेनल्टीवर गोल केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर खेळांप्रमाणे फुटबॉलचे सामनेदेखील ही बंद ठेवण्यात आले ... Read More »