राज्यात तीन नवीन कोविड केअर सेंटर

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्य प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. मडगाव येथे कोविड इस्पितळामधील २२० खाटा कमी पडत असल्याने राज्यात कोविड केअर सेंटर सुरू केली जात आहेत. राज्यात शिरोड्यानंतर केपे, वास्को आणि कोलवा येथे नवीन तीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली आहेत. दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनानेकेपे सरकारी महाविद्यालयाची इमारत आणि सभागृह ताब्यात घेतले आहेत. तसेच, ... Read More »

एनआयसीचे सरकारला अनमोल साहाय्य

>> कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विविध ‘ई-सेवा’ राष्ट्रीय माहिती केंद्र गोवाने (एनआयसी) कोविड-१९ या महामारीच्या काळात राज्य सरकारच्या सर्व सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी मोलाचे साहाय्य केले आहे. एनआयसी, गोवाने कोविड महामारीच्या काळात केंद्र व राज्य सरकारी कार्यालयांवर माहिती तंत्रज्ञानासंबंधी कोणत्याही गुंतागुंतींचा प्रभाव पडू नये म्हणून आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या. कोविड महामारीमुळे केंद्र आणि राज्य सरकारचा जास्तीत जास्त कारभार केवळ ’ई-सेवा’ पद्धतीने चालविला ... Read More »

चौदा दिवसांत राज्यात १९ इंच पावसाची नोंद

राज्यात मागील चौदा दिवसात सुमारे १८.९६ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पावसाचे सामान्य प्रमाण अंदाजापेक्षा ५३ टक्के जास्त आहे. दरम्यान, रविवारी पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने नागरिकांना उष्णतेला तोंड द्यावे लागले. मागील चोवीस तासात उत्तर गोव्यात जोरदार पाऊस पडला. पेडणे येथे सर्वाधिक ४.७४ इंच, ओल्ड गोवा येथे ४.३५ इंच पावसाची नोंद झाली आहे. साखळी येथे ३.६२ इंच, पणजी येथे २.७४ ... Read More »

निलंबनानंतर बदलली विचार प्रक्रिया

>> लोकेश राहुलने सांगितले यशाचे रहस्य ‘कॉफी वुईथ करण’ या कार्यक्रमात महिलांसंबंधी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झाल्यानंतर मला खडबडून जाग आली व मी माझी खेळासंबंधीची विचार प्रकिया पूर्णपणे बदलून टाकली. या बदललेल्या प्रक्रियेमुळे मी सातत्यपूर्ण कामगिरी करू शकलो, असे भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याने काल रविवारी सांगितले. राहुल व हार्दिक पंड्या यांना मागील वर्षी आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक ... Read More »

प्रेक्षकांच्या अनुपस्थितीचा फायदा

>> विंडीजचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांचे मत स्टेडियममधील पाठिराख्यांच्या अनुपस्थितीचा तसेच जवळपास दोन महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर इंग्लंडचा संघ मैदानावर उतरण्याचा फायदा वेस्ट इंडीज संघाला होऊ शकतो, असे विंडीज संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांना वाटते. वेस्ट इंडीजचा संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. पुढील महिन्यात या मालिकेला सुरुवात होणार आहे. कॅलेंडर वर्षातील क्रिकेट मार्च महिन्याच्या मध्यावर स्थगित करण्यात आल्यानंतर ... Read More »

कोरोना, शेतकरी आणि शेती

डॉ. श्रीरंग जांभळे शेती व शेतकर्‍यांबद्दल समाजामध्ये सहानुभूती वाढत आहे. शेती उत्पादनासाठी शेतकरी घेत असलेले कष्ट व त्याला भेडसावणारे प्रश्‍न, येणार्‍या अडचणी यांबाबत समाज दखल घेताना दिसतो. नवीन पिढीतील उच्च विद्याविभूषित व कष्टकरी युवक शेतीकडे एक आव्हानात्मक व्यवसाय म्हणून पाहत त्याकडे आकर्षित होत आहेत. नवीन पिढी शेतीकडे परत येण्यासाठी संबंधित शिक्षणाच्या योग्य संधी उभ्या करून सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणा बळकट करणे ... Read More »

समुद्र, समुद्राची रूपे…

डॉ. सोमनाथ कोमरपंत समुद्राची अथांगता आणि भव्यता पाहून त्याचे धीरगांभीर्य आणि धीरोदात्तता जाणवते. त्याच्या लाटांचे लास्य आणि तरंगांचे विभ्रम अनुभवताना त्याच्या अंतरंगातील धीरलालित्य प्रत्ययास येते. असा हा अभिजात समुद्र आणि त्याची अभिजात रूपं… समुद्र मला आवडतो. बालपणापासून मी समुद्र पाहत आलेलो आहे. समुद्रानुभूती ही आगळी-वेगळी अनुभूती आहे. समुद्र पाहता पाहता समुद्ररूपात एकरूप होणे ही एक प्रक्रिया आहे. आपण सारे बिंदू ... Read More »

हॉंगकॉंगच्या जनतेचे निर्णायक युद्ध

–  दत्ता भि. नाईक तैवानवर हक्क गाजवण्याच्या तयारीत असलेल्या चीनला हॉंगकॉंगची जनता नाकीनऊ आणत आहे. साध्या नागरी हक्कांच्या मागणीसाठी सुरू झालेले हे आंदोलन चीनच्या तकलादू ऐक्यात सुरुंग लावील की काय अशी परिस्थिती उद्भवलेली आहे.   आर्थिक महासत्ता बनण्यासाठी चीनची जशी धडपड चालू आहे, त्याचप्रमाणे जगातील एक सामरिक सत्ता म्हणूनही नाव कमावण्याची हौस चिनी राज्यकर्त्यांमध्ये दिसून येते. मूलतः चीन हा फार ... Read More »

अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आठ कलमे

शशांक मो. गुळगुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षी जीडीपी वाढ ५ टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने पुढील आठ निर्णय राबवावेत. हे राबविण्यासाठी जास्त पैशांची गरज नसून राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. कोरोनामुळे देशाची आणि जागतिकसुद्धा अर्थव्यवस्था फार मोठ्या प्रमाणावर अडचणीत आली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षी जीडीपी वाढ ५ टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज ... Read More »

प्राणी-जंगल-माणूस

 पौर्णिमा केरकर माणसा तू कधी विचारच करीत नाहीस का? तुझा जन्म कशासाठी आहे… लाचारीने जगण्यासाठी? धनदौलत जमविण्यासाठी, स्वतःला आणि जगाला फसविण्यासाठी? कायमस्वरूपी द्वेष, मत्सराने कुढण्यासाठीच…? जगण्यातला आनंद कधी शोधशील? केरळमध्ये गर्भवती हत्तिणीची क्रूरतेने हत्या करण्यात आली. अननसामध्ये स्फोटके भरून ती तिला खायला देऊन त्याद्वारे तिच्या तोंडात विस्फोट घडवून आणला. हे कृत्य कोणी केलेले आहे ती स्वतःला माणसे समजतात, ही मोठीच ... Read More »