आज टिळक पुण्यतिथी

Read More »

ब्राऊन नवे हवाईदल प्रमुख

Read More »

प. बंगालमध्ये रेल्वे अपघातात २ ठार

Read More »

अण्णा उपोषणाची जागा बदलण्यास तयार

Read More »

बोर्डा येथे लवकरच नवे वाणिज्य महाविद्यालय

Read More »

टिळकांची लंडनची बातमीपत्रे

- . वि. जोगळेकर, मडगाव

चिरोल खटल्याच्या निमित्ताने लोकमान्य टिळक, दादासाहेब करंदीकर, नामजोशी अशी मंडळी १९१९ मध्ये अंदाजे तेरा महिने लंडनला होती. टिळकांचे आरोग्य तोपर्यंत बरेच बिघडले होते. चालताना पाय लटपटत होते. कोणाच्या आधाराशिवाय ते लंडनच्या रस्त्यावर चालत नसत. दृष्टीही अधू झाली होती. तेथे एका घरी ही मंडळी राहात. दोन तीन लोकांचे कुटुंबच त्यांनी चाकरीला ठेवले होते. पुण्यात मित्रांनी गंमतीने विचारले, ‘बळवंतराव, पोशाखाचे काय?’ टिळकांनी हसून उत्तर दिले, ‘अहो, त्यात काय, देश तसा वेष. आम्ही काही कामाकरिता तेथे जातोय. आमच्या वेषाकडे लोकांनी बघून दचकू नये.’ टिळकांनी कोट पाटलोण व लॉंगबूट चढवले. उपरण्याला फाटा दिला. फक्त पुणेरी पगडी मात्र तशीच ठेवली. प्रसंगी विशेषी ठरलेल्या भेटीशिवाय, ग्रंथालयात आणि मजूर पक्षाच्या सभांतून व्याख्यानांसाठी जाण्याखेरीज टिळक लंडनमध्ये फिरले नाहीत. एखादे ठिकाण पाहण्यासाठी त्यांनी वेळ काढला असे घडले नाही. आपल्या तेथल्या कामाचे वृत्त इकडे कळावे म्हणून ते वेळोवेळी भारतात अहवाल पाठवीत. अर्थात त्याला केसरीत प्रसिद्धी मिळे.

Read More »

टिळक ते मर्डोक

ध्येयवादी पत्रकारिता धंदेवाईक झालेली आहेअसा टीकेचा सूर आजच्या पत्रकार दिनी ठिकठिकाणी होणार्‍या परिसंवादांतून लावला जाईल. त्यामागच्या कारणांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न मात्र कोणी क्वचितच करील. वाढता उत्पादन खर्च, वृत्तपत्रांमधील अटीतटीची स्पर्धा, मोठ्या साखळी वृत्तपत्रांचे, त्यांच्या मार्केटिंगच्या क्लृप्त्यांचे आव्हान, कुशल मनुष्यबळाची सतत जाणवणारी चणचण, वृत्तवाहिन्या व इंटरनेटसारख्या अधिक पोहोच असलेली नवी माध्यमे अशा अनेक कारणांमुळे आज वृत्तपत्र व्यवसाय पूर्वीइतका किङ्गायतशीर राहिलेला नाही. पूर्वी हाताशी एखादा छापखाना असला, तरी वृत्तपत्र निघत असे. मालक - संपादकांचा जमाना होता. विक्रीच्या किंमतीतूनच उत्पादन खर्च भरून निघे. परंतु या व्यवसायाचा व्याप जसजसा वाढला, नवनव्या तंत्रज्ञानाची कास धरणे जसे आवश्यक बनू लागले, तसे खर्चही प्रचंड वाढले. वृत्तपत्र चालवणे सोपे राहिले नाही. प्रचंड भांडवलाची गरज भासू लागली. जमाखर्चाचा ताळेबंद जुळवण्यासाठी जाहिरातींमागे वृत्तपत्रे धावू लागली. त्यात टीव्हीचे आगमन झाले. जाहिराती मोठ्या प्रमाणावर त्या माध्यमाकडे वळल्या. एकीकडे घटता महसूल आणि दुसरीकडे वाढता खर्च हे गणित सामान्यांना झेपेनासे झाले.

