गावडोंगरी येथे बस उलटून १३ जखमी

गावडोंगरी येथील एका वळणावर दुसर्‍या वाहनाला बाजू देताना रुक्मिणीबस उलटून १३ व्यक्ती जखमी झाल्या. सुदैवाने मनुष्यहानी टळली. सर्व जखमी प्रवाशांना काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार दिल्यानंतर मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठविण्यात आले.

Read More »

श्रावण महिन्याच्या प्रारंभीच मच्छीफारी बंदी उठणार

आजपासून श्रावण महिना सुरू होत असतानाच उद्या सोमवारपासून राज्यात मच्छीमारी मोसम सुरू होत आहे. रविवारी रात्रौ १२ वाजल्यापासून राज्यातील मच्छीमारी बंदी उठवली जाणार असल्याचे मच्छीमारी खात्याचे उपसंचालक एन. व्ही. वेर्लेकर यांनी सांगितले. मात्र, तसे असले तरी खर्‍या अर्थाने मच्छीमारी १ ऑगस्टपासून जोरात सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read More »

सोन्याने गाठला नवा उच्चांक

लग्नसराईचे दिवस नसले तरी सोन्याने उच्चांक गाठला असून काल राजधानी दिल्लीत सोन्याचे भाव दीडशे रुपयांनी वाढून ते प्रति १० ग्रॅम २३,६२० वर पोहोचले होते. गुंतवणूकदार व साठवणूकदार यांनी जोरात खरेदी केल्याने ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येते.

Read More »

द्रमुकच्या नेत्यांवर जयललितांची कारवाई

Read More »

युवकांनी आव्हाने पेलण्यास शिकावे : राज्यपाल

गोवा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. दिलीप देवबागकर यावेळी उपस्थित होते. त्यांचेही भाषण झाले. धेंपे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी स्वागत केले. विश्‍वस्थ पल्लवी धेंपो, विश्‍वासराव धेंपे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

राज्यपालांनी धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या संस्थापकांच्या दूरदृष्टीचे यावेळी कौतुक केले. त्यांनी पद्मश्री स्व. वसंतराव धेंपे यांच्या योगदानाची विशेष दखल घेतली आणि त्यांच्या पुढाकारानेच या महाविद्यालयातून १९६५ साली पदवीधरांची पहिली तुकडी बाहेर पडली, असे नमूद केले.

Read More »

आजची पत्रकारिता… विचार करण्याची वेळ आलीय!

वाचक/प्रेक्षकांचा आकडा यात प्रचंड वाढ, मनोरंजक मजकुरात बेसुमार वाढ, या व्यवसायातील गुंतवणूक व नफेबाजीत प्रचंड वाढ, आणि म्हणजेच प्रसारमाध्यमे म्हणजे एक महाप्रचंड खाजगी उद्योग म्हणून देशात विस्तारत आहे हे नि:संशय. परंतु प्रसार माध्यमांचे सामाजिक कर्तव्य, त्या दृष्टीने त्यांनी द्यावयाच्या लोकहिताचा मजकूर, प्रसारमाध्यमांची विश्‍वासार्हता व जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पुरस्कर्ती म्हणून त्यांची जबाबदारी या गोष्टींचा विचार करायचा झाल्यास आपली प्रसार माध्यमे त्या कसोटीला खरेच उतरतात होय अशी शंका माननीय उपराष्ट्रपतींनी उपस्थित केली होती. आणि गंमत म्हणजे नेमकं याच वेळी इंग्लंडचे ‘मर्डोक - पुराण’ रंगू लागले.

Read More »

किरकोळ विक्री क्षेत्रावर ‘मोठ्या माशां’चा घाला

मनोहर गो. सावंत, म्हापसा

उत्तरार्ध

या जागतिकीकरणामुळे व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनलेअसे तर होणार नाही ना? कारण आजही देशातील नागरिक १५० वर्षांपूर्वीचा इतिहास विसरू शकलेले नाहीत. आज भारतात छोटे - मोठे बरेच व्यापार, उद्योग, व्यवसाय आहेत, पण जागतिक स्पर्धेत पाय ठेवताना परकीय कंपन्या, संस्था यांनी आपला मोर्चा भारतीय बाजारपेठेकडे वळविला आहे. त्यातून देशाला जरी परकीय गंगाजळी मिळत असली, तरी आपली बाजारपेठ आपण गमावत चाललो आहोत, हेही विसरता कामा नये. परकीय व्यापार, उद्योग, व्यवसाय संस्थांच्या आगमनामुळे भारतीय उद्योजकांना स्पर्धेस सामोरे जावे लागणार आहे आणि स्पर्धा प्रामाणिक असणार नाही, तर ती जीवघेणी आणि गळेकापू असेल. उदाहरण द्यायचे झाल्यास विदेशी मॉडेलच्या गाड्या, संगणक, मोबाईल फोनचे घ्या.

Read More »

ज्योकपाल नको, लोकपाल हवा

देशातील वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध एक सक्षम लोकपाल यंत्रणा अस्तित्वात यावी यासाठी अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्नांचा डोंगर पोखरूनही शेवटी सरकारधार्जिण्या मसुद्याचा उंदीर हाती लागला आहे. सरकारने लोकपाल विधेयकाच्या अंतिम मसुद्यात जे कच्चे दुवे आणि पळवाटा ठेवल्या आहेत, त्या पाहिल्यास भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत सामील होणे तर दूरच, उलट त्यात अडथळे आणण्याचाच सरकारचा हेतू आहे की काय असा प्रश्न पडतो. लोकपालसंदर्भात नागरी संघटनांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करणे म्हणजे लोकपालच्या रूपाने अनिर्बंध शक्ती निर्माण करणे ठरले असते व लोकशाही व्यवस्थेशी ते विसंगत ठरले असते हे काही अंशी खरे असले तरीदेखील सध्याच्या मसुद्यामध्ये ज्या त्रुटी ठेवल्या गेल्या आहेत, त्या ठेवण्याची खरोखरच आवश्यकता होती का हाही प्रश्न उपस्थित होतो.

Read More »

अकरावीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप

मुलीच्या जन्माचे प्रमाण वाढावे म्हणून सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी ममताया योजनेखाली मुलीच्या जन्मानंतर मातेला ५ हजार रुपये सकस आहारासाठी, तर कन्यादान योजनेखालील मदतीत १५ हजारावरून २५ हजार रुपये वाढ करण्याचे ठरविले असून सदर योजना गेल्या एप्रिलपासून लागू केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यानी दिली.

Read More »

दोन लाख राख्यांद्वारे मातृभाषेचा संदेश

गणेशोत्सवातही जनजागरण करण्याचा भाषा मंचाचा निर्णय

इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध रक्षाबंधन, सार्वजनिक गणेशोत्सव आदी सणांच्या माध्यमांतूनही करण्याचा निर्णय भारतीय भाषा सुरक्षा मंचाने घेतला असल्याची घोषणा काल मंचाच्या निमंत्रक शशिकलाताई काकोडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. जनतेने या उत्सवांच्या माध्यमातून मातृभाषांवरील अन्यायाचा विषय मांडावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. मातृभाषेवरील अन्यायाबाबत संदेश देणार्‍या किमान दोन लाख राख्यांचे वाटप करण्याचे मंचाने ठरवले असून गणेश देखाव्यांमधून शैक्षणिक माध्यमाचा विषय मांडावा, आरत्या, गजर, आवाहनातही मातृभाषांवरील अन्यायासंदर्भात समर्पक श्लोकांचा वापर करावा असे आवाहन काकोडकर यांनी जनतेला केले आहे.

Read More »