घराणेशाहीचे राजकारण

- प्रकाश कामत

येत्या विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीचे राजकारण ही गंभीर समस्या गोव्याला भेडसावेल. आजच्या घडीला कॉंग्रेसमध्ये राणे पिता-पुत्र, मंत्रीद्वयी चर्चिल आणि ज्योकी आलेमांव आणि म.गो. पक्षाचे सर्वेसर्वा ढवळीकरबंधू अशा तीन जोड्यांपुरतेच घराणेशाहीचे राजकारण मर्यादित आहे. तरी गोव्याच्या ४० आमदारांच्या छोट्या विधानसभेचा विचार करता १५ टक्के विधानसभा तीन घराण्यांच्या ताब्यात आहे!

येत्या निवडणुकीत आलेमांवबंधू व त्यांची दोन मुले कॉंग्रेसच्या तिकिटांवर डोळा ठेवून आहेत. कॉंग्रेसकडून तिकीट न मिळाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस अथवा युगोडेपाचे कायम राजकीय डबके आहेच! राणे कुटुंबातील पुढील उमेदवार्‍या दोनपर्यंतच मर्यादित राहतील की आणखी एखादी व्यक्ती विधानसभेत प्रवेश करण्यास पुढे सरसावते ते पहावे लागेल.

Read More »

श्रावणाच्या अंगी, उत्सवांच्या रंगी

- राजेंद्र पां. केरकर

चैत्रादी बारा महिन्यांत पाचवा श्रावण म्हणजे सृष्टीला लागलेला पाचवा हिरवागार महिना आहे. गोवा-कोकणातील सृष्टिलावण्य श्रावणातच उत्स्फूर्तपणे प्रकट होते. वृक्षवेली एका आगळ्या वेगळ्या सौंदर्याचा आविष्कार श्रावणात घडवत असतात. केवळ वृक्ष-वेलीच नव्हे तर एरवी कुणाच्या विशेष लक्षातही न येणारी तृणपाती, लहानातल्या लहान वनस्पती आपल्यातील पुष्पलावण्याचे प्रकटीकरण जणू श्रावण-भाद्रपदात करतात, आणि त्यामुळे सृष्टीचा हा आनंदसोहळा व्रतवैकल्ये, सण-उत्सव यांच्या सादरीकरणातून द्विगुणित व्हावा म्हणूनच आपल्या पूर्वजांनी श्रावणात वृक्ष, वनस्पती, तृणपाती यांच्यावर डोलणार्‍या पुष्पवैभवाला पूजनविधीत महत्त्वाचे स्थान प्रदान केले. पाने, फुले, तृणपाती यांचा समावेश पूजाविधीत केला गेला, कारण जेणे करून घराच्या चौकोनी विश्‍वात बंदिस्त असणार्‍या माताभगिनींना माळरानावर अथवा घरापासून काही अंतरावर असणार्‍या जंगलात फुलपत्री गोळा करण्यासाठी तरी आपल्या शेजारणींबरोबर जाणे शक्य व्हावे.

Read More »

घटनात्मक स्वातंत्र्यावर गदा

हजारे आणि सहकार्‍यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषणासाठी तीस दिवसांसाठी परवानगी मागितली होती, परंतु पोलिसांनी ती फेटाळली आहे. दिल्ली पोलिसांची ही कृती बेकायदेशीर असून घटनाविरोधी आहे, अशी टीका अण्णांचे सहकारी प्रशांत भूषण, शांतीभूषण, किरण बेदी व अरविंद केजरीवाल आदींनी केली आहे.

Read More »

भाजपच्या काळात सत्तरीचा विकास खुंटला – विश्‍वजित

मनोहर पर्रीकर यानी सरकारी अधिकार्‍याना लक्ष्य करण्याचे सोडून द्यावे, असे परवा भाजप महिला मोर्चाच्या महिलांनी राजनंदा देसाई यांना घेराव घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना विश्‍वजित राणे म्हणाले, त्याऐवजी त्यांनी राजकीय रणांगणात उतरून कॉंग्रेसला टक्कर देऊन दाखवावी. मुख्यमंत्री असताना सत्तरी व डिचोलीतील तालुक्यांचा विकास न करून पर्रीकर यानी सदर तालुक्यातील लोकांवर अन्याय केलेला असून त्या तालुक्यातील जनता आता भाजपला जवळ करणार नसल्याचे ते म्हणाले.

Read More »

पुढील वर्षी बायोमेट्रिक रेशनकार्डे

. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत ही बायोमेट्रिक रेशनकार्डे वितरीत करण्याचे काम सुरू होणार असल्याचे ते म्हणाले. या रेशनकार्डावर कुटुंबातील सर्व सदस्यांची छायाचित्रे असतील. तसेच कुटुंब प्रमुखाच्या बोटाचा ठसाही त्यावर असेल, असे त्यांनी सांगितले.

Read More »

गुजरात सरकारची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यावर कारवाई

सरकारने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर न देणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी राहुल शर्मा यांच्यावर काल गुजरात सरकारने बेशिस्तीच्या कारणाखाली व आवश्यक पुरावे सादर न केल्याच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले. गोध्रा दंगलीच्या तपासकामासाठी आवश्यक असलेल्या दोन सीडी देण्यास शर्मा यांनी टाळाटाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Read More »

लंडनमध्ये ७०० दंगलखोरांवर गुन्हे

Read More »

कुडचड्यात मातृभाषा रक्षाबंधन

भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे कुडचडे येथे काल रक्षा बंधनानिमित्त मातृभाषा रक्षा बंधनकार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

काल संध्याकाळी कुडचडे येथील सर्वोदय हायस्कूलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात मातृभाषा रक्षाअसे लिहिलेल्या लाल रंगाच्या राख्या मंचाच्या कार्यकर्त्यांनी हाताला बांधल्या. कुडचडे मतदारसंघात काल सुमारे दोन हजार लोकांना अशा प्रकारच्या राख्या बांधण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Read More »

१०८ च्या ताफ्यात आता दोन ‘नियो नेटल’ रुग्णवाहिका

गंभीर आजारी असलेल्या मुलांना इस्पितळात पोचण्यापूर्वी रुग्णवाहिकेतच उपचार पुरवण्याची सुविधा असलेल्या दोन नियो नेटलरुग्णवाहिकांसह १०८ च्या ताफ्यात आणखी ११ रुग्णाहिकांचा समावेश करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. या रुग्णवाहिका आल्यानंतर १०८ च्या ताफ्यातील रुग्णवाहिकांची संख्या ३० वर पोचणार असल्याचे ते म्हणाले.

Read More »

जखमीचे निधन

Read More »