राणेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मये स्थलांतरितप्रश्‍नी कायदेशीर सुधारणा

जमीन सरकारच्या नावे नोंदवली गेल्यानेच उद्भवल्या समस्या

मये येथील स्थलांतरितांच्या मालमत्तेचा तिढा गेली अनेक वर्षे राजकीय स्वरूपाचा मुद्दा बनून राहिला असला, तरी प्रत्यक्षात विद्यमान सभापती प्रतापसिंह राणे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी गोवा स्थलांतरित मालमत्ता प्रशासन (सुधारणा) कायदा, १९८९ तसेच गोवा, दमण व दीव स्थलांतरित मालमत्ता (सुधारणा) कायदा, २००० या दोन कायदेशीर सुधारणांद्वारे हा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या दिशेने प्रयत्न केले होते असे दिसून येत आहे. नोकरशहांनी स्थलांतरितांची मालमत्ता एक चौदाच्या उतार्‍यावर स्थलांतरितांची न दर्शवता सरकारच्या नावे दाखवल्यानेच या दोन्ही कायदेशीर सुधारणा त्या जमीनधारकांना लागू होऊ शकलेल्या नाहीत. परंतु उपजिल्हाधिकार्‍याच्या पातळीवर मयेवासीयांनी आपल्या जमिनींवरील सरकारच्या मालकीस आव्हान दिले तरीही त्यात बदल करणे भाग पडेल. सरकारने त्याला आपली मान्यता दिली की उपरोक्त कायदेशीर सुधारणा त्या जमिनींस लागू होऊन हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Read More »

पोलीस असल्याचे सांगून लुटल्या प्रकरणी अटक

पोलीस अधिकारी वा अबकारी खात्यातील अधिकारी असल्याची बतावणी करून वाटेत महिला व वृद्धांना अडवून दागिने व पैसे लुटल्याप्रकरणी माजोर्डा येथील आगुस्तिन सिप्रियानो सिल्वा याला मडगाव पोलिसांनी अटक करून, त्याच्याकडील मोटरसायकल व ४ हजार रु. जप्त केले. त्याने मडगावात पाच लुटमार प्रकरणांची कबुली दिली आहे, असे पोलीस उपअधीक्षक उमेश गावकर यांनी सांगितले. या प्रकरणांत त्याने सुमारे १२ लाख रुपयांची लुटमार केल्याची माहिती मिळाली आहे.

Read More »

मुख्य निवडणूक आयुक्तांचे विधान दिशाभूल करणारे

चर्चिल आलेमाव यांचा आरोप

सेव्ह गोवाचे गोव्यात अस्तित्वच नसून मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी केलेले विधान चुकीचे आहे. त्यांना या याबाबतीत वस्तुस्थितीची कल्पना नाही, असे सा.बां.खा.मंत्री चर्चिल आलेमाव यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याचा ठराव संमत केल्यानंतर निवडणूक आयोगाच्या कार्यालयात त्यासंबंधीची कागदपत्रे सादर केली होती, परंतु कुणीतरी घातपात करून ती गायब केली असावीत, असा दावा त्यांनी केला. सदर प्रकरण सध्या दिल्ली उच्च न्यायालयात पडून असल्याचे आलेमाव म्हणाले.

Read More »

काल पणजीत दागिने लांबवले

आपण पोलीस असल्याची बतावणी करून काल भर पणजीत दोघा भामट्यांनी एका वयोवृद्ध महिलेचे एक लाख चाळीस हजार रु. चे दागिने लांबवले. त्यासाठी या भामट्यांनी जुनीच शक्कल लढवताना चोरटे अंगावरील दागिने लांबवतात. ते काढून आमच्याकडे दे आम्ही ते तुला कागदात गुंडाळून देऊ. नंतर तू ते बॅगेत ठेवून घरी घेऊन जा असे सांगून या अज्ञात भामट्यांनी महिलेला दागिन्यांऐवजी एक टाइल्सचा तुकडा कागदात गुंडाळून दिला व तिचे मंगळसूत्र, बांगड्या व एक अंगठी लांबवली.

Read More »

अण्णा काय बनता? स्व-नेतृत्व दाखवा!

