स्वास्थ्यरक्षणात योगाची अष्टांगे

 डॉ. मनाली महेश पवार व्यायामातून कमीत कमी श्रम खर्चून त्यातून जास्तीत जास्त क्षमता तयार व्हावी अशी अपेक्षा आहे. व्यायाम पद्धतीत फक्त मांस, सांधे, स्नायू यांची क्षमता सुधारून पुरेसे नाही, तर माणसाच्या मज्जासंस्थेस, चेतासंस्थेसही योग्य व्यायाम दिला पाहिजे. दिवसेंदिवस स्वास्थ्यासाठी जगणे क्लिष्ट होत आहे. शारीरिक श्रम कमी करणार्‍या सोयी- यंत्रे, वाहने, उपकरणे- उपलब्ध झाल्या. शारीरिक श्रम कमी झाले. मात्र माणसाच्या मनाला ... Read More »

योगक्षेमं वहाम्यहम्

 डॉ. व्यंकटेश हेगडे ध्यान ही योगाची श्रेष्ठ अवस्था. योग ज्याच्या कणाकणात बहरला त्याच्या व्यक्तिमत्त्वातच एक प्रगल्भता, सकारात्मकता, सृजनशीलता व क्रियाशीलता बहरते. योगातून आध्यात्मिक प्रगतीही होते. योग म्हणजे शरीर आणि मन यांचे मीलन. आम्हाला शरीर आहे आणि न दिसणारे मनही आहे. शरीरात जेव्हा कुठलंही दुखणं नसतं, शरीर जेव्हा तंदुरुस्त असतं, तसंच मन तेव्हा विचारांतून व विकारांतून मुक्त असतं. मनात मत्सर, राग, ... Read More »

योग माहात्म्य

 डॉ. पंकज अरविंद सायनेकर येणार्‍या काळात ‘योग’ हा प्रत्येकाच्या जीवनात फार महत्त्वाची भूमिका निभावेल यात शंका नाही. फक्त २१ जून या एका दिवसापुरता साजरा न करता, योगदिनाच्या शुभमुहूर्तावर असा निश्चय करू की स्वतःच्या जीवनात थोड्या प्रमाणात का होईना पण योग ‘जगण्याचा’ आणि जपण्याचा प्रयत्न करीन. योगस्थः कुरु कर्माणि सङ्गत्यक्त्‌वा धनंजय| सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्चते॥ (भ.गी. २.४८) येथे योगाची ... Read More »

गौरवशाली योग परंपरा

सुदर्शन (केपे) संसाररूपी भट्टीत पोळलेल्यांना मनशांती देणारी, व्याधीग्रस्तांना शारीरिक आणि मानसिक तापापासून मुक्त करणारी, योगसाधकांना जीव-शिवाची भेट घडवून आणणारी, मानवांची मोक्षपदाची अंतिम इच्छा पूर्ण करणारी ही योगविद्या म्हणजे आमच्या परोपकारी पूर्वजांनी जगाच्या कल्याणासाठी जतन करून ठेवलेला अनमोल खजिना आहे. विसाव्या शतकातील प्रारंभी एका नरेंद्राने (स्वामी विवेकानंदाने) अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत सहभाग घेऊन भारतीय तत्त्वज्ञानाची आणि अध्यात्माची दिव्य गुढी उभारून भारताच्या गौरवशाली-वैभवशाली संस्कृतीची ... Read More »

सुसंवाद व शांतीसाठी योगसाधना

डॉ. सीताकांत घाणेकर लाखो लोकांना कोरोनाची लागण होत आहे. लाखो रोगी मृत्युमुखी पडत आहेत… आणि त्याला एक उत्तम उपाय म्हणजे प्रत्येकाने स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवणे. यासाठी योगसाधना अत्यंत उपयोगी आहे. २१ जून… आंतरराष्ट्रीय योगदिन. दरवर्षी नियमित येतो… कारण काळ कुणासाठी थांबत नाही. दिवसामागून दिवस जातात, वर्षामागून वर्षे जातात, विविध महत्त्वाचे दिवस येतात… त्यांतीलच हा एक दिवस! विश्‍वातील शेकडो राष्ट्रे व लाखो ... Read More »

योग ः आत्म्याचे परमात्म्याशी मीलन

तुम्ही युवक असा की वयोवृध्द, निरोगी असा की आजारी, योगाभ्यास सर्वांसाठी लाभदायी आहे आणि तो सर्वांना प्रगतिपथाकडे घेऊन जातो. वयपरत्वे आपली आसनांची समज अधिक परिपक्व होऊ लागते. मग आपण शारीरिक आसनांसोबत अंतर्गत सूक्ष्मतेवर अधिक कार्य करू लागतो. ‘योग’ हा शब्द ‘युज’ या संस्कृत धातूपासून बनलेला आहे, त्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. योग ही भारतातील पाच हजार वर्षं प्राचीन ... Read More »

छुप्या प्रसाराची चिन्हे

गोव्यातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सुरवातीला गोव्याबाहेरून येणार्‍या प्रवाशांपुरती ती सीमित राहिली. नंतर मांगूरहिल प्रकरण घडले. तेथून तो गोव्याच्या इतर भागांत पोहोचला. मात्र, आता मडगाव, बेती, केपे, कुडतरी, राय, पर्वरी, चिंचिणी आदी अनेक नवनव्या ठिकाणी कोणतीही पार्श्वभूमी नसलेले नवे रुग्ण आढळून येत आहेत ही निश्‍चितच चिंतेची बाब आहे. गोवा आता कोरोनाच्या स्थानिक संक्रमणाकडून सामाजिक संक्रमणाकडे वाटचाल तर करीत ... Read More »

गरजेनुसार मर्यादित भाग निर्बंधित ः मुख्यमंत्री

राज्यातील ज्या ज्या भागात कोरोनो पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढते त्या भागात गरजेनुसार लहान – लहान भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येणार्‍या भागातील नागरिकांच्या स्वॅब चाचण्या केल्या जात आहेत. तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढणार्‍या ... Read More »

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६०७

>> नवीन २० पॉझिटिव्ह, एकूण ११८ जण कोरोनामुक्त राज्यात काल नवीन २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या ६०७ वर पोहोचली आहे. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे ९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ७२५ झाली असून आत्तापर्यंत ११८ रुग्ण बरे झाले आहेत. चिंबलमध्ये नवीन २ रुग्ण इंदिरानगर चिंबलमध्ये ... Read More »

लडाखमध्ये घुसखोरी नाही

>> सर्वपक्षीय बैठकीत मोदींची ग्वाही लडाखमध्ये चीनकडून कोणत्याही प्रकारची घुसखोरी केलेली नाही. सीमेवर आपले जवान पर्वताप्रमाणे ठाम उभे आहेत अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिली. काल चीनद्वारे लडाखमध्ये झालेल्या चकमकीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्यावेळी त्या बैठकीनंतर ते बोलत होते. आपले लष्कर, जवान हे देशाची रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पुढच्या रणनीतीसाठी सगळ्या पक्षांनी दिलेल्या सूचना या ... Read More »