खोला येथे भीषण अपघात

डॉ. मनचली वेळीप मलोरे येथील आरोग्य उपकेंद्रात काम करीत होती. काल दुपारी जेवण करून जात असताना साकळू वेळीपच्या ऍक्टिवा स्कूटरवरून ती जात असताना मलोरे येथील एका जीवघेण्या वळणावर समोरून येणार्‍या जीए-०२-झेड-८५८५ या नंबरच्या टिप्परने विरुद्ध दिशेने येऊन स्कूटरला धक्का दिला. सदर टिप्पर भरधाव वेगाने आला होता व त्या धक्क्यात स्कूटरच्या मागे बसलेली डॉ. वेळीप अक्षरशः चिरडून गेली व स्कूटरचा चुराडा झाला, अशी माहिती सदर अपघात प्रत्यक्ष पाहिलेल्या सोनू वेळीप याने दिली.

Read More »

‘उटा’ नेत्यांवरील ३०७ कलम तात्काळ हटवा

भाजपचे दोन आमदार रमेश तवडकर व वासुदेव मेंग गावकर तसेच पक्षाचे उपाध्यक्ष प्रकाश वेळीप हे समाजाचे प्रश्‍न मांडण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले होते त्यांच्यावर लावलेले ३०७ कलम अन्यायकारक असल्याचे मत भाजप शिष्टमंडळाने मांडले. बाळ्ळी हिंसाचार प्रकरणी आंदोलकांवर लावण्यात आलेले खुनाच्या प्रयत्नासाठी लावण्यात येणारे ३०७ कलम कसे चुकीचे आहे हे गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणले गेले. या आंदोलनात उटाकडून कधीही खुनाचे प्रयत्न झाले नाहीत उलट उटाचेच दोन कार्यकर्ते मरण पावले याकडे श्री. नाईक यांचे लक्ष वेधण्यात आले.

Read More »

प्रश्‍न माध्यमाचा परिपत्रकातील त्रुटी दूर करा; हायकोर्टाची सूचना

माध्यमप्रश्‍नी सरकारने काढलेल्या परिपत्रकातील त्रुटी दूर करून नवे परिपत्रक काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला अवधी दिला आहे. याप्रकरणीची पुढील सुनावणी आता मंगळवारी होणार आहे.

नवे परिपत्रक तज्ज्ञांचा समावेश असलेल्या सल्लागार मंडळाकडे निर्णयासाठी सोपवावे की नाही हेही सरकारने ठरवावे, असे खंडपीठाने काल सूचित केले.

Read More »

लाल किल्ल्यावरील हल्ला अरिफची फाशी कायम

२२ डिसेंबर २००० मध्ये लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर ए तोयबाचा दहशतवादी मोहम्मद अरिफ ऊर्फ अश्फाक याला देण्यात आलेली फाशीची सजा काल सुप्रीम कोर्टाने उचलून धरली. या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले होते.

Read More »

‘सेझ’ जमिनींचे भवितव्य काय?

सुप्रिम कोर्टात अद्याप सुनावणी नाही

सेझच्या नावाखाली वेगवेगळ्या कंपन्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीच्या प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयात अद्याप सुनावणी सुरू न झाल्याने सुमारे ३४ लाख चौ. मी. जमीन पडून आहे. या जमिनींचे भवितव्य काय हा प्रश्‍न सरकार व गोवा औद्योगिक विकास मंडळासमोर आहे.

Read More »

संगणक शिक्षकांची निवड आम्हालाच करू द्या

अनुदानित शिक्षणसंस्थांचे सरकारलाच आव्हान

कायमस्वरुपी संगणक शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी जोपर्यंत शिक्षण खाते आम्हाला ना हरकत दाखला देत नाही तोपर्यंत आम्ही संगणक शिक्षकाची नियुक्ती करणार नाही, अशी भूमिका डायोसिसन सोसायटीच्या विद्यालयांनी घेतल्याने अनुदानित विद्यालयात संगणक शिक्षकांची भरती अडली आहे.

Read More »

पर्यटन विकास महामंडळाच्या हॉटेलांचे दर ३५% उतरवले

पर्यटकांच्या प्रतिसादात १०% वाढ

पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाने आपल्या हॉटेलांचे (टुरिस्ट हॉस्टेल्स) दर ३० ते ३५ टक्क्यांनी खाली आणण्याबरोबरच त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पॅकेजिसही तयार केल्या असल्याचे महामंडळाचे चेअरमन शाम सातार्डेकर यांनी सांगितले. परिणामी यंदाच्या पावसाळ्यात या हॉटेलमध्ये राहणार्‍या पर्यटकांची संख्या सुमारे १० टक्क्यांनी वाढल्याचे ते म्हणाले.

Read More »

कलाकारांच्या मानधनातील वाढ रखडली

भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनात राज्यातील कलाकार सहभागी झाल्याने नाराज बनलेल्या सरकारने कलाकारांच्या मानधनात वाढ करण्यासंबंधीचा प्रस्ताव शीतपेटीत ठेवल्याचे कळते. कलाकारांच्या मानधनात वाढ करण्याची सरकारची तयारी नाही. त्याचा फटका अनेक कलाकारांना बसला आहे.

Read More »

या ढोंगीपणास मूठमाती द्यावी!

- दिलीप बोरकर

गोव्यातील प्राथमिक शिक्षणाचे माध्यम कोणते असावे हा घोळ तसा विचित्रच आहे. इतर राज्यांप्रमाणे गोव्यात एकच भाषासूत्र नाही. प्रत्येक व्यक्ती जरी आपली भाषा कोंकणी आहे, असे म्हणत असली आणि घराघरातून कोंकणीच बोलत असली (इथे काही ख्रिश्‍चन कुटुंबाचा अपवाद आहे) तरी भावनात्मक संबंधांमुळे वेगवेगळ्या भाषांशी त्यांचे नाते आहे. या सर्व प्रकारास गोव्याचा इतिहास जबाबदार असून जोपर्यंत गोमंतकीय आपल्या भावनेचा व्यवहाराकडील संबंध तोडत नाहीत तोपर्यंत हा घोळ कधीच सुटणार नाही.

Read More »

सोन्याचा सोस

स्टँडर्ड अँड पुअरने अमेरिकेचे पतमानांकन खाली आणल्याचे गंभीर परिणाम भारतीय शेअरबाजारातही जाणवू लागले आहेत. शेअर बाजार कोसळू लागल्याने गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याच्या खरेदीकडे वळवल्याने सोन्याचे भाव प्रचंड कडाडले आहेत. सोन्याचे ‘फ्यूचर ट्रेडिंग’ सध्याच्या परिस्थितीत सुरक्षित मानून गुंतवणूकदार त्याकडे वळत आहेत हे स्पष्ट आहे. मात्र, एकीकडे आपल्या रुपयाचे झालेले अवमूल्यन आणि सराफी बाजारात सोन्याच्या खरेदीसाठी उडालेली झुंबड यातून या मौल्यवान धातूचे मोल आणखी वाढले आहे. शेअर बाजारातील ही अनिश्‍चितता आणखी किती दिवस टिकेल याचा अंदाज येत नसला, तरी स्टँडर्ड अँड पुअरने भारतासह आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांनाही धोक्याचा इशारा दिलेला आहे. एकीकडे सेन्सेक्स खाली घसरत असताना दुसरीकडे सोन्याचे चढते भाव गुंतवणूकदारांच्या मनातील शेअरबाजाराच्या अनिश्‍चिततेबाबतची भीतीच अधोरेखित करते आहे.

Read More »