चार देशांविरुद्ध खेळणार मालिका

>> कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर न्यूझीलंड क्रिकेट संघांचे व्यस्त वेळापत्रक कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड भविष्यातील दौर्‍यांच्या कार्यक्रमांनुसार (एफटीपी) वेस्ट इंडीज, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश संघाविरुद्ध मालिकांचे आयोजन करणार आहे. या सर्व मालिका न्यूझीलंड संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी ही माहिती दिली. सर्व मालिका या जैव-सुरक्षित वातावरणात खेळविल्या जाणार असल्याचे सांगतानाच डेव्हिड ... Read More »

पेन, विराट सर्वोत्तम कप्तान ः फैझ फझल

ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टिम पेन व टीम इंडियाचा विद्यमान कप्तान विराट कोहली हे दोघे सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम कसोटी कर्णधार आहेत, असे टीम इंडियाचा माजी सलामीवीर व देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवी खेळाडू फैझ फझल मत व्यक्त केले आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणार आहे. त्यावेळी या दोघांमधील द्वंद्व पहायला मिळणार आहे. भारताने मागील वर्षी ऑस्ट्रेलियन भूमीवर मालिका जिंकली ... Read More »

टी-ट्वेंटी विश्‍वचषकात खेळण्याबाबत साशंक

न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रॉस टेलर याने भारतात पुढील वर्षी होणार्‍या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेत खेळण्याबाबत साशंक असल्याचे म्हटले आहे. मागील आठवड्यात आयसीसीने यंदाची विश्‍वचषक स्पर्धा स्थगित करत २०२२ साली होणार्‍या विश्‍वचषक स्पर्धेचे हक्क ऑस्ट्रेलियाला दिले होते. क्रिकेटचे संचालन करणार्‍या जगातील सर्वोच्च संस्थेने पुढील वर्षीच्या टी-ट्वेंटी विश्‍वचषकाचे हक्क भारताकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातच रॉस टेलर याने टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये ... Read More »

उत्सव साजरा करताना

  कोरोनाचे विघ्न सर्वत्र फैलावत चालले असताना विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाचे वेध गोमंतकाला लागले आहेत. हा शुभंकर श्रीगणेश येईल आणि कोरोनाचा कहर दूर सारील अशी जनतेला आशा आहे, कारण सद्यपरिस्थितीत त्याचाच आधार तिला राहिलेला आहे. मात्र, गोमंतकाचा हा सर्वांत मोठा उत्सव साजरा करीत असताना भोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन काही दंडकांचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक असणार आहे. सरकारने एकदाची ही नियमावली जारी ... Read More »

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार पार

>> आणखी ३१७ जण सापडले पॉझिटिव्ह >> दिवसभरात ५ रुग्णांचा झाला मृत्यू राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने काल नऊ हजारांचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या ९०२९ झाली आहे. काल सोमवारी नवीन ३१७ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सध्याची रुग्णांची संख्या २७४१ झाली आहे. काल दिवसभरात आणखीन पाच रुग्णांचे निधन झाले असून कोरोना बळींची संख्या ८० झाली आहे. आणखी २१३ रुग्ण बरे ... Read More »

फोंड्यात दुसरे कोविड इस्पितळ सुरू : मुख्यमंत्री

>> कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यास सुरुवात फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळाचे कोविड हॉस्पितळात रूपांतर करण्यात आले असून फोंडा परिसरातील नागरिकांना फर्मागुडी येथील दिलासा केंद्रात वैद्यकीय सुविधांची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळाचे दुसर्‍या कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची कार्यवाही सुरू करण्यात ... Read More »

म्हापसा मासळी मार्केटमधील १८ विक्रेते कोरोना पॉझिटिव्ह

म्हापसा शहरात काल कोरोनाचे २१ रुग्ण सापडले आहेत. त्यात म्हापसा मासळी मार्केटमधील १८ मासळी विक्रेते बाधित सापडल्याने शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. मागच्या पाच दिवसांपूर्वी मासळी मार्केट संघटनेच्या अध्यक्षांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झालेले १८ पैकी १४ मासळी विक्रेते म्हापसा शहरातील विविध भागामध्ये राहत आहेत. तर ४ मासळी विक्रेते शेजारील गावांतील आहेत. काल मरड २, खोर्ली ४, गणेशपुरी ... Read More »

आमदार अपात्रता याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी होणार आहे. तथापि, या अपात्रता याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलावी अशी विनंती अर्जाद्वारे दोघा प्रतिवादींनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे या याचिकेवरील नियोजित सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या याचिकेतील प्रतिवादी क्रमांक १ गोवा विधानसभा सभापतींच्यावतीने सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांकडे सुनावणी दोन आठवड्यांनी पुढे ... Read More »

पुन्हा राज्यभर मुसळधार

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. पणजी शहरात काल सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० यावेळेत सुमारे १.३७ इंच पावसाची नोंद झाली आहे. राजधानी पणजीसह पेडणे, म्हापसा, डिचोली, सत्तरी, फोंडा, धारबांदोडा, सांगे, केपे, काणकोण, ओल्ड गोवा, मडगाव आदी परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. राज्यात आत्तापर्यंत १०८.९२ इंच ... Read More »

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतःच ट्विट केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कोरोनाचेही उपचार सुरूच होते. आता त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती इस्पितळातील सूत्रांनी दिली आहे. काल कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रणव मुखर्जींना दिल्लीतल्या आर्मी रुग्णालयात ... Read More »