बाळ्ळी हिंसाचार : न्यायालयीन चौकशीस सप्टेंबरमध्ये प्रारंभ

बाळ्ळी हिंसाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. एस. के. शाह यांचा एकसदस्यीय आयोग सप्टेंबरपासून या प्रकरणाची चौकशी सुरू करणार आहे. ‘उटाच्या आंदोलनावेळी दोन कार्यकर्त्यांना मरण आले होते त्याची चौकशीही होणार आहे. आंदोलन भडकवण्यात नेत्यांचाही काही भाग होता का तेही तपासले जाणार आहे.

Read More »

जामिनाविरुद्धची आव्हान याचिका फेटाळली

Read More »

योगमार्ग – राजयोग (सत्य – १६)

- डॉ. सीताकांत घाणेकर

परमेश्‍वराने बनवलेले विश्‍व फार मोठे आहे. त्या विश्‍वात सर्व गोष्टी सुरळीत चालाव्यात म्हणून सृष्टीकर्त्याचे काही नियम आहेत. कुणी केवढाही मोठा असला तरी त्याला निसर्ग नियमांप्रमाणेच वागायला हवे. त्याप्रमाणे जन्मोजन्मी त्याचे कर्म संचित होते व तद्नुसार त्याचे जीवन चालते.

जग नक्कीच देवाने बनवले असेल पण जग चालते दैवानुसारच. म्हणूनच तत्त्ववेत्ते सांगतात की देवापेक्षा दैव मोठे आहे. तसे बघितले तर ‘‘दैव’’ शब्दाला ‘‘देव’’ ह्या शब्दापेक्षा एक मात्रा जास्त आहे. म्हणजेच ‘‘दैव’’ वरचढ आहे.

Read More »

मुलांची अभिव्यक्ती कशी सुधारायची?

- प्रा. रमेश सप्रे

‘अभिव्यक्ती’ हा शब्द तसा अवघड आहे. मुलांनी आपले विचार, भावना, कल्पना चांगल्या ‘व्यक्त’ करायला हव्यात असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला मुलांची ‘अभिव्यक्ती(एक्सप्रेशन)’ सुधारायला हवी असंच सुचवायचं असतं. आरंभी मुलं आपले विचार, भावना, कल्पना अगदी साध्या भाषेत सांगायला लागतात. पण हळूहळू त्यांनी योग्य शब्द, प्रभावी भाषा वापरावी हे आपल्याला अपेक्षित असतं. यालाच अभिव्यक्ती म्हणतात. मग या बाबतीत अडचण काय असा विचार मनात येईल. अचूक शब्दयोजना, त्यासाठी शब्दसंग्रह(व्होकॅबुलरी) अन् यासाठी विचार - कल्पना व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्य व संधी व योग्य मार्गदर्शन यांची आवश्यकता असते.

Read More »

चौघे हल्लेखोर चोर्ला घाटात जेरबंद

Read More »

व्यावसायिक वैमनस्यातून प्राणघातक हल्ला; दोघे जखमी

व्यवसायातून हा हल्ला झाल्याचे पोलीस अधीक्षक वामन तारी यांनी सांगितले. अश्रफ अब्दुल महमद (४०) व अल्ताफ शेख हे मूळ केरळचे असून ते बाणावली येथे राहतात. आशीष जयप्रकाश एम. टी., रणजीत बापू व्ही. व्ही. दामोदर, बिजू आर. रत्नराज, प्रदीपकुमार व्ही. पी. या चारजणांनी (सर्व केरळ) व जखमी दोघांनी भागीदारीत हॉटेलात बांधकामाच्या वस्तू पुरविण्यासाठी व्यवसाय करण्याचे ठरविले.

Read More »

मुरगाव बंदर ते विमानतळापर्यंत नव्या तेल वाहिनीची योजना

भारतीय तेल महामंडळाच्या वास्को टर्मिनलकडून सध्या टँकरद्वारे दाबोळी विमानतळावर इंधन पुरवठा केला जात आहे. यामध्ये सुधारणा तसेच सरळ पुरवठा व्हावा यासाठी महामंडळाने भुयारी वाहिनी टाकण्यासाठी परवानगी मागितली आहे.

Read More »

१४ पालिकांना खास अनुदान

वाळपई येथे पालिका इमारत व अन्य प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात माहिती देताना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले की, पणजी महापालिकेला ५ कोटी रु. अनुदान दिले जाईल. त्याशिवाय अ श्रेणीतील पालिकांना ३ कोटी रु. ब श्रेणीतील पालिकांना २ कोटी रु. आणि क श्रेणीतील पालिकांना १ कोटी रु. अनुदान दिले जाणार आहे.

Read More »

पहिल्या ९ कि. मी. साठी १५ टक्के बस भाडेवाढीचा प्रस्ताव

पहिल्या ९ किलोमीटरपर्यंत प्रति किलोमीटर ७५ पैसे म्हणजे पंधरा टक्के तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी दहा टक्के बस भाडेवाढीचा सुधारीत प्रस्ताव तयार करून सरकारला सादर करण्यात आला आहे. रस्ता वाहतूक प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी दिली.

Read More »

ओम पुरी, किरण बेदींविरुद्ध हक्कभंग ठराव संसदेत सादर

लोकप्रतिनिधींची नक्कल केल्याचा ठपका

लोकपाल आंदोलनादरम्यान, लोकप्रतिनिधींची नक्कल करून त्यांच्यावर उपहासात्मक टिप्पणी केल्याबद्दल काल संसदेच्या दोन्ही सभागृहांत हक्कभंग ठराव सादर करण्यात आले.

अण्णांच्या उपोषणावेळी रामलीला मैदानावर आलेल्या ओम पुरी यांनी खासदार अनपढआणि नालायकअसल्याचे विधान केले होते. किरण बेदी यांनी म्हटले होते की राजकारणी वेगवेगळे मुखवटे धारण करून लोकांना फसवत असतात. दरम्यान, ओम पुरी यांनी आपल्या विधानांबद्दल सभागृहाची माफी मागितली असून किरण बेदी यांनी मात्र आपल्या वक्तव्याचा कसलाच पश्चाताप होत नसल्याचे म्हटले आहे.

Read More »