आरोग्याची त्रिसूत्री  आहार- विहार- उपचार

– डॉ. मनाली म. पवार (पणजी) आपली प्रतिकारशक्ती चांगली असल्यास कोणताही व्हायरस आपल्या आरोग्याचे नुकसान करू शकत नाही. कोरोनाची भीती नसली तरी सामाजिक अंतर व मास्कचा वापर नियमित केल्यास किंवा प्रशासनाने घातलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास पावसाळ्यातील इतर आजार म्हणा किंवा कोरोना व्हायरसवर आपण सहज मात करू शकतो. सध्या पावसाळा व त्याचबरोबर कोविड-१९ चा अनलॉक काळ सुरू झाला आहे म्हणून ... Read More »

योगसाधना – ४६५ अंतरंग योग – ५१ यम-नियमांचे पालन आवश्यक

 डॉ. सीताकांत घाणेकर मानवाने सृष्टीमध्ये वावरताना कसलीही बंधने पाळली नाहीत. फक्त तो इंद्रियसुखाच्या मागे लागला. निसर्गाला त्याने नष्ट केले. योगसाधनेची जी चार मुख्य अंगे आहेत- आहार- विहार- आचार- विचार… यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला नाही. मग पालन कुठून होणार? विश्‍वात अनेक राष्ट्रे- राज्ये आहेत. इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकला की लक्षात येते की विविध राजांच्या राजवटी दीर्घकाळ टिकल्या नाहीत- मग ते राजे चांगले ... Read More »

पौगंडावस्थेतील समस्यांवर उपाय

 वैद्य स्वाती हे. अणवेकर (म्हापसा) मुलांशी कायम मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे म्हणजे मुलं आपल्यापासून काहीच लपवून ठेवत नाहीत. तसेच त्यांना जर मोबाइल, इंटरनेटच्या व्यसनांपासून लांब ठेवायचे असल्यास त्यांना मैदानी खेळ, संगीत, चित्रकला… अशा क्षेत्रात भाग घ्यायला प्रोत्साहित करावे. त्यांना वाचन व लिखाणाची आवड जोपासायला लावावी. पौगंडावस्थेतील समस्यांवर आपण मागील काही लेखांमधून प्रकाश टाकला. आता या समस्यांवर उपाय म्हणून आपण कोणकोणती काळजी ... Read More »

‘ऍलर्जी’ म्हणजे काय?

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर (श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) काही त्रास हे आनुवंशिक असतात. त्यांची चिकित्सा करणे खूपच अवघड जाते. जेथे आपल्याला वाटते की अमुक गोष्टींमुळे आपल्याला किंवा इतरांना त्रास होतोय, त्या गोष्टी त्वरित थांबवाव्यात. प्रत्येक गोष्ट ही सर्वानाच चालून जाईल, उपयोगी पडेल असे नाही होत. त्यांचे दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात. ऍलर्जी म्हणजे काही विशिष्ट प्रकारच्या गोष्टी/अन्नांबाबत अहितकारक प्रतिक्रिया निर्माण करणारी शरीराची आरोग्यविषयक ... Read More »

प्रसार रोखणे महत्त्वाचे

क्रिकेटची धावसंख्या सांगावी तसे राज्याचे आरोग्य खाते गेले काही दिवस कोरोनाबाधितांचे मोठमोठे आकडे सांगते आहे. ९४, ९५, १०८ अशी बाधितांची ही दैनंदिन वाढती संख्या आणि बघता बघता लागोपाठ गेलेले सात बळी यामुळे गोमंतकीय जनता चिंतित आहे. या पार्श्वभूमीवर दहा – बारा दिवस गायब असलेल्या आरोग्य सचिव शनिवारी प्रकटल्या आणि रविवारी स्वतः मुख्यमंत्री पत्रकार परिषदेला सामोरे गेले ही स्वागतार्ह बाब आहे. ... Read More »

कोविड केअर सेंटरांची क्षमता ५०० खाटांनी वाढवणार

>> मुख्यमंत्र्यांची ग्वाही : कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणार्‍या पोलिसांना हॉटेलांतून ठेवणार राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोविड केअर सेंटरची क्षमता आणखी ५०० खाटांनी वाढविली जाणार आहे. कोरोनाबाधित आणि कटेंनमेंट झोनमध्ये काम करणार्‍या पोलिसांची हॉटेलमध्ये निवासाची सोय केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी २५० ... Read More »

नगरसेवक डिसोझा यांचे कोरोनामुळे निधन

मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक पास्कोल डिसोझा (७२) यांचे शनिवारी मध्यरात्री मडगाव येथील कोविड इस्पितळात निधन झाले. संध्याकाळी वास्कोत सेंट ऍन्ड्र्यू चर्च दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे बंधू जुझे फिलिप डिसोझा व अन्य कुटुंबीय उपस्थित होते. Read More »

केपे, बाळ्ळीत ४ रुग्ण

केपे येथे नवीन २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या १४ झाली आहे. बाळ्ळी येथे आणखी २ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या २३ झाली आहे. जुवारीनगर येथे आणखी १ रुग्ण आढळून आला असून रुग्णांची संख्या ९८ झाली. खारीवाडा येथे १ रुग्ण, न्यूववाडे येथे २ रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या ५९ झाली आहे. पर्वरी येथील गोवा विधानसभा संकुलाच्या ... Read More »

राज्यात नवे ७७ रुग्ण

>> पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१८वर राज्यात नवीन ७७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. कुडचडे, थिवी येथे नवीन आयसोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१८ झाली आहे. मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये उपचार घेणार्‍या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मुरगाव नगरपालिकेच्या एका नगरसेवकांचे शनिवारी मध्यरात्री निधन झाले. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह १११ रुग्ण काल बरे झाले ... Read More »

कंत्राटी पद्धतीने आरोग्य कर्मचार्‍यांची नियुक्ती : राणे

  राज्यातील कोरोना नियंत्रणाचे कार्य गतिमान करण्यासाठी नवीन आरोग्य कर्मचार्‍यांची कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती केली जाणार आहे. त्या कर्मचार्‍यांना प्राथमिक आरोग्य केंद्र व सामाजिक आरोग्य केंद्रात नियुक्त केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली. या आरोग्य कर्मचार्‍यांच्या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आलेली आहे. राज्यातील कोविड सेंटरमधील रुग्णांना पुरविण्यात येणार्‍या अन्नसेवेमध्ये सुसूत्रता आणण्यावर ... Read More »