ब्रेकिंग न्यूज – आमदार तवडकर, वासुदेव गावकर आणि उटा नेते प्रकाश वेळीप यांना अटक

Read More »

जितेंद्र देशप्रभू यांना अटक

Read More »

गीता श्रेष्टच, परंतु सक्ती का करता?

- देवेंद्र कांदोळकर, तुये - पेडणे

‘‘गीता ही सूर्यासारखी आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने गीतेचा आदर केलाच पाहिजे. ज्या कोणाला गीतेचा आदर करता येत नाही, त्याला आपल्या देशात स्थान नाही’’ हे उद्गार कोण्या धार्मिक नेत्याचे किंवा हुकूमशहाचे नव्हेत, तर लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांचे आहेत.

Read More »

महागाई डोईजड

वाढत्या महागाईवर संसदेत झालेल्या वादळी चर्चेनंतर तरी सरकार सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या या प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य देईल अशी अपेक्षा आहे. अन्नधान्याचे वाढते दर, इंधनाचे वाढते दर, त्यातून वाढणारा उत्पादन खर्च, त्यामुळे झालेली दरवाढ या सार्‍या दुष्टचक्रात सामान्य माणूस अक्षरशः भरडून निघाला आहे. आर्थिक विकास दर वाढवण्याच्या धडपडीत वाढत्या महागाईच्या निर्देशांकाकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. एकीकडे प्रचंड भ्रष्टाचार आणि दुसरीकडे या देशाच्या सर्वसामान्य नागरिकाला रोजचे अन्न मिळवण्याची मारामार असे अत्यंत अस्वस्थ करणारे चित्र देशात पाहायला मिळते आहे. मध्यमवर्गालाच जिथे महागाईची जबर झळ बसते आहे, तिथे दारिद्य्ररेषेखालील माणसे कशी जगत असतील? तुटपुंज्या मजुरीत आला दिवस कसा ढकलत असतील? गेली किमान दोन वर्षे महागाईने उग्र रूप धारण केलेले आहे. गतवर्षी अन्नधान्याच्या किंमती प्रचंड कडाडल्या. त्यातून आपण सावरतो न सावरतो, तोच इंधन दरवाढीमुळे पुन्हा एकदा जनतेला जबर फटका बसला. रिझर्व्ह बँक आपल्या परीने वाढती महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असली, तरी अर्थव्यवस्थेवरचा ताण कमी करण्यास त्यांचे प्राधान्य आहे.

Read More »

जितेंद्र देशप्रभू यांना अटक

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ७ ते १३, भारतीय दंड संहितेतील कलम २१७,२१८, ३८०, ४०५, ४०९, ४२०, ४६८, ४७१ तसेच नगर आणि नियोजन कायद्याचे कलम १७ अ, १७ ब, खाण व खनिकर्म कायदा १९५७ (बेकायदा खाण व खनिज मालाची वाहतूक व साठवणूक कायदा १९५७) तसेच वन कायदा, पाणी प्रदूषण कायदा व पर्यावरण कायद्यातील नियम २००४ खाली देशप्रभू यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मंगलदास देसाई यांनी दिली.

Read More »

लोकपाल विधेयक लोकसभेत सादर

त्यावर नारायणसामी म्हणाले, हे विधेयक आता सभागृहाच्या मालकीचे असून ते यानंतर सभागृह समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले जाईल.

संसदेत सादर केलेल्या लोकपाल विधेयकातून पंतप्रधानांचे पद वगळण्यात आले आहे. मात्र पदावरून गेल्यानंतर त्यांच्यावर लोकपाल कारवाई करू शकतात. न्यायपालिका आणि खासदारांचे संसदेतील आणि सभागृह समितीतील वर्तनही लोकपालांच्या कक्षेतून वगळले आहे.

Read More »

इंग्रजीस अनुदानाचा निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय

Read More »

प्रवासी कारगाड्यांसाठी डिझेलचे वेगळे दर लागू करण्याचा विचार

पेट्रोलच्या तुलनेत डिझेल स्वस्त असल्याने अनेक लोक पेट्रोल कार ऐवजी डिझेल कार घेणे पसंत करीत असले तरी सरकारने प्रवासी कारगाड्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या डिझेलवरील अनुदान हटवण्याबाबत गांभीर्याने विचार चालवला आहे. पेट्रोलच्या किंमतींची बाजारभावाशी सांगड घातली गेली असली तरी डिझेलवर अद्याप सरकार प्रति लिटर ६ रुपये ८ पैसे अनुदान देत असते. डिझेलबाबत दुहेरी दर नीती अवलंबण्याचा विचार अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काल बोलून दाखवला.

Read More »

गोव्यात येत्या निवडणुकीत आणखी २७१ मतदान केंद्रे

एकूण १६११ केंद्राचा प्रस्ताव

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या पार्श्‍वभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी येथील मुख्य निवडणूक अधिकारी गणेश कोमू यांनी काल बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय व निर्वाचन अधिकार्‍यांच्या संयुक्त बैठकीत उत्तर व दक्षिण गोव्यात मिळून २७१ अतिरिक्त मतदानकेंद्रे उघडण्याचा प्रस्ताव तयार केल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कोमू यांनी सांगितले.

Read More »

६२०० पावलांचा ‘बिग फूट’ विक्रम

बीग फूट लोटलीच्या करीश्मा व ऍड्रीयल आल्वारीस यांनी कापडावर तब्बल ६२०० पावलांचे ठसे गोळा करून नवा बिग ङ्गूट लिम्का विक्रम प्रस्थापित केला आहे.

४० ु १५ मिटर कापडावर हे ठसे गोळा करण्यात आले होते. ठसे गोळा करण्याचे काम दि. २६ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०१० या काळात झाले होते. नंतर ऍन्सेस्ट्रल गोवाच्या वर्धापनदिनी त्यांनी सर्व पावलांचे ठसे एकत्र जुळवून एक महाकाय पाऊलाची प्रतिमा बनविली होती. या प्रतिमेची पार्श्वभूमी म्हणून ४० मिटर लांब कॅन्व्हास वापरण्यात आला व त्यावर ७० कलाकारांनी कलेद्वारे धार्मिक व जातीय सलोखाया मध्यवर्ती संकल्पनेवर रंगकाम केले.

Read More »