साखळीत २ नवे रुग्ण

साखळीत गावठण येथे १ व हरवळे येथे १ असे दोन नवीन रुग्ण सापडल्याची माहिती साखळी आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. उत्तम देसाई यांनी दिली. साखळीतील रुग्णसंख्या ३१ वर पोचली असून डिचोली तालुक्याची संख्या ४० झाली आहे. डिचोलीमध्ये २ तर सर्वणमध्ये १ रुग्ण डिचोली बोर्डे येथे काल गुरुवारी एक पॉझिटिव्ह रुग्ण तर मावळींगे येथे एक चालक पॉझिटिव्ह सापडला. तसेच सर्वण येथील ज्या ... Read More »

फोंडा पोलिसांत आणखी १४ पॉझिटिव्ह

>> कोरोनाबाधितांची संख्या १८ वर >> मुख्यालयाकडून दखल फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाल्यानंतर काल गुरुवारी एका गृहरक्षकाबरोबर एकूण चौदा पोलिसांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच एका रुग्णवाहिकेच्या कर्मचार्‍यालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांशी संबंधित एकूण आकडा अठरावर गेला आहे. फोंडा तालुक्याबरोबरच लगतच्या तालुक्यातील रुग्णांचा त्यात समावेश असून माशेलमध्ये तीन ... Read More »

अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर सभा, बैठका नकोत

>> विधानसभा सचिवांची सूचना >> अधिवेशन २७ जुलैपासून कोरोना विषाणूच्या फैलावाच्या काळात होणार्‍या २७ जुलैपासून होणार्‍या गोवा विधानसभेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभा सदस्यांनी बैठका, सभा, वार्तालाप आदींचे आयोजन करू नये, अशी सूचना विधानसभेच्या सचिव नम्रता उल्मन यांनी केली आहे. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या २७ जुलैपासून सुरू होणार असून ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. राज्यातील विविध भागात कोरोनाचा फैलाव सुरू आहे. ... Read More »

गेल्या २४ तासांत राज्यात १.७७ इंच पावसाची नोंद

राज्यात मागील चोवीस तासात १.७७ इंच पावसाची नोंद झाली असून पावसाची रिपरिप सुरूच आहे. या पावसामुळे जोरदार वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांत उद्या शनिवार ४ जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. मागील चोवीस तासांत ओल्ड गोवा येथे सर्वाधिक २.८१ इंच पावसाची नोंद झाली. Read More »

पर्यटन खात्याने एसओपी जाहीर न केल्याने राज्यात हॉटेल्स बंदच

पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी राज्यातील हॉटेल काल गुरुवार २ जुलैपासून सुरू करण्याची घोषणा केली होती. तथापि, पर्यटन खात्याने हॉटेल सुरू करण्याबाबत एसओपी जाहीर न केल्याने हॉटेल सुरू होऊ शकली नाहीत. दरम्यान, पर्यटन खात्याकडून हॉटेलसाठी एसओपी जाहीर केल्यानंतर हॉटेल सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती पर्यटन खात्याचे संचालक मिनीन डिसोझा यांनी दिली. पर्यटन खात्याकडे २६० हॉटेल मालकांनी हॉटेल सुरू ... Read More »

वीज उत्पादन क्षेत्रातही चीनला झटका देणार

भारताकडून चीन सतत आर्थिक स्तरावर झटके देण्यात येत आहेत. सरकार ऊर्जा क्षेत्रातील आयातीवर सीमा शुल्क वाढवणार आहेत. यामुळे आयातीवर काही प्रमाणात निर्बंध येतील. चिनी कंपन्यांना रोखण्यासाठी सीमा शुल्कासोबत नियम अधिक कडक केले जातील, असे केंद्रीय मंत्री आर. के. सिंह म्हणाले. डिजिटल आणि रस्ते बांधकाम क्षेत्रानंतर आता वीज उत्पादन क्षेत्रातून चीनला झटका देण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. देशातील पुरवठा भारत ... Read More »

सर एव्हर्टन विक्स यांचे निधन

>> कॅरेबियन क्रिकेटचे पितामह म्हणून ओळख >> ठोकली होती सलग पाच शतके वेस्ट इंडीजचे माजी दिग्गज फलंदाज सर एव्हर्टन विक्स यांचे बुधवारी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे. विक्स यांनी क्लाइड वॉलकोट आणि फ्रँक वॉरेलसह १९५० च्या दशकात जागतिक क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजला वर्चस्व मिळवून दिले होते. या त्रिकुटाला वेस्ट इंडिजचे ‘द थ्री डब्ल्यू’ म्हणून ओळखले जायचे. विक्स यांना कॅरेबियन ... Read More »

आजीवन बंदीचा पुनर्विचार करा

>> अंकित चव्हाणची ‘एमसीए’ला विनंती श्रीसंत याच्यासह आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला मुंबईचा माजी डावखुरा फिरकीपटू अंकित चव्हाण याने आपल्यावरील आजीवन बंदी हटवण्याची मागणी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे केली आहे. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने केलेल्या चौकशीत राजस्थान रॉयल्सचे तत्कालीन खेळाडू श्रीसंत, चव्हाण व अजित चंडिला हे तिघे दोषी आढळले होते. त्यामुळे या तिघांवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. दिल्लीतील कोर्टाने २०१५ साली ... Read More »

विराट कोहली माझा आदर्श ः सॅमसन

टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज संजू समॅसनने कर्णधार विराट कोहलीची भरभरून स्तुती करताना तो त्याच्यासाठी आणि देशातील प्रत्येक युवा खेळाडूसाठी आदर्श असल्याचे सांगितले. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या कर्णधाराकडून युवा खेळाडू बरेच काही शिकू शकतील असे सॅमसन म्हणाला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप पाडल्यानंतर आयपीएलमध्येही सरस खेळ करीत संजूने भारतीय संघात स्थान मिळविले आहे. महंेंद्रसिंह धोनीचा उत्तराधिकारी म्हणून तो अग्रगण्य उमेदवार आहे. एका ... Read More »

पारदर्शकतेची गरज

कोरोनाच्या सावटाखाली कालची आषाढी एकादशी सुनी सुनी गेली. ना टाळ – मृदंगांचे सूर निनादले, ना तारस्वरातील भजनांचे – अभंगांचे स्वर. खुद्द पांडुरंगाच्या पंढरीमध्येच जेथे काल सुन्न शांतता होती, तिथे आपल्या गोव्याची काय कथा? कोरोनाचे हे संकट लवकर दूर कर असे साकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरीच्या विठोबाला काल घातले खरे, परंतु हे संकट काही एवढ्या लवकर दूर होण्याची चिन्हे ... Read More »