ते अधिकारी कोणत्याही क्षणी निलंबित

बागवाडा येथील स्मशानभूमीच्या वाद प्रकरणी वादग्रस्त ठरलेले पेडण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम राऊत देसाई व उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर यांच्या निलंबनाचा आदेश कुठल्याही क्षणी येऊ शकतो, असे संकेत सूत्रांनी दिले.

Read More »

दिल्ली बॉम्बस्फोट : ‘हुजी’ सदस्य ताब्यात

दिल्लीत हायकोर्टासमोर झालेल्या स्फोटाची जबाबदारी स्वीकारणारी ई-मेल पाठविणारा हुजीसंघटनेचा संशयित सदस्यास सुरक्षा दलांनी काल जम्मू काश्मीरमध्ये किश्तवर येथून ताब्यात घेतले. हाफिज अमिर असे त्याचे नाव असून तो बांगलादेशस्थित हरकत उल जेहादी संघटनेचा सदस्य असून त्यानेच दोन शाळकरी मुलांकरवी स्फोटांची जबाबदारी स्वीकारणारा ई-मेल पाठविल्याचा आरोप आहे.

Read More »

कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी वीज खात्यात नवी पदे

वीज खात्यातील कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना सेवेत कायम करता यावे यासाठी खात्यात नवी पदे तयार केली जात असून ती कधी भरायची याचा निर्णय मात्र मंत्रिमंडळालाच घ्यावा लागणार असल्याचे मुख्य वीज अभियंते निर्मल ब्रागांझा यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Read More »

आगामी काळात राजकीय संक्रमणाची शक्यता

- अशोक पार्सेकर, कोडार-फोंडा.

लोकशाही शासनप्रणाली चांगली असली तरी, त्यात सरंजामशाही, हुकूमशाही व बेबंदशाहीच माजवली जात आहे. त्यामुळेच देशात आजवर अनेक आर्थिक घोटाळे घडू शकले. या घोटाळ्यातून अब्जावधी रूपये राजकारणातील काही माफियांनी लाटले. विकासाचे प्रकल्प पुढे करून प्रत्यक्षात मोठे घोटाळे केले जात आहेत. भूमातेवरील अतिक्रमणे वाढत आहेत. शेतीे-बागायतीच्या जमिनीवर अतिक्रमणे करण्यात येत आहेत. ‘भ्रष्टाचार्यांनी, भ्रष्टाचाराने देशाची अधोगती चालवलेली आहे. सत्तर टक्के खेड्यांच्या या भारत देशतील शेतकर्‍यांचा कणा ताठ ठेवण्यासाठी सतत कार्यरत् राहणारे लोकप्रतिनिधी व नेते देशात आज निर्माण का होत नाहीत?

Read More »

दहशतवादी हल्ले थांबतील का?

- मोहन नाईक, सदाशिवगड - कारवार

देश दहशतवादी हल्ल्यांपासून कधी मुक्त होईल?’ दिल्ली उच्च न्यायालय परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर हाच प्रश्‍न आज प्रत्येकजण एकमेकाला विचारत आहे. खरेच, हे दहा - अकरा वर्षांपासून सुरू झालेले आतंकवादी हल्ल्यांचे सत्र, ज्यामध्ये आजपावेतो शेकडो निष्पाप नागरिकांचे बळी गेलेत, ते संपणार तरी कधी? दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात बळी जातो तो सामान्य माणसाचाच! ज्यांना कसल्याही प्रकारची सुरक्षितता नाही, जे लोक आपल्या पोटापाण्यासाठी अहोरात्र जगण्यासाठी संघर्ष करीत असतात.

Read More »

उघड लूटमार

आधीच महागाईशी झुंजत असलेल्या आम आदमीच्या कंबरड्यात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल दरवाढीचा सोटा पुन्हा एकवार हाणला. गेल्यावर्षी जूनमध्ये पेट्रोलच्या किंमती ठरवण्याचे अधिकार सरकारने तेल कंपन्यांना बहाल केल्यानंतर गेल्या वर्षभरातील ही दहावी दरवाढ आहे. पेट्रोल दरवाढीबरोबरच स्वयंपाकाच्या गॅसच्या दरांत दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव विरोधी आणि सहयोगी पक्षांच्या प्रखर विरोधामुळे तात्पुरता बारगळला असला, तरी भविष्यात अनुदानित गॅस सिलिंडरच्या प्रमाणातील कपात आणि त्यापुढील प्रत्येक सिलिंडरसाठी दुप्पट दरवाढ ही अटळ आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर तीन रुपये चौदा पैशांची परवाची दरवाढ करताना डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाल्याचे कारण तेल कंपन्यांनी पुढे केले. सप्टेंबर २००९ नंतर प्रथमच प्रति डॉलर मूल्य ४८ रुपये झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्च्या तेलाची आयात करणार्‍या या तेल कंपन्यांचा तोटा वाढला. त्यामुुळे तो थेट ग्राहकांच्या खिशातून वसूल करण्याचा प्रयत्न या कंपन्यांनी केला आहे. देशातील तिन्ही सरकारी प्रमुख तेल कंपन्यांची स्थिती वाईट आहे हे खरे आहे. सरकारच्या आजवरच्या अनुदान नीतीमुळे या तेल कंपन्या गाळात चालल्या आहेत.

