मिरामार हल्लाप्रकरणी पाचजणांना आंबोलीत अटक

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे यतीन विश्‍वनाथ तिगाडे (२१), अश्रफ महम्मद शेख (१८), संदीप चक्रवर्ती शिंदे (२३), कृष्णा शिवाजी नाईक (२१) व गॉडपिन मारिओ मिस्किता (१८) (सर्व सांताक्रुझ) अशी नावे आहेत.

Read More »

मुख्यमंत्री व क्रीडामंत्री यांना काळे झेंडे

एदुआर्द फालेरो यांच्यावरील पुस्तकाचे मांडवी हॉटेलमध्ये प्रकाशन होणार असल्याचे व या कार्यक्रमाला मुख्यमंत्री दिगंबर कामत, क्रीडामंत्री बाबू आजगावकर, स्वतः एदुआर्द फालेरो व केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री अजय माकन हे येणार असल्याचे वृत्त मिळताच भाषा सुरक्षा मंच व भाजपच्या कार्यकर्त्यांनी मांडवी हॉटेलसमोर गर्दी केली होती. मुख्यमंत्री दिगंबर कामत, बाबू आजगावकर, एदुआर्द फालेरो यांना यावेळी वरील कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्यानंतर पणजी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Read More »

लोकायुक्त नेमण्याची नार्वेकरांची मागणी

अण्णांच्या आंदोलनास पाठिंबा

कॉंग्रेस आमदार तसेच माजी मंत्री व गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर यांनी काल एका पत्रकाद्वारे अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला आपला पाठिंबा व्यक्त केला व राज्यात लोकायुक्त नेमण्याची मागणी केली.

Read More »

माध्यम प्रश्नाचे पडसाद आता उमटणार रंगभूमीवर

पुंडलिक नाईक लिखित फिर्गी फक्सगणेशोत्सवासाठी सज्ज

प्राथमिक शिक्षणात इंग्रजी माध्यमाला सरकारी अनुदान देण्याच्या विषयावरून गेले तीन महिने गोव्यात प्रचंड लोकक्षोभ उसळला आहे. बंद, मोर्चे, निदर्शने, धरणे, पथनाट्य, मेळावे, महामेळावे, महादिंडी अशा विविध मार्गांनी हे आंदोलन भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या वतीने चालवले गेले. आता हा प्रश्न थेट गोव्याच्या रंगभूमीवर प्रकटणार असून नामवंत गोमंतकीय साहित्यिक व भाषा सुरक्षा मंचाचे एक नेते पुंडलिक नारायण नाईक यांनी माध्यम प्रश्नावर लिहिलेले फिर्ंगी फक्सहे कोकणी नाटक या चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते व नाट्यलेखक, दिग्दर्शक प्रशांत म्हार्दोळकर रंगभूमीवर आणणार आहेत. गोव्याच्या कोकणी रंगभूमीवर शतकवीरम्हणून नावलौकीक जोडलेले व सध्याच्या माध्यमप्रश्नावरील आंदोलनात युवकांना नेतृत्व देणारे राजदीप नाईक यांच्या कलाचेतना, वळवईया संस्थेद्वारे हे नाटक सार्वजनिक गणेशोत्सवात गावोगावी सादर केले जाणार आहे.

Read More »

भ्रष्ट उपनिबंधकांना कायदा सचिवांची तंबी

राज्यातील जमिनींच्या खरेदी व्यवहारात तालुका स्तरांवरील निबंधक कचेर्‍यांमधून मोठ्या प्रमाणावर लाचखोरी चालत असल्याच्या तक्रारींसंदर्भात काल कायदा सचिवांनी सर्व चौदा उपनिबंधकांना भ्रष्टाचारात गुंतल्याची तक्रार आल्यास दक्षता खात्याकरवी कारवाई केली जाईल अशी तंबी दिली आहे.

Read More »

नाफ्ता प्रकरणी अधिकार्‍यांचे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

Read More »

निसर्गाशी इमान राखलेले शेळप – बुद्रूक गाव

- हेमंत कवळेकर

शेळप - बुद्रूक... वाघेरीच्या पायथ्याशी वसलेला, सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला निसर्गसंपन्न असा गाव. साठ-सत्तर घरांची तुरळक वस्ती. एकच प्राथमिक शाळा. एकच शिक्षिका पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग घेते. सातवी पर्यंतच्या शिक्षणासाठी पाच कि. मी. अंतरावर असलेल्या नगरगाव आणि दहावीच्या शिक्षणासाठी वाळपईला जावे लागते. शेती-बागायतीवर आपली उपजीविका चालविणार्‍या कष्टकरी शेतकर्‍याचे येथे दर्शन घडते आणि मन प्रसन्न होते. या गावाला भेट देण्याची तीव्र इच्छा मनात घर करून होती. यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या मडगाव शाखेतर्फे आयोजित पदभ्रमण कार्यक्रमाच्या निमित्ताने ती फळास आली. हा गाव लहान खेडेगाव असूनही रस्ते एकदम गुळगुळीत आहेत. लालूंच्या भाषेत सांगायचे झाल्यास हेमामालिनीच्या गालांसारखे!

Read More »

आपली तरुणाई, आपला देश!

- मोहन द. नाईक

आज देशात तरुणांची संख्या प्रौढ व ज्येष्ठांपेक्षा अधिक आहे. तरुणाईला कुठल्याही देशात स्वत:च्या देशाबद्दल स्वाभिमान, अस्मिता व गौरव वाटत असतो. जे शिक्षित, सुसंस्कृत व देशप्रेमी असतात त्यांना राज्यातील व देशातील प्रशासनावर निष्ठा असते. अन्याय, भ्रष्टाचार, लाचलुचपत यांबद्दल मनस्वी चीड असते. कुठल्याही देशातील राज्यक्रांतीत तरुणांचे योगदान मनस्वी असते. त्यांची उभरती, उत्साही, सर्जनशील मने राष्ट्राचे भवितव्य घडवू शकतात. त्यांच्या मनगटात, पोलादी बाहूत व सळसळत्या रक्तात देशाच्या अभ्युदयाची उन्नतीची स्वप्ने लहरत असतात.

Read More »

बुद्धीबळ ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी

Read More »

लोकपालबाबत आज संसदेत चर्चा

लोकपाल विधेयकावर नियम १८४ खाली लोकसभेत आणि नियम १६८ खाली राज्यसभेत चर्चा व्हावी असे प्रस्ताव भाजपाच्या वतीने काल ठेवण्यात आले होते. या दोन्ही नियमांखाली चर्चा झाल्यास त्यानंतर त्यावर मतदान घ्यावे लागते. मात्र, सरकारपक्षाने नियम १९३ खाली मतदानाविना अल्पकालीन चर्चेचा प्रस्ताव मांडला आहे. मतदानाविना चर्चा घेण्यास विरोध दर्शवित संसदेत भाजपा सदस्यांनी गदारोळ माजवला.

Read More »