येडीयुराप्पांचे समर्थन लाभलेले डी. व्ही. सदानंद गौडा कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

आपल्यावर यापुढे मोठी जबाबदारी असून पक्षाच्या आमदारांत कोठेही दुमत राहू नये यासाठी आपण प्रयत्न करू असे निवेदन नवनिर्वाचित विधिमंडळ गटनेते सदानंद गौडा यांनी केले आहे.

Read More »

माध्यान्ह आहार शाळेतच बनवण्याचा प्रस्ताव

सध्या वरील योजनेखाली राज्यातील स्वयंसहाय्य गट अन्न पुरविण्याचे काम करतात. परंतु काही संस्था उपकंत्राट देऊन हा व्यवसाय चालवितात. त्यामुळे अन्नात भेसळ होण्याचे प्रकार वाढले आहेत. वास्को व कुडतरी येथील शाळेत अनेक मुलांना या अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले होते.

Read More »

बनावट नोटा प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे

वास्को पोलीस स्थानकाचा सध्या अटकेत असणारा पोलीस उपनिरीक्षक वैभव नाईक याचा सहभाग असणारे बनावट नोटा प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणा (एन.आय.ए.) हाती घेणार आहे. हे प्रकरण केंद्र सरकारने गंभीरपणे घेतले असून त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याचे कळते.

या प्रकरणी आंतरराष्ट्रीय रॅकेट असावे तसेच याची सूत्र अंडरवर्ल्डपर्यंत पोचलेली असावीत असा अंदाज असून त्याविषयी आता एन.आय.ए. अधिक सखोल तपास करेल. दरम्यान, एका ताज्या घडामोडीत वर्षभरापूर्वी वैभव नाईक याने बनावट नोटा प्रकरणी अटक केलेला व सध्या तुरुंगात असलेल्या महम्मद (मूळ पश्‍चिम बंगाल) याने नवीन जबानी दिली असून नाईक यानेच आपल्या खिशात बनावट नोटा घातल्या होत्या असे सांगितल्याचे सूत्रांकडून समजते.

Read More »

‘महागाई वाढवून विकास नको’

महागाईवर चर्चेत भाजपचे मत

वाढती महागाई नियंत्रणात ठेवण्यास का अपयश आले असे विचारत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.

मतदानाची तरतूद असणार्‍या नियमाखाली काल लोकसभेत महागाईवर चर्चा झाली. भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी सभागृहात ठराव मांडला.

Read More »

इंग्रजीकरणाचा निर्णय घिसाडघाईचा : नाडकर्णी

माध्यमप्रश्‍नी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात युक्तीवाद करताना अर्जदार पांडुरंग नाडकर्णी यांचे वकिल ऍड. आत्माराम नाडकर्णी यांनी इंग्रजी माध्यमाला अनुदान देण्याचा निर्णय सरकारला घ्यायचा होता तर तो सहा महिन्यांपूर्वी घ्यायला हवा होता, तसेच त्यांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करायला हवी होती, असे सांगितले.

Read More »

मंत्रिमंडळाची आजची बैठक उद्यावर

मुख्यमंत्री दिगंबर कामत मंत्रिमंडळाची आज निश्‍चित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आली असून आता ती उद्या शुक्रवार दि. ५ रोजी दुपारी घेण्याचे ठरविल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

Read More »

नागांच्या प्रतिमा

Read More »

युवाशक्ती जागली ती पेटत राहू द्या!

- दिलीप बोरकर

या दिवसांत गोव्यातील युवाशक्तीने अपेक्षा जागवलेल्या आहेत. भारतीय भाषांवर अथवा म्हणा कोकणी - मराठी भाषांवर गोवा सरकारच्या माध्यम धोरणामुळे होणार्‍या अन्यायाविरुद्ध गोव्यातील युवाशक्ती रस्त्यावर उतरलेली पाहून मनात दाटत येणारे निराशेचे ढग दूर व्हायला लागले आहेत. सुस्तावलेली युवा पिढी पाहून आता या गोव्याचे काही खरे नाही, असे वाटायला लागतानाच गोमंतकीय युवकांच्या मुखातून आलेल्या घोषणामुळे नवचैतन्याची पहाट दिसायला लागलेली आहे.

Read More »

रात्र थोडी, सोंगे फार

आपल्या नातलगांना येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने उमेदवारी नाकारल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांना विधानसभेत प्रवेश देण्याचे मनसुबे राज्यातील काही प्रबळ राजकारण्यांनी रचल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसही अशा इच्छुक उमेदवारांकडे स्वागतशील भूमिकेतून पाहात असल्याचे दिसून येत आहे. एका विशिष्ट मुदतीत पक्षात येणार्‍यांचा त्यांचे पक्षातील काम पाहूनच आगामी निवडणुकीसाठी विचार होऊ शकतो, असे राष्ट्रवादीचे नेते जरी सांगत असले, तरी प्रत्यक्षात राज्यातील आपले संख्याबळ वाढावे यासाठी उमेदवाराची जिंकण्याची क्षमताहाच उमेदवार निवडीसाठी निकष राहील असे दिसते. या इच्छुकांच्या वैयक्तिक प्रभावाचा वापर आपल्या पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी करून घेण्याची राष्ट्रवादीची धडपड असली, तरी प्रत्यक्षात या तिकिटेच्छुंना राष्ट्रवादीशी किंवा त्या पक्षाच्या येथील भवितव्याशी काही देणेघेणे नाही. केवळ निवडणुकीपुरती राष्ट्रवादीचा शिडी म्हणून वापर करण्याचीच त्यांची प्रवृत्ती राहील. या अशा परिस्थितीत हा पक्ष राज्यात आपला पाया मजबूत करणार आहे तो कशाच्या बळावर? कॉंग्रेस - राष्ट्रवादी युती येत्या निवडणुकीतही असेल.

Read More »

‘टोल’मुळेच अडले महामार्ग रुंदीकरण

प्राधिकरणाच्या शिष्टमंडळाने आठ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री दिगंबर कामत, साबांखामंत्री चर्चिल आलेमांव, विरोधी नेते मनोहर पर्रीकर, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, साबांखाचे प्रधान मुख्य अभियंते जे. एस. रेगो व अन्य अधिकार्‍यांच्या उपस्थित घेतलेल्या बैठकीत टोल व अन्य प्रश्‍नांवर चर्चा झाली.

Read More »