पोलीस महानिरीक्षकांची मिझोरामला बदली

गोव्याची पोलीस महानिरीक्षक सुंदरी नंदा यांची मिझोरामला बदली झाली आहे.

Read More »

नवप्रभा – नवे तेज, नवी प्रभा…

Read More »

पणजीत पेट्रोल पंपच्या नियंत्रण कक्षास आग

 

३० लाखांचे नुकसान

Read More »

किरकोळ व्यापारक्षेत्रावर ‘मोठ्या माशां’चा घाला

मनोहर गो. सावंत, म्हापसा

पूर्वार्ध

सोमवार दि. २५ जुलैचा ‘मोठे मासे येत आहेत’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेला आपला अग्रलेख आवडला. आपण मांडलेले बहुतेक सर्व मुद्दे उल्लेखनीय असून त्यावर गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे. १९९१ साली माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळातील माजी अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीत जेव्हा केंद्र सरकारने जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारले, तेव्हाच हे मोठे मासे भारतात येणार याची चाहुल लागली होती. या मोठ्या माशांना वेळीच आळा घातला नाही किंवा प्रतिबंध केला नाही, तर त्याचा आपल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीवर फार मोठा परिणाम होणार आहे. सध्या जी भरमसाट बेकारी वाढलेली आहे, त्यात आणखी भर पडेल आणि त्याचबरोबर गरीबीही वाढेल. बेकारीतून समाजाला नवीन उपद्रव सोसावे लागतात. रिकामे हात जुगार, चोरी, दरोडे, खून, दहशतवाद यासारख्या समाजविघातक प्रवृत्तीकडे वळतात आणि देशाच्या एकात्मतेला आव्हान देतात, हा आजवरचा अनुभव आहे.

Read More »

भाजपाच्या इभ्रतीला तडा

भ्रष्टाचाराविरुद्ध देशव्यापी अभियान छेडणार्‍या भारतीय जनता पक्षाला अखेर स्वतःच्याच एका मुख्यमंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे घरची वाट दाखवावी लागली. येडीयुराप्पांवरील आरोपच एवढे गंभीर होते की त्यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करण्यावाचून भाजपाला गत्यंतर राहिले नव्हते. आजवर कॉंग्रेसविरुद्ध डागलेल्या तोफांची तोंडे स्वतःकडेच वळताना पाहून दुसरे काय करता आले असते? त्यामुळे पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक दिल्लीत झाली आणि त्यामध्ये येडीयुराप्पांसारख्या दक्षिणेतील पक्षाचा चेहरा असलेल्या एका ज्येष्ठ नेत्याच्या हकालपट्टीवर शिक्कमोर्तब झाले. स्वतः येडीयुराप्पा सत्ता सोडण्यास सहजासहजी तयार नव्हते. आपण निर्दोष असून आपल्याविरुद्धची दोन्ही प्रकरणे जुनी आहेत, शिवाय त्यासंदर्भात न्यायालयात खटले सुरू असल्याने आपण तेथे त्यांचा सामना करू असे कालपर्यंत त्यांचे म्हणणे होते. दिल्लीला जाणेही त्यांनी शेवटपर्यंत टाळले. शेवटी त्यांना रातोरात दिल्लीला बोलावून घेणे पक्षनेतृत्वाला भाग पडले. अवैध खाण धंद्यांची आणि रेड्डी बंंधूंच्या गैरव्यवहारांची पाठराखण करण्याबरोबरच येडीयुराप्पांविरुद्ध लोकायुक्त संतोष हेगडे यांनी दोन वैयक्तिक आरोप ठेवले आहेत. एक म्हणजे एका खाण कंपनीने स्वतःची आर्थिक स्थिती मजबूत नसतानादेखील येडीयुराप्पांच्या कौटुंबिक शैक्षणिक विश्वस्त संस्थेला दिलेली दहा कोटींची देणगी आणि दुसरा आरोप म्हणजे त्यांच्याकडून राचेनहळ्ळी येथील दीड कोटींच्या भूखंडाची खाण कंपनीने चढ्या दराने म्हणजे तब्बल वीस कोटींना केलेली खरेदी. राज्याच्या तिजोरीला गेल्या काही वर्षांत सोळा हजार कोटींचा गंडा घातला गेला, त्याचे येडीयुराप्पा नुसते मूक साक्षीदारच राहिले असे नाही, तर प्रत्यक्ष त्यांचाही या गैरकृत्यांत सहभाग होता, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई व्हावी अशी शिफारस लोकायुक्तांनी राज्यपालांकडे केलेली आहे.

Read More »

लोकपाल मसुद्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

अण्णांचा निषेध : १६ ऑगस्टपासून उपोषणाचा निर्धार

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात येणार असलेल्या भ्रष्टाचार प्रतिबंधक लोकपाल विधेयकाचा मसुदा काल केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. यात लोकपालांच्या कक्षेतून पंतप्रधान, न्यायपालिका तसेच खासदारांचे सभागृहातील वागणे वगळण्यात आले आहे. या विधेयकामुळे नागरी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून निषेध नोंदवला आहे. अण्णा हजारे यांनी निषेध नोंदवत हे सरकारी लोकपालविधेयक असल्याची प्रतिक्रिया नोंदवली.

Read More »

माध्यान्ह आहारातून पुन्हा विषबाधा

कुडतरी येथील १२ विद्यार्थी रुग्णालयात

वास्को येथील शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारामधून विषबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच काल कुडतरी येथील अवल लेडी ऑफ कार्मेल हायस्कुलातील १२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने त्यांना कुडतरी येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यात पाचवी व सहावीतील ६ मुलगे व ६ मुलांचा समावेश आहे.

Read More »

येडीयुराप्पांवर कारवाई

Read More »

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली येडीयुराप्पांवर कारवाईची शिफारस

कर्नाटकातील बेकायदेशी खाणींच्या व्यवहारासंबंधी २५,२२८ पानांचा अहवाल कर्नाटकचे लोकायुक्त न्या. संतोष हेगडे यांनी सादर केला. त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा, मंत्रिपदी राहिलेले रेड्डी बंधू तसेच अन्य अनेकजणांचा समावेश असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली आहे. लोकायुक्तांनी अहवाल काल सरकारला सादर केला. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात कारवाईची शिफारस राज्यपालांना करण्यात आली आहे.

Read More »

मळा तलाव प्रकरणी पर्रीकर व इतरांवर गुन्हा

मळा तळ्याचे सौंदर्यीकरण व बाजार पुनर्विकास प्रकल्पातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी पणजी पोलिसांनी विरोधी पक्ष नेते पर्रीकर (एनजीपीडीएचे माजी सदस्य), पर्यटन मंत्री व उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाचे माजी चेअरमन नीळकंठ हळर्णकर, आमदार व एनजीपीडीएचे विद्यमान चेअरमन रेजिनाल्डो लॉरेन्स, एनजीपीडीएचे सचिव सदस्य अशोककुमार, पीपीपीचे संचालक व एनजीपीडीएचे सदस्य अनुपम किशोर, शहर आणि नगर नियोजनाचे सदस्य मोराद अहमद, गुजरातस्थित मास्टर ऍण्ड मास्टर असोसिएशन कंपनीचे उदय मास्टर, एनजीपीडीएचे सहाय्यक अभियंता मोहन साकेतवार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७, , , १०, ११, १२ व १३ कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे.

Read More »