पणजी मार्केट अखेर ४३ दिवसांनंतर खुले

येथील पणजी महानगरपालिकेच्या मुख्य मार्केटमधील दुकाने ४३ दिवसांनंतर काल खुली करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मार्केटमधील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरू करण्यास मान्यता दिल्यानंतर किराणा सामानाची विक्री करणारी काही दुकाने खुली करण्यात आली होती. तथापि, मार्केटमधील मोठ्या प्रमाणात दुकाने बंद होती. महानगरपालिकेचे मार्केटमधील दुकाने सुरू करण्यापूर्वी साफसफाई करण्यात ... Read More »

विशाखापट्टणमजवळ रासायनिक वायू गळती

काल गुरूवारी पहाटे एलजी पॉलिमर या कंपनीत रासायनिक वायू गळती झाल्यामुळे आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला. या वायू गळतीमुळे हजारो आजारी पडले असून स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून या घटनेबाबत बचावकार्य सुरू आहे. वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना डोळ्यांमध्ये जळजळ व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर अनेकांना रुग्णालयात दाखल ... Read More »

भारतच मॅच फिक्सिंग माफियांचे आश्रयस्थान

>> आकिबने केले खळबळजनक आरोप मॅच फिक्सिंगमुळे गेल्या काही वर्षात पाकिस्तानी क्रिकेटचे नाव बदनाम झालेले आहे. नुकताच त्यांचा आक्रमक सलामीवीर फलंदाज उमर अकमल हा दोषी आदळून आलेला आहे. असे असूनही पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आकिब जावेदने मात्र खळबळजनक आरोप केले आहेत. भारत हेच मॅच फिक्सिंग माफियांचे आश्रयस्थान असल्याचा आरोप त्याने केला आहे. आकिब जावेदने १९९०च्या दशकात मॅच फिक्सिंगबद्दल आवाज उठवला होता. ... Read More »

टी-टेनला ऑलिंपिकमध्ये स्थान हवे ः ऑईन मॉर्गन

टी-टेन या क्रिकेटच्य सर्वांत वेगाने लोकप्रिय होत असलेल्या प्रकाराचा ऑलिंपिकमध्ये समावेश करावा, अशी मागणी इंग्लंडला पहिल्यांदा विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार ऑईन मॉर्गन याने केली आहे. तो पुढे म्हणाला की, ऑलिंपिकमध्ये टी-टेन क्रिकेट व्हायला हवे. क्रिकेटचे हे स्वरुप खूप छोटे असते. त्यामुळे १० दिवसांमध्ये ही टी-टेन स्पर्धा संपून जाईल आणि ऑलिंपिकच्या दृष्टीने हे योग्यही ठरेल. यापूर्वी १९०० साली ऑलिंपिकमध्ये क्रिकेट खेळले ... Read More »

भारताचे सलग दोन पराभव

नेशन्स कप ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसर्‍या व चौथ्या फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. युरोप व चीन संघाविरुद्ध भारताचा २.५-१.५ अशा समान फरकाने पराभव झाला. चीनविरुद्धच्या लढतीत भारताच्या विश्‍वनाथन आनंद याने आपल्यापेक्षा सरस प्रतिस्पर्धी असलेल्या डिंग लिरेन याच्याविरुद्धचा पहिला डाव ५४ चालींत बरोबरीत सोडवला. पी. हरिकृष्णा यानेदेखील आपल्यापेक्षा वरचढ यू यांग यी याला गुण विभागून घेण्यास भाग पाडले. कोनेरू हंपी ... Read More »

पावलो डायबाला कोरोनामुक्त

युवेंट्‌सचा स्टार फुटबॉलपटू पावलो डायबाला याने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. युवेंट्‌स पत्रक जारी करताना डायबाला याच्या नव्याने करण्यात आलेल्या दोन्ही चाचण्या नेगेटिव्ह आल्या असल्याचे सांगितले. इटलीतील चॅम्पियन क्लब असलेल्या युवेंट्‌सने पुढे सांगितले की डायबाला याला होम क्वॉरंटाईन केले जाणार नाही. मागील जवळपास दोन महिन्यांपासून कोरोनाशी लढल्यानंतर डायबाला यातून मुक्त झाला आहे. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर मार्च महिन्यात डायबालाची पहिली ... Read More »

कोरोनाची झळ

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता पन्नास हजारांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची वाढ दिसून आली. दैनंदिन चाचण्यांच्या प्रमाणात झालेली वाढ हेच त्याचे कारण असल्याचा सरकारचा दावा आहे. एक एप्रिलला रोज पाच हजार चाचण्या व्हायच्या, त्या आता मे महिन्यात रोज पंच्याहत्तर हजार होत आहेत, त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ दिसते, पण ही दैनंदिन रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली ... Read More »

दहावीची परीक्षा २१ मेपासून

>> बारावीची २० ते २२ मे दरम्यान; मुख्यमंत्र्यांची माहिती सरकारने गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यास काल मान्यता दिली आहे. दहावीची परीक्षा २१ मेपासून आणि बारावीची परीक्षा २० ते २२ मे दरम्यान घेतली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ... Read More »

खलाशांना घेऊन दोन जहाजे लवकरच मुरगाव बंदरात

विदेशातून गोमंतकीय खलाशांना घेऊन येणारी दोन जहाजे मे महिन्याच्या मध्यात मुरगाव बंदरात दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत राज्याच्या बंदर सचिवांनी दिली आहे. विदेशातून गोमंतकीय खलाशांना घेऊन जहाजे मुरगाव बंदरात दाखल झाल्यास खलाशांना उतरवून घेण्याचे काम करावे लागणार आहे, असेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केले. केंद्र सरकारने विदेशातून येणार्‍या खलाशांना उतरवून घेण्यासाठी जाहीर केलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्याची ... Read More »

पोर्टलवर ४ हजार गोमंतकीयांची परत येण्यासाठी नोंदणी ः सावईकर

  कोविड-१९ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर ६५ देशांत अडकून पडलेल्या सुमारे ४ हजार गोमंतकीयांनी गोव्यात परत येण्यासाठी अनिवासी भारतीय आयोगाच्या पोर्टलवर नोंदणी केली असल्याची माहिती काल राज्याचे अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यानी दिली. आयोगाने सुरू केलेल्या पोर्टलवर विदेशांतून गोव्यात परत येण्यास इच्छुक असलेल्या सुमारे ४ हजार गोमंतकीयांनी गोव्यात परत येण्यासाठी नोंदणी केली असल्याचे सावईकर यांनी सांगितले. जगभरातील ६५ देशांत हे गोमंतकीय ... Read More »