- दिलीप बोरकर

३० ऑगस्टपर्यंत जनलोकपाल विधेयक संमत केले गेले नाही तर, न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे व्यापक जन आंदोलन देशात उभारले जाईल. देशात स्वयंप्रेरित उठाव होईल आणि सरकारला पाय उतार व्हावे लागेलअसे सांगत अण्णा हजारेंनी आपले उपोषण चालूच ठेवलेले आहे. ‘अण्णा जगला किंवा नाही, तरीही आंदोलनाची ही मशाल सतत पेटती ठेवाअसे सांगून तरूणांनी लढा देण्यासाठी सज्ज व्हावे असेही त्यांनी आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला हजारोंच्या संख्येने प्रतिसाद देत तरूणाई आज रस्त्यावर उतरताना दिसत आहे.

Read More »

लिबिया लोकशाहीकडे

कर्नल गद्दाफींच्या हुकूमशाही राजवटीखाली गेली ४२ वर्षे पिचणारी लिबिया अखेर मोकळा श्वास घेण्याच्या अगदी समीप आलेली आहे. बेंगाझीमधून सुरू झालेली लोकचळवळ आता त्रिपोलीपर्यंत येऊन थडकली आहे. कोणत्याही क्षणी नॅशनल ट्रांझिशनल कौन्सिलच्या ताब्यात देशाची सत्तासूत्रे येऊ शकतात. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी राजा इद्रिस यांच्याविरुद्ध बंड करून सत्ता आपल्या ताब्यात घेणार्‍या गद्दाफींकडून सत्ता सहजासहजी सोडली गेली नसती, परंतु एकीकडे बंडखोरांच्या चळवळीची धग आणि दुसरीकडे नाटो फौजांचे हवाई हल्ले यांनी जेरीस येऊन गद्दाफींना हार मानणे भाग पडले आहे. या वर्षाच्या प्रारंभी ट्युनिशिया, ईजिप्तसारख्या देशांमध्ये जनतेच्या चळवळीने सत्ताधीशांना सिंहासने खाली करावी लागली, तेव्हाच लिबियामध्येही ठिणगी पडली होती. फेब्रुवारीमध्ये बेंगाझीमध्ये गद्दाफींच्या निषेधाचे स्वर उठले तेव्हा ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न या हुकूमशहाने केला. तेव्हापासून आजपर्यंतच्या घडामोडी पाहिल्या, तर हळूहळू देशावरची गद्दाफींची पकड सुटत चालली आहे असेच दिसते. जगातील ३२ देशांनी एव्हाना गद्दाफींच्या सरकारशी असलेले राजनैतिक संबंध तोडून विरोधी नॅशनल ट्रांझिशनल कौन्सिलशी जोडलेले आहेत. ज्या राजधानी त्रिपोलीवर ताबा ठेवून गद्दाफी आपली राजवट पुढे रेटत आले, तीही आता बंडखोरांच्या हाती अर्धीअधिक आली आहे.

Read More »

‘सेव्ह गोवा’ पक्ष अस्तित्वात

Read More »

‘सेव्ह गोवा’ पक्ष अस्तित्वात

कोणत्याही राजकीय पक्षाचे दुसर्‍या पक्षात विलिनीकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मान्यतेची गरज असते. त्याशिवाय यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही, असे कुरेशी म्हणाले.

Read More »

‘जुवारी’ व महामार्ग प्राधिकरणावर ठपका

दरम्यान, आग दुर्घटनेत भाजलेल्यांपैकी कुयाराम मिघाराम आयरागर (२३) याचे काल गोमेकॉत उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर झुआर कंपनीवर ३०४ कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तो ९५ टक्के भाजला होता. कुयाराम आग दुर्घटनेतील पहिला बळी ठरला आहे. आणखी पाच जण गंभीर जखमी झाले असून उपचार घेत आहेत. दरम्यान, आग दुर्घटनेचा तपशीलवार अहवाल येत्या सात दिवसांत सादर केला जाणार आहे.

Read More »

अण्णांच्या सहकार्‍यांसोबत प्रणव मुखर्जींची बोलणी सुरू

अण्णांच्यावतीने अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, किरण बेदी तर सरकारच्यावतीने अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, कायदा मंत्री सलमान खुर्शीद आणि संदीप दीक्षित चर्चेत भाग घेत आहेत.

Read More »