Read More »

गोव्याला ब्लॅकमेलरांचे ग्रहण

- गुरुदास सावळ

चर्चिलकन्या वालंकाला अपात्र ठरविणार्‍या लोकांना अद्दल घडविण्यासाठी मोठ्या तोर्‍यात दिल्लीला गेलेले चर्चिल आलेमांव आणि त्यांच्या बंधूला नाक मुठीत धरून रिक्त हस्ते गोव्यात परतावे लागले. वालंका आणि तिचा चुलत बंधू युरी याला येत्या विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याचे आश्‍वासन कॉंग्रेसश्रेष्ठींनी दिल्याने आम्ही राजीनामे मागे घेतल्याचे आलेमांवबंधूंनी जाहीर केले. मात्र असे कोणतेही आश्‍वासन आम्ही दिलेले नाही असा खुलासा गोवा प्रभारी जगमितसिंग ब्रार यांनी केला आहे. काही वर्तमानपत्रांनी तर ब्रार यांच्या खुलाशालाच अधिक महत्त्व दिले आहे.

Read More »

‘अल्कॉन ग्रुप’च्या वटवृक्षाचे मूळ सदाशिव नायक-खंवटे

शब्दांकन- सौ. नंदिनी रेगे

उद्योगपतींची आपल्याकडे वाण नाही. पण समाजाभिमुख उद्योगपती अगदीच विरळा! अशा इन्यागिन्या विरळ्यांमध्ये अग्रेसर असणारं एक उमदं व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. अनिल खंवटे! आपल्या अनेक उद्योगधंद्यांबरोबरच शिक्षण, समाजकार्य, संस्कृती, अध्यात्म अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग झेप घेणारं एक आगळं रसायन! आपल्या अल्कॉनउद्योगसमूहाचं जाळं विणून त्यांनी गोव्याच्या औद्योगिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी तर बजावलीच आहे; पण आपल्यासोबत गोव्याचंही नाव अल्कॉनच्या उत्पादनांद्वारे जागतिक औद्योगिक स्तरापर्यंत उंचावलेलं आहे. स्वतःच्या कुटुंबासोबत, आज हजारो कुटुंबांचा पोशिंदा बनण्याची फार मोठी समाजसेवा त्यांच्या हातून घडते आहे. संपूर्ण गोव्यालाच नव्हे तर भारतालाही अभिमान वाटावा असं सामान्यातून घडलेलं हे असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजेच श्री. अनिल खंवटे! आता हे असामान्यत्व काही एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी असतात वर्षानुवर्षांचे कष्ट! परिस्थितीवर मात करण्याची जिद्द! त्या जिद्दीला अखंड परिश्रम, चिकाटी, प्रामाणिक वृत्तीची जोड द्यावी लागते. दूरदृष्टी आणि कल्पकता, नावीन्याची ओढ तर हवीच हवी! चारचौघांत मिळून-मिसळून राहण्याची आवड आणि त्यांना आपल्याबरोबर ठेवण्याची ताकद असावी लागते. आपण आपल्या कुटुंबाचं, समाजाचं काही देणं लागतो याची जाण असावी लागते. हे गुण मुळातच अंगी असावे लागतात. आडात असलं की पोहर्‍यात आपोआपच येतं. कै. सदाशिव धर्मा खंवटे हे अनिल खंवटेंचे वडील. त्यांच्या अंगी असलेल्या या सद्गुणांचा पुरेपूर वारसा सुदैवी अनिलजींना मिळाला हे त्यांचं मोठंच भाग्य! त्यांच्या वडिलांचं- कै. सदाशिव धर्मा नायक खंवटे यांचं- हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांच्या जीवनचरित्रातच आपल्याला अनिल खंवटेंच्या कर्तव्याची मुळं सापडतात.

Read More »

‘उटा’ची सरकारला शनिवारपर्यंत मुदत

Read More »