मी अनुभवलेले नाईक सर

- राजकुमार देसाई, पर्वरी

२९ वर्षांपूर्वी मी ज्यावेळी अकरावीत शिकत होतो, त्यावेळी

माझा नाईक सरांशी परिचय झाला. सुरवातीला त्यांच्याशी

बोलायला भीती वाटायची. पण त्यांच्या स्वभावामुळे मी त्यांच्याशी

कधी समरस झालो हे समजलेच नाही.

गोव्यात माझ्या अंदाजे १९८२ - ८३ साली अ.भा.वि.. चे सक्रिय काम सुरु झाले. मी त्यावेळी जी.व्ही.एम. उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत होतो, त्यावेळी माझ्याकडे फोंडा शाखेची जबाबदारी आली. हळूहळू विद्यार्थी परिषदेच्या कामात मी रमलो व नाईक सरांशी संपर्क येऊ लागला. त्यावेळी त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर मी चर्चा करायचो. त्यामुळे खूप गोष्टी मी शिकू शकलो. विशेष म्हणजे नाईक सर वयाने मोठे असले तरी त्यांच्याशी कुठल्याही वैयक्तिक विषयावर बोलायला भीती वाटत नव्हती. माझ्या जडणघडणीत नाईक सरांचा मोठा वाटा

आहे.

Read More »

वीज टंचाईचे संकट

राज्याला भेडसावू शकणार्‍या संभाव्य वीजटंचाईचे सूतोवाच करून वीजमंत्री आलेक्स सिकेरा यांनी येऊ घातलेल्या संकटाची माहिती नागरिकांना दिली हे बरे झाले. जनतेमध्ये आपल्या खात्याविषयी नाराजी निर्माण होऊ नये यासाठी ज्या तत्परतेने त्यांनी वस्तुस्थिती जनतेपुढे ठेवली, ती कौतुकास्पद आहे. त्यांनी सांगितलेली बरीचशी माहिती चुकीची आहे हा भाग वेगळा. त्यांनी मांडलेल्या माहितीवरून एक गोष्ट मात्र पुरेपूर नजरेस येते, ती म्हणजे गोवा मुक्तीचा सुवर्णमहोत्सव आज आपण साजरा करीत असतानाही विजेच्या बाबतीत आपण संपूर्णपणे इतर राज्यांवर अवलंबून आहोत. अर्थात, गोवेकरांना हे सगळ्याच बाबतीत सवयीचे झाले आहे. माशांपासून भाजीपाल्यापर्यंत आणि अन्नधान्यापासून फळफळावळीपर्यंत सारे काही इतर राज्यांतून येथे येते. स्वयंपूर्णतेचा आपण ना कधी प्रयत्न केला, ना कधी त्या दिशेने धडपड केली.

Read More »

दिला धोका ओहोटीने

- कृष्णा महादेव शेटकर

१९५६ सालातील एप्रिल महिना. आयएनएस तीर नेव्हल कॅडेट ट्रेनिंग शीप पूर्वेकडील देशांच्या सदिच्छा भेटीवर असताना दहा दिवसांकरिता इंडोनेशियामधील जकार्ता बंदरात होते. तिथल्या वास्तव्यात माझा मित्र रीतपालसिंग राठोड अकस्मात आजारी पडल्यामुळे त्याला जकार्तामधील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. तिथेच त्या हॉस्पिटलमध्ये रीतपालच्या शेजारच्या कॉटवर एक फ्रेंच नौसैनिक होता. रीतपालला संध्याकाळी माझे भेटायला जाणे व्हायचे. तो फ्रेंच नौसैनिक कॉटवर बसून डायरीत काहीतरी लिहीत असताना मी सहज त्याला विचारले, ‘‘कसा आहेस तू?’’ जवळच तिथे एक इंडोनेशियन नर्स उभी होती. तीच म्हणाली, ‘‘हा फ्रेंच नौसैनिक जकार्ता बंदराच्या बाहेर एका राफ्टवर बेशुद्धावस्थेत असताना आमच्या कोळ्यांना मिळाला. त्या कोळ्यानेच त्याला इथे ऍडमिट केले. तीस दिवस तो भर समुद्रात तराफ्यावर होता. कोलंबो ते जकार्तापर्यंत येण्यास त्याला तीस दिवस लागले. तो त्या तीस दिवसांची डायरी लिहीत आहे.’’

Read More »

खाणसमर्थकांचे शक्तिप्रदर्शन

Read More »

शाह यांच्या जनसुनावणीत खाणसमर्थकांचे शक्तिप्रदर्शन

या सुनावणीला हजर असलेले पर्यावरणवादी व बिगर सरकारी संघटनांच्या प्रतिनिधींना यावेळी वरील खाण ट्रकांच्या लॉबीने तोंडही उघडू दिले नाही. ज्यांनी बेकायदा खाणींचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी हुज्जत घातली गेली.

Read More »

नरेंद्र मोदी यांचे तीन दिवसांचे सद्भावना उपोषण सुरू

आपल्या उपोषणाचा प्रारंभ करताना केलेल्या भाषणात मोदी यांनी २००१ सालचा भूकंप, २००२ सालची जातीय दंगल, २००८ ची बॉम्बस्फोटमालिका या घटनांचा उल्लेख करून सांगितले की, कसोटीच्या या प्रत्येक क्षणातून लोक अधिक सक्षम होऊन उभे राहिले आहेत व विकासाची नवी उंची त्यांनी गाठली आहे.

Read More »

आझिलोचे स्थलांतर भाजपाने तीन वर्षे केलेल्या पाठपुराव्यामुळे

आझिलो इस्पितळ नव्या इमारतीत हलवावे यासाठी गेल्या तीन वर्षांपासून भाजपने सातत्याने मागणी केली होती. पक्षाने त्यासाठी विधानसभेतही वेळोवेळी आवाज उठवला होता, असे पार्सेकर म्हणाले. मात्र, आपल्या हेकेखोरपणामुळे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी गेली तीन वर्षे लोकांना झुलवत ठेवले. त्यामुळे उत्तर गोव्यातील लोकांचे आरोग्य सुविधांअभावी खूप हाल झाल्याचे ते म्हणाले.

Read More »

प्रत्येकाने आपले अनुभवविश्‍व वाढवावे

अतुल कुलकर्णींनी साधला रसिकांशी संवाद

प्रत्येक माणसाने आपलं अनुभव विश्‍व हे वाढवण्याची गरज असून त्याद्वारेच माणसाचं जीवन समृद्ध बनू शकेल, असे ख्यातनाम हिंदी-मराठी चित्रपट व नाटक कलाकार अतुल कुलकर्णी यांनी काल कला अकादमीत रसिकांशी संवाद साधताना सांगितले. दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवानिमित्त काल कला अकादमीत अतुल कुलकर्णी यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.

Read More »

अफझल गुरूसंदर्भातील ठराव काश्मीर विधानसभेत चर्चेस येणार

संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेसंदर्भातील ठराव जम्मू व काश्मीर विधानसभेचे सभापती महंमद अकबर लोन यांनी कामकाजात समाविष्ट करून घेतला असून त्यावर या महिन्याच्या अखेरीस चर्चा व मतदान होणार आहे. उत्तर काश्मीरमधील लंगाट मतदारसंघातील अपक्ष आमदार अब्दुल रशीद शेख याने हा ठराव मांडला असून सभापती लोन यांनी आपल्याला आपला ठराव दाखल करून घेतल्याचे सांगितल्