भारत – पाक चर्चेत मैत्रीसाठी मतैक्य

काश्मीर मुद्द्यावर घोषणा

काल नवी दिल्लीत झालेल्या भारत व पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील बैठकीत दोन्ही देशांत शांती व सहकार्याचा नवा अध्यायखुला करण्यावर मतैक्य झाले. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांच्यातील चर्चेत दहशतवाद रोखण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य करावे तसेच विभक्त काश्मीरच्या प्रगतीसाठी दोन्ही भागांत प्रवास आणि उद्योगवाढीस उत्तेजन द्यावे असे ठरले.

Read More »

अधिकार द्या किंवा जिल्हा पंचायती बरखास्त तरी करा

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचा प्रस्ताव

जिल्हा पंचायतीला विकासासाठी निधी देण्यात व जादा अधिकार बहाल करण्यास सरकारकडून कोणतीही पावले उचलण्यात आली नसल्याने या संस्था शोभेच्या बाहुल्या बनल्या असून त्या बरखास्त कराव्यात असा प्रस्ताव दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बैठकीत संमत करण्यात आला.

Read More »

बंद खाणींच्या पुनर्वसनाबाबत दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र द्या

उच्च न्यायालयाचा सरकारला आदेश

नेत्रावळी अभयारण्यातील बंद करण्यात आलेल्या खाणींचे पुनर्वसन कशा प्रकारे केले आहे, यासंबंधी दोन आठवड्यांच्या आत सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला दिला आहे.

वरील प्रकरणी गोवा फाऊंडेशनने न्यायालयात अर्ज केला आहे. डिसेंबर २००३ साली नेत्रावळी अभयारण्य परिसरातील सर्व खाणी बंद करण्याचा आदेश केंद्रीय उच्चाधिकार समितीने दिला होता. मुंबई उच्च न्यायालयानेही या निर्णयास मान्यता दिली होती. तेव्हापासून वरील परिसरातील खाणी टाकून दिल्या गेल्या होत्या. त्यांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने न झाल्याने अभयारण्यातील प्राण्यांवर परिणाम होत आहे. कायद्यानुसार खनिज काढल्यानंतर खाणींचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे.

Read More »

डायबेटिक मूट रुग्णांना दिलासा

पाय कापण्याचे संकट टळणार

गोव्यातील मधुमेहग्रस्तांपैकी डायबेटिक फूटझालेल्यांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे एका अभ्यासातून दिसून आले असून अशा रुग्णांचे पाय कापून टाकावे लागतात. परंतु अशा रुग्णांवर मडगाव येथील इस्पितळात उपचार सुविधा असून त्यामुळे भविष्यकाळात रुग्णांवर पाय कापण्याचा प्रसंग येणार नाही, असे प्रख्यात इंटरव्हेन्शल कार्डिओलॉजिस्ट डॉ. उदय खानोलकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

Read More »

धेंपे महाविद्यालयाचा यंदा सुवर्णमहोत्सव

कार्यक्रमांचे शुक्रवारी उद्घाटन

मिरामार येथील धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालय या वर्षी आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. सुवर्णमहोत्सवी वर्ष कार्यक्रमांचे औपचारिक उद्घाटन शुक्रवार दि. २९ जुलै रोजी संध्याकाळी ४.३० वा. दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या कार्डियम सभागृहात होणार आहे.

उद्घाटक म्हणून गोव्याचे राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू उपस्थित असतील. सन्माननीय अतिथी म्हणून गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर तर अध्यक्षस्थानी धेंपो धर्मादाय विश्‍वस्थ मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो असतील.

Read More »

नीलिमा मिश्रा, हरिश हांडे यांना मॅगसेसे पुरस्कार

जळगावमध्ये महिलांना स्वयंपूर्णतेचा वसा देणार्‍या नीलिमा मिश्रा, तसेच सौरदिव्यांमध्ये संशोधन करणारे हरिश हांडे या दोन भारतीयांना आशियाचे नोबेलम्हणून ओळखला जाणारा प्रतिष्ठेचा रमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.

Read More »

खासगीकरणाविरुद्ध ५ रोजी बँक कर्मचारी संपावर

पणजीतही धरले धरणे

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करू नये या मागणीसाठी येत्या ५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी बँक संपाच्या पार्श्‍वभूमीवर काल युनायटेड फोरम ऑफ बँक युनिएन्सतर्फे येथील कॅप्टन ऑप स्पोटर्‌‌स इमारतीसमोर धरणे धरून बँक कर्मचार्‍यांनी निदर्शने केली. या निदर्शनांत राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांतील कर्मचारी सहभागी झाले होते.

Read More »

आर्चबिशपना पणजी पोलिसांकडून समन्स सुपूर्द

Read More »

गॅस गळतीमुळे आग; युवक जखमी

Read More »

जितेंद्र देशप्रभू चौकशीस तयार

Read More »