‘टोल’च्या वादामुळेच अडले जुवारी पुलाचे बांधकाम

टोलच्या प्रश्‍नामुळेच १७ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरील जुवारी पुलाचे बांधकाम अडल्याची माहिती साबांखामंत्री चर्चिल आलेमांव यांनी दिली.

जुवारीवर समांतर पुलाची अत्यंत गरज आहे, याची सरकारला कल्पना आहे. त्यामुळे महामार्ग रुंदीकरणासाठी मार्गावरील अनेक घरे वाचविण्याचे कामही केले होते, परंतु सभागृह समितीने टोलला विरोध केला.

Read More »

येडीयुराप्पाच हवेत

भाजप आमदार, खासदारांचा आग्रह

भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या आदेशानंतर बी. एस. येडीयुराप्पा यांनी मुख्यमंंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शविली. मात्र काल बेंगलोर येथे नवीन नेत्याच्या निवडीसाठी झालेल्या भाजपच्या प्रदेश व केंद्रीय नेत्यांच्या संयुक्त बैठकीत येडीयुराप्पा हेच मुख्यमंत्रीपदी हवेत असा आग्रह त्यांच्या समर्थक आमदार व खासदारांनी धरला. त्यामुळे भाजपसमोर नवीन पेच निर्माण होऊन बैठकच आवरती घ्यावी लागली.

Read More »

विविध खात्यांत ८०० पदांना मंजुरी

आगामी विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून सरकारने प्रशासनात मोठ्या प्रमाणात पदे तयार करून नोकरभरती करण्याचे सत्र सुरू केले आहे.

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वाहतूक, पशुसंवर्धन, आरोग्य, वन आदी खात्यात मिळून सुमारे ८०० पदे तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

Read More »

मुरगाव बंदराच्या सीमांच्या फेररचनेचा केंद्राकडे प्रस्ताव

मुरगांव बंदराच्या सीमांची फेररचना करण्यासाठी केंद्रीय जहाज बांधणी, मंत्रालयाकडे अधिकृतरित्या प्रस्ताव देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

Read More »

अण्णांना ‘जंतर मंतर’ला उपोषणास मनाई

जंतर मंतर येथे दि. १६ ऑगस्टपासून आमरण उपोषणासाठी अण्णा हजारे यांना परवानगी नाकारण्याचेे दिल्ली पोलिसांनी ठरविल्याचे कळते. या मुद्द्यावर काल दिल्ली पोलीस आयुक्त व केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांची चर्चा झाली. दरम्यान, जंतर मंतर ऐवजी त्यांनी दिल्लीच्या उपनगरी भागात बुरारी किंवा अजमल खान पार्कमध्ये पर्यायी जागा सुचविण्यात आली आहे.

Read More »

बेल्लारीच्या खाणींना सुप्रीम कोर्टाचा ‘काम बंद’ आदेश

कर्नाटकातील बेल्लारी भागातील सर्व खाणींना ताबडतोब काम बंद करावे असे सुप्रीम कोर्टाने काल सांगितले. पुढील आदेश देण्यात येईपर्यंत बेल्लारीतील सर्व खाणकाम ताबडतोब बंद करण्यात यावे, असा आदेश काल मुख्य न्यायमूर्ती एस. एच. कापाडिया, न्या. स्वतंत्र कुमार आणि न्या. आफताब आलम यांच्या खंडपीठाने दिला.

Read More »

धेपे महाविद्यालयाचे आज सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण

गोवा मुक्तीनंतर उच्च शिक्षणाची दारे खुली करणारी पहिलीवहिली संस्था गोवा मुक्तीनंतर येथील नव्या पिढीला उच्च शिक्षणाचे द्वार खुले करून देणार्‍या पहिल्यावहिल्या शिक्षणसंस्थेचा आज सुवर्णमहोत्सव साजरा होत आहे. मिरामार येथील धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालयाची स्थापना गोवा मुक्तीनंतर अवघ्या सहा महिन्यांत १९६२ साली झाली. तेव्हापासून आजच्या सुवर्णमहोत्सवी क्षणापर्यंत या महाविद्यालयाने आधुनिक गोव्याचा पाया रचण्यात महत्त्वाचे योगदान देणारे अनेक कर्तृत्ववान तरुण - तरुणी घडवले, त्यांना प्रत्यक्ष जीवनाच्या समरांगणामध्ये ठामपणे पाय रोवून उभे राहण्याची ताकद दिली. गोव्याच्या विकास वाटचालीमध्ये या शिक्षणसंस्थेने दिलेले योगदान अतुल्य आहे.

Read More »

मडगावात दोन सराफी दुकाने फोडली

स्थानिकांनी हटकल्याने चोरट्यांचा तिजोरी टाकून पोबारा

उत्तर गोव्यांतील दोन ठिकाणी चोर्‍यानंतर मडगाव शहरात दोन सराफी दुकानात काल चोरी झाली. हॉली स्पिरिट चर्चाची फंडपेटी फोडून ८ लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम पळविली गेली. चोराना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. शिरवडे येथे दारूचे बार उघडे असल्याने, त्या लोकाना बघून चोरांनी सोनेचांदी व रोखड रक्कमेने भरलेली तिजोरी तेथे टाकली व ते पळाले. सुदैवाने एक कोटीपेक्षा जास्त ऐवज मिळाला.

Read More »

फक्त पाच मतांच्या आघाडीने प्रतिमा कुतिन्हो युवा कॉंग्रेस अध्यक्ष

प्रदेश युवक कॉंग्रेसच्या चुरशीच्या निवडणुकीत प्रतिमा कुतिन्हो यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. कुतिन्हो यांना ३४० मते तर झेवियर आलवितो पीटर फिएल्लो यांना ३३५ मते मिळाली. फक्त पाच मतांची आघाडी कुतिन्हो यांना अध्यक्षपद देऊन गेली.

राज्य समितीवर निवडून आलेल्या अन्य सदस्यांमध्ये अदित्य अहमद तिनवाले, गौरी सुभाष शिरोडकर, गौतम संतोष भगत, गोकुळदास सावंत, जितेश कामत, मुल्ला उर्फान, नेहा खोर्जुवेकर, सुमंगल गावस, सुनिल सुभाष नाईक, सुनिल शेटये, उबालिदनो डायस व झेवियर फिएल्लो यांचा समावेश आहे. उत्तर गोवा अध्यक्षपदी वरद म्हार्दोळकर तर दक्षिण गोवा अध्यक्षपदी शिरीष नाईक यांची निवड झाली.

Read More »

नोकरीसाठी जादूटोणा; गायब झाला खजिना

नोकरी मिळविण्यासाठी भोंदू बाबाच्या नादाला लागून जादूटोणा केला आणि घरचे दागिने घालवून बसण्याची पाळी म्हापशात लोटली येथील एकावर आली.

जादूटोणा करून नोकरी मिळवून देतो असे सांगणार्‍या भोंदू बाबाकडे लोटली येथील आगोस्तिन मर्नांडिस यांनी आपल्या कुटुंबाचे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने दिले. ते घेऊन भोंदू पसार झाला असून याबाबत म्हापसा पोलिसांत तक्रार नोंदविल्यानंतर त्या ङ्गसाधूफचा शोध सुरू आहे.

Read More »