निष्ठुरांना दया

राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपी मुरुगन, संथान आणि पेरारीवलम यांनी आपल्या फाशीच्या सजेच्या कार्यवाहीविरुद्ध काल उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रदीर्घ न्यायालयीन सुनावण्यांनंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीची सजा कायम केल्यानंतर आणि तब्बल अकरा वर्षांनंतर राष्ट्रपतींनीही त्यांची दयेची याचना नाकारल्यानंतर येत्या नऊ सप्टेंबरला या तिघांना फाशी दिले जाणार होते. त्याविरुद्ध त्यांनी ही धाव घेतलेली आहे. कोणत्याही गुन्हेगाराला फाशी द्यावी का, हा प्रश्न मानवतावाद्यांकडून नेहमीच विचारला गेला आहे. सध्याच्या घटनाक्रमात पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटणार आहे. खरे तर या विषयाला तीन बाजू आहेत. एक मानवाधिकारवादी मांडतात ती भावनात्मक बाजू, दुसरी कायदेशीर बाजू आणि तिसरी राजकीय बाजू. या तिन्ही बाजूंनी वेगवेगळ्या प्रकारे विश्‍लेषण सध्या चाललेले आहे. कायदेशीर बाजूचा विचार केला, तर हे आरोपी आजवर सर्व प्रकारच्या न्यायप्रक्रियेतून गेलेले आहेत. टाडा न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत आणि अगदी राष्ट्रपतींपर्यंत त्यांनी न्यायाचे दरवाजे ठोठावून पाहिले, परंतु त्यांच्या गुन्ह्याची निर्घृणताच एवढी आहे की यापैकी कोणीही त्यांना सहानुभूती दर्शविली नाही आणि आपल्या पूर्वपरंपरेनुसार राष्ट्रपतींनीही दयेची याचना फेटाळून लावलेली असल्याने येत्या नऊ सप्टेंबरला या तिघांना फासावर चढवले जाणे सयुक्तिक ठरते.

Read More »

भाषा आंदोलन का थंडावले?

- कॅजिटन परेरा, म्हापसा

गोव्यातील भारतीय भाषा सुरक्षा मंच आज अस्तित्वात आहे की विसर्जित झाला? पर्रीकर आणि त्यांचा भाजपा कधी अण्णा हजारेमय होऊन गेला याची नक्की तारीख कोणी सांगेल का? शिंके तुटेल आणि लोणी खाली पडेल म्हणून टपून बसलेल्या बोक्याप्रमाणे भाजपा केवळ कॉंग्रेस पक्ष उताणा पडेल याचीच वाट बघत आहे. कॉंग्रेसला सत्ताभ्रष्ट करण्यासाठी येईल त्या संधीचा ङ्गायदा घ्यायचा हा एकमेव कार्यक्रम भाजपाने स्वीकारलेला आहे. त्याचप्रमाणे देशाची घटना आणि देशाच्या संसदेची प्रतिष्ठा कशी खाली आणता येईल हाही सदोदित चाललेला कार्यक्रम चालला आहे. साधूंची संसद आणता आली नाही, मग असलेल्या संसदेचे अवमूल्यन करीत राहण्यासाठी पार्लमेंटमध्ये नुसता ओरड आणि गोंधळ घालण्याचे काम भाजपाचे खासदार कधीही चुकवत नाही. आर्थिक मुद्दे आणि सामाजिक सुधारणा यांचा पुरस्कार करणारे कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्ष यांना कधी बदलावे हे समजू शकले नसल्यामुळे ते संपल्यातच जमा आहेत. या संधीचा ङ्गायदा रथयात्रेने भाजपाला त्यांनी मिळवून दिला. भाजपाचे लोकसभेतील संख्याबळ वाढले. त्यामुळेच आज भाजपा लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे.

