पाटो-पणजी भागात मजुराचा खून

Read More »

भारत-द.कोरियात नागरी अणू करार

Read More »

माहिती हक्क कायदा : एक प्रभावी अस्त्र

-ऍड. आयरिश रॉड्रिग्स

माहिती हक्क कायदा प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी सुशिक्षित समाजाने केलेल्या प्रदीर्घ प्रयत्नांना यश आले. १५ जून २००५ रोजी राष्ट्रपतींनी माहिती हक्क कायदा २००५ला मान्यता दिली व माहिती हक्क कायदा अस्तित्वात आला. गेल्या ६ वर्षांत सदर कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी मात्र ङ्गार मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागले आहे.

माहिती हक्क कायदा म्हणजे लोकाशाहीच्या उत्कृष्टपणाचे लक्षण म्हणून त्याचे सर्व थरांतून स्वागत करण्यात आले. लांब पल्ल्याचा विचार केल्यास भ्रष्टाचाराचा बीमोड करण्यासाठी ते एक प्रभावी असे आयुध आहे. सरकार दरबारी उच्च पातळीवर होणार्‍या भ्रष्टाचाराला उघडकीस आणणारे माहिती हक्क कायदाहे एक महत्वपूर्ण असे शस्त्र ठरले आहे.

Read More »

धूळफेक

शैक्षणिक माध्यम प्रश्‍नावर तळ्यात - मळ्यात करीत आलेल्या मगो आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बुरखा कॉंग्रेस प्रभारी जगमितसिंग ब्रार यांनी प्रुडंटवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फाडला. हे दोन्ही पक्ष माध्यम प्रश्नावर आपण सरकारविरोधी भूमिका घेत असल्याचे जनतेला भासवीत असले, तरी प्रत्यक्षात नुकतीच झालेली राज्यसभा निवडणूक ही या पक्षांच्या निष्ठेची चाचणी होती. या चाचणीत हे दोन्ही पक्ष कॉंग्रेससोबत राहिले आहेत, याचाच अर्थ हे पक्ष आमच्यासोबतच आहेत आणि राहतील असे ब्रार म्हणाले. शैक्षणिक माध्यम प्रश्‍नावर गावोगावी व्यक्त होणार्‍या तीव्र जनभावनेशी फारकत घेता येत नाही आणि अनायासे हाती आलेल्या सत्तेचा मोहही सुटत नाही, अशा कात्रीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मगो पक्ष सापडलेला आहे. त्यामुळे सरकारमध्ये राहून आम्ही विरोध करतो आहोत असे सांगून जनतेला मूर्ख बनवण्याची धडपड या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी चालवलेली आहे.

Read More »

योगमार्ग- राजयोग (सत्य ९)

-डॉ. सीताकांत घाणेकर

अनेक वेळा आपण वाचतो, ऐकतो की भारतात मोठमोठे ऋषि, महापुरुष होऊन गेले. ते तप करीत होते. कितीतरी वर्षे कठोर तप केल्यानंतर देव प्रसन्न झाले. त्यांना इच्छित वर दिले. अनेक ऋषिंबरोबर धृवासारखे महान बालक तसेंच रावण, हिरण्यकश्यपु ह्यासारखे राक्षस (राक्षसी वृत्तीचे मानव) देखील आहेत. कुणी गुहेत बसले तर कुणी पाण्यात, कुणी घोर अरण्यात तर कुणी काट्यांवर, कुणी जरुरी तेवढेच अन्न खाल्ले तर कुणी उपवास केले. सारांश शरीराला अत्यंत क्लेश दिले.

Read More »

शाळेला ‘दुसरं घर’ कसं बनवायचं?

-प्रा. रमेश सप्रे

शाळा हे घरांचं घर असतं. तो एक विशाल परिवार असतो. अनेक घरातली मुलं शाळेत येतात. पण ती घरंही शाळेशी जोडली जातात. पालक-बालक-शिक्षक ही एक त्रिवेणी आहे. त्यांच्या परस्पर संबंधातून नि सहकार्यातून शिक्षण या प्रयागाची निर्मिती होते. आज या संबंधांची नितांत गरज आहे. या संदर्भात दोन विचार फार पूर्वीपासून चालत आले आहेत. एक म्हणजे - ‘पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतात, तर शिक्षक हे मुलांचे दुसरे पालक असतातव दुसरा म्हणजे शाळा हे विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच मुलांसाठी दुसरे घरच आहे, नव्हे असलेच पाहिजे.’ आजचं चित्र कसं आहे?... या संदर्भात एका आजोबांची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. ते म्हणतात - ‘शाळा हे दुसरं घर होणं दूरच; पण घराची मात्र दुसरी शाळा झाली आहे.

Read More »

शाळातून या स्पर्धा हव्यात तरी कशाला?

-प्रा. रमेश सप्रे

सध्याचं युग स्पर्धेचं आहे. स्पर्धा हा आजच्या समाजाचा धर्म आहे. स्पर्धा मानवी जीवनाचा प्राण आहे. - अशा प्रकारची सुभाषितवजा वाक्यं आपण रोज वाचत असतो. लिहीत असतो. ऐकत असतो. त्यामुळे स्पर्धेशिवाय जगणं अशक्यच!’ - असा आपला पक्का समज असतो. निरनिराळ्या स्पर्धा परीक्षा, कामाच्या संधी, त्यासाठी मुलाखती (इंटरव्ह्यू), सर्व क्षेत्रात वरवर जाण्याची धडपड, त्यासाठी संघर्ष, सत्ता - संपत्ती - सौंदर्य सार्‍यासाठी स्पर्धा!

Read More »

मोठे मासे येत आहेत

देशात किरकोळ विक्री क्षेत्रामध्ये थेट विदेशी गुंतवणुकीला प्रवेश खुला करण्यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या केंद्रीय सचिवांच्या समितीच्या बैठकीत एकमत झाले.

Read More »

यांचा भ्रष्टाचार

भारतीय जनता पक्षाने कर्नाटकमध्ये सत्ता हस्तगत केली, तेव्हा आपल्या दक्षिण दिग्विजयाचे द्वार कर्नाटकातून खुले झाले अशी शेखी नेत्यांनी मिरवली होती.

Read More »

सत्य उकलण्यासाठी

डाव्या पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर केंद्रातील सरकार वाचवण्यासाठी सौदेबाजी झाल्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुुळे पुन्हा ऐरणीवर आले आहे.

Read More »