लोकपालबाबत आज संसदेत चर्चा

लोकपाल विधेयकावर नियम १८४ खाली लोकसभेत आणि नियम १६८ खाली राज्यसभेत चर्चा व्हावी असे प्रस्ताव भाजपाच्या वतीने काल ठेवण्यात आले होते. या दोन्ही नियमांखाली चर्चा झाल्यास त्यानंतर त्यावर मतदान घ्यावे लागते. मात्र, सरकारपक्षाने नियम १९३ खाली मतदानाविना अल्पकालीन चर्चेचा प्रस्ताव मांडला आहे. मतदानाविना चर्चा घेण्यास विरोध दर्शवित संसदेत भाजपा सदस्यांनी गदारोळ माजवला.

Read More »

४५ दिवसांच्या बालकावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया

अशा प्रकारचा आजार असलेल्यांवर बालकाच्या जन्मानंतर तीन ते सहा महिने पूर्ण झाल्यानंतर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते, परंतु या मुलाच्याबाबतीत तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. पालकांच्या चिकाटीमुळे देवावर विश्‍वास ठेवून आपण ४५ दिवसांच्या बालकावर हृदयाला असलेल्या चार छिद्रांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. जोसेफ झेव्हियर यानी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

Read More »

मिरामार येथे गुंडांच्या हल्ल्यात तीन जखफी

Read More »

भ्रष्टाचार विरोधी लढ्यात मगोही सहभागी ः ढवळीकर

देशात निर्माण झालेल्या वेगवेगळ्या सुविधांचा उपभोग घेण्यासाठी माणूस वाममार्गातून पैसा मिळविण्याचा प्रयत्न करतो व त्यातूनच भ्रष्टाचारास वाव मिळतो, हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आम्हा सर्वांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यामुळे यापुढे अण्णा हजारेंनी पुकारलेल्या भ्रष्टाचार विरोधी लढ्यात मगोने सामील होण्याचे ठरविले आहे.

Read More »

अटालाला न्यायालयीन कोठडी

ड्रग माफिया अटाला याला काल दुपारी येथील अमली पदार्थ विरोधी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचा रिमांड मंजूर केला. आपल्या जीवाला धोका असल्यानेच आपण येथून पलायन केल्याचे अटाला याने न्यायालयाला सांगितले.

Read More »

वास्को-वालांकिणी रेल्वेचा शुभारंभ

गोव्यातील रेलसेवा सुधारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने अनेक योजना राबविलेल्या असून सध्या हाती घेण्यात आलेल्या ३५१ कि. मी. अंतराच्या रेल्वे रूळाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेचा विकास मोठ्या प्रमाणात शक्य होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री भरतसिंह सोळंकी यांनी केले.

Read More »

६०० ते ८०० रु. ना माटोळ्यांची विक्री

लाकडी पाट, चौरंगांनाही मागणी

गणेश चतुर्थीला लागणारे लाकडी पाट, माटोळीचे सामान, माटोळी तसेच विजेवर चालणार्‍या वेगवेगळ्या तर्‍हेच्या वस्तू, रेडीमेड कपडे तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लॉटरीने म्हापसा बाजारपेठ सजली आहे.

Read More »

अंतिम आराखडे खुले ठेवण्यास सरकारचा नकार

काही महत्त्वाच्या अडचणीमुळे अंतिम स्वरूप प्राप्त झालेले वेगवेगळ्या तालुक्यांचे प्रादेशिक आराखडे जनतेसाठी ३० दिवस खुले ठेवणे शक्य नसल्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी गोवा बचाव अभियानच्या शिष्टमंडळाला सांगितले आहे. त्यामुळे अभियानने नाराजी व्यक्त केली आहे.

Read More »

खांडेपार शांतादुर्गा मंदिरात चोरी

१० लाखांचा ऐवज लांबविला

Read More »

के. शंकरनारायण गोव्याचे हंगामी राज्यपाल

Read More »