Read More »

अण्णांनी बनविले राजकीय पक्ष संदर्भहीन

- . त्र्यं. जोशी

अण्णा हजारे यांच्या अटकेचा निषेध करताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी सरकारला उद्देशून अण्णा हजारे यांचे आंदोलन हा सरकारसाठी वेकअप कॉल असल्याचाअभिप्राय व्यक्त केला होता. अरुण जेटली हे अंतर्मुख होऊन विचार करणारे नेते आहेत. विरोधी पक्षात असल्याने आणि अटक प्रकरणात ते अण्णांच्या बाजूने असल्याने वेकअप कॉल सरकारसाठी असल्याचे त्यांनी म्हणणे क्रमप्राप्तच आहे. पण अण्णांच्या आंदोलनाचा इशारा केवळ सरकारसाठीच नाही तर सर्व राजकीय पक्षांसाठी आहे, असे त्यांना मनोमन निश्‍चितच वाटले असेल. कारण अण्णांच्या आंदोलनाने सर्वच राजकीय पक्षांना संदर्भहीन करून ठेवले आहे.

Read More »

उपोषण सोडताना अण्णा हजारे

Read More »

अण्णांनी उपोषण सोडले; मात्र लढा चालूच

उपोषण सोडल्यानंतर हजारे यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर हजारे यांना डॉ. नरेश त्रेहान यांच्या मेदांता मेडिसिटी इस्पितळात नेण्यात आले. तिथे दोन तीन दिवस हजारे यांच्या तब्येत स्थीर होईर्पंत त्यांना ठेवण्यात येईल. गेले १२ दिवस त्यांच्या पोटात अन्न गेले नसल्याने सुरूवातीस त्यांना पातळ पदार्थ देण्यात येत आहेत. त्यांचे वजन सुमारे ८ किलो घटले आहे. त्यांना थकवाही प्रचंड आलेला आहे.

Read More »

भ्रष्टाचारास विरोध मात्र संसद सर्वोच्च : सार्दिन

यावेळी सार्दीन म्हणाले, आपण नेहमी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे पण संसद हीच श्रेष्ठ असल्याने त्यांनीच निर्णय घ्यायचे असतात. जास्तीत जास्त अधिकार संसदेला आहेत. दरम्यान, आपण लोकसभेत असताना आपल्या गैरहजेरीत कुडतरी येथील निवासस्थानी रॅली आणल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

Read More »

गोव्यातील साखळी उपोषणेही स्थगित

पणजीतील आझाद मैदानावर रोज अंदाजे दहा जण साखळी उपोषणावर बसत असत. शनिवारपर्यंत तेथे उपोषणाला बसलेल्यांचा आकडा सुमारे ३००च्या आसपास असावा, असे गोवा अगेन्स्ट करप्शनचे नेते सतीश सोनक यांनी सांगितले.

Read More »

गैरकारभाराच्या आरोपानंतर केरी ग्रामसभेत खुर्चीफेक

पोलिसांना पाचारण; पंचांचा काढता पाय

सत्तरीतील केरी पंचायतीच्या काल झालेल्या खास ग्रामसभेत पुन्हा गदारोळ झाला. परिस्थिती हाताबाहेर जाऊन एकमेकावर खुर्ची फेकण्याचा प्रकार घडला. शेवटी भांडण थांबविण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. दरम्यान, गदारोळात तेथे उपस्थित पंचांनी काढता पाय घेतला.

Read More »

वालंकिणी यात्रा पुरस्कृत करण्याची राजकारण्यांत स्पर्धा

निवडणुका जवळ येत चालल्याने उमेदवारांनी कंबर कसली आहे.

सासष्टी तालुक्यातील हजारो भाविक तेथील राजकीय नेत्यांनी लाखो रु. खर्चून पुरस्कृत केलेल्या वालंकिणी यात्रेला जाऊ लागल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

Read More »

राष्ट्रकुल घोटाळा; खास चौकशी पथक स्थापन

राष्ट्रकुल घोटाळाप्रकरणी महालेखापालांच्या अहवालाचा अभ्यास करण्याकरिता सीबीआयने खास चौकशी पथक स्थापन केले असून या प्रकरणी काही नवीन गुन्हे दाखल करता येऊ शकतील का याचा शोध घेतला जाणार आहे.

Read More »