Read More »

‘चक दे..’

पाकिस्तानचा चार - दोन असा धुव्वा उडवून आशियाई चॅम्पियन्स चषक देशाला जिंकून देणार्‍या हॉकीपटूंना भारतीय हॉकी महासंघाकडून जी अपमानास्पद वागणूक मिळाली ती निषेधार्ह आहे. ही काही अशा प्रकारची पहिलीच घटना नाही. दरवेळी हॉकीपटूंना अशाच प्रकारची अपमानास्पद वागणूक दिली गेली आहे. एकीकडे हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ असल्याचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे हॉकीपटूंना अशी हीन वागणूक द्यायची या ढोंगबाजीचा आता अतिरेक होऊ लागला आहे. क्रिकेटपटूंना परमेश्वर असल्यासारखे वागवणारे सरकार इतर देशी खेळांच्या खेळाडूंना मात्र सूतपुत्रासारखी वागणूक देते हे अनाकलनीय आहे. हॉकी फेडरेशनने आशियाई चषक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी फक्त पंचवीस हजार रुपये देऊ केले व तेही दिल्लीच्या ध्यानचंद स्टेडियमवर जाहीर समारंभ करून! स्वतःची लाज घालवणाराच हा सारा प्रकार होता. आमच्याकडे निधीची चणचण आहे, दिलेल्या मर्यादेत वागावे लागते, अंदाजपत्रकानुसार खर्च करावा लागतो वगैरे सबबी महासंघाचे सरचिटणीस नरेंद्र बात्रा यांनी सांगितल्या, परंतु निदान ही लाजीरवाणी बक्षिसे देण्याआधी क्रीडामंत्र्यांशी सल्लामसलत करून बक्षिसाची रक्कम वाढवण्याचा प्रयत्न झाला असता, तर त्यासाठी वाढीव तरतूद सरकारने नक्कीच केली असती. परंतु चाकोरीबाहेर पडायचेच नाही या कूपमंडूक वृत्तीमुळेच ही नामुष्की महासंघावर ओढवली आहे.

Read More »

दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव

Read More »

समर्थ सद्गुरूप्रती समर्पणानेच मुक्ती

- सतीश तलवाड

जीव हा ईश्‍वराचा अंश आहे. तरीही माणूस जन्म - मृत्यूच्या फेर्‍यात अडकून प्रकृतीच्या आधीन होऊन मायेला वशीभूत झाल्याने सदैव दुःख भोगत आहे. जड प्रकृतीमायेच्या आधीन झाल्याने तो स्वतःलाही जड प्रकृतीच समजू लागला आहे. अज्ञानात इतका रूतला आहे की, स्वतःचे खरे अस्तित्वच विसरला आहे. आपण अमृतमय अशा परमेश्‍वराचे पुत्र आहोत हेच विसरून गेला आहे. त्याची अवस्था त्या सिंहाच्या छाव्याप्रमाणे झाली आहे, जे आपल्या माता-पित्यापासून भटकल्याने मेंढ्यांमध्ये राहून मेंढ्यांप्रमाणेच वागत असते. तात्पर्य, जीव ईश्‍वराचा अंश असूनही अज्ञानामुळे कष्ट सोसत आहे. मृत्यूलोकात लाचार होऊन अनेक दुःखे भोगणार्‍या व जन्ममृत्यूच्या चक्रात सापडलेलाही जीव मुक्त होऊ शकतो.

Read More »

मृतदेहाची परवड

बदलत्या गोव्याच्या संदर्भात येथील मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाकडून आजवर झालेला कानाडोळा आणि लोकप्रतिनिधींची अशा प्रश्नांप्रतीची उदासीनता ही नव्या सामाजिक तणावांस तोंड फोडू लागली आहे हे मोरजीतील परवाच्या घटनेवरून दिसून आले. शुभांगी बागकर या महिलेच्या अंत्यसंस्कारासंदर्भात झालेला वाद अत्यंत दुर्दैवी आहे व एका मूलभूत सामाजिक समस्येकडे तो लक्ष वेधतो आहे. पर्यटनामुळे गोव्याची कीर्ती देशविदेशांत पोहोचली आणि येथील जमिनींना सोन्याचा भाव आला. मोक्याच्या जमिनी विकत घेण्याची अहमहमिकाच परप्रांतीय धनदांडग्यांमध्ये लागली आणि बघता बघता गोमंतकीयांनाच जमीन एक तर शिल्लक राहिली नाही अथवा ती त्यांच्या आवाक्यात राहिली नाही. जमीन विकली गेली तशा तेथील पारंपरिक प्रथा - परंपरांनाही आडकाठी आली. कुठे देवाच्या कौलाची पारंपरिक वाट अडवली गेली, तर कुठे पूर्वापार अंत्यसंस्कार जिथे होत तिथे कुंपण लागले. सार्वजनिक स्मशानभूमी हा प्रकार गोव्याच्या खेड्यापाड्यांत पूर्वी नव्हता.

Read More »