दिल्ली बॉम्बस्फोटाचा आणखी एक बळी

दिल्ली येथील उच्च न्यायालयाबाहेर ७ सप्टेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटातील आणखी एका जखमीचे काल निधन झाले. ५८ वर्षीय रतनलाल यांच्या निधनामुळे मृतांची संख्या १५ झाली आहे. रतनलाल यांचे डॉ. राममनोहर लोहिया रुग्णालयात काल सकाळी ८.२० वाजता निधन झाले. स्फोटात त्यांचे पाय तुटले होते. काल त्यांनी आपली पत्नी व मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, ती पूर्ण केली गेली, असे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.

Read More »

विकलांग विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनाची ग्वाही

पर्वरी येथील संजय स्कूलचा ताबा गोवा सरकारने स्थापन केलेल्या खास शिक्षणासाठीच्या संजय सेंटरने प्रोव्हेदोरियाकडून घेतला असल्याचे वरील स्वायत्त संस्थेच्या सदस्य सचिवानी विकलांग विद्यार्थ्यांसंबंधी काही वृत्तपत्रातून प्रसिध्द झालेल्या वृत्ताच्या संदर्भात म्हटले आहे. संस्थेवर शिक्षण खात्याचे प्रशासकीय नियंत्रण असून सध्या अस्तित्वात असलेल्या शिक्षण कायद्यानुसार खास गरजा असलेल्या विकलांग मुलांना वयाच्या २१ वर्षांपर्यंतच शिक्षण देणे शक्य आहे.

Read More »

आग्रा येथील हॉस्पिटलात बॉम्बस्फोट

१५ जखमी

Read More »

पणजीत वायू गळती

Read More »

बस कलंडून ८ प्रवासी जखमी

Read More »

मातृपितृ देवो भव:

- लाडोजी परब

भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षाला म्हाळवसम्हणतात. पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतचा हा काळ म्हणजेच श्राद्धपक्ष! ‘श्रद्धाया शब्दापासूनच श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोकी गेेलेल्या आपल्या वाडवडिलांची आठवण करण्याचा हा दिवस. आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या श्राद्धामागचा मूळ उद्देश आहे. ‘मातृपितृ देवो भव:’ ही संकल्पना पुढे नेत हिंदू धर्माने इतर धर्मीयांनाही एक आदर्श घालून दिला आहे.

Read More »

महिलांमध्ये होणारे आजार

- लेखिका डॉ. उर्बा जोशी

आज-कालच्या महिला आपल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका वठवत असतात. मग ती महिला एक आई असो, गृहिणी असो, वा नोकरी - व्यवसाय करून घर सांभाळणारी स्त्री असो! या सार्‍या महिला अशा तर्‍हेने आपापली विविध प्रकारे रूपे साकारताना बर्‍याचदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. काम करताना होणारी लहान-मोठी वेदना वा कमजोरीकडे दुर्लक्ष करून अनेक आजार वा रोगांना वाढायला, पसरायला बळ देतात. आमचं शरीर जेव्हा अशा तर्‍हेची वेदना, वाढ दाखवून आम्हांला सतर्क करते तेव्हा त्याची चाहूल आम्ही नजरअंदाज करून आमच्या जिवाला अधिक धोका निर्माण करीत असतो. अशा प्रकारचे कोणते वेगवेगळे आजार आम्हा बायकांना रोजच्या जीवनात त्रास देऊन नंतर गंभीर रोगांचे रूप धारण करू शकतात ते पाहूया.

Read More »

डिचोलीतील खाणींना भेट

Read More »

गॅस दरवाढ तूर्त टळली

या बैठकीवर यूपीएचे घटक पक्ष असलेल्या द्रमुक आणि तृणमुल कॉंग्रेसने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. सूत्रांनीही काही सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे बैठक झाली नाहीअसा दुजोरा दिला.

Read More »

न्या. शहा यांची डिचोलीतील खाणींना भेट

केंद्र सरकारने बेकायदा खाणींच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. शहा आयोग स्थापन केला आहे. काल न्या. शहा यांनी भेट देण्यावेळी आयोगाचे सदस्य यू. व्ही. सिंग, मुख्य वनपाल डॉ. शशी कुमार, वाहतूक खात्याचे अरुण देसाई, पोलीस अधीक्षक अरविंद गावस, जिल्हाधिकारी मिहिर वर्धन, उपजिल्हाधिकारी नारायण गाड, बोसेट सिल्वा, मामलेदार प्रमोद भट, गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाचे पदाधिकारी, इंडियन ब्युरो ऑफ माईन्सचे अधिकारी उपस्थित होते.

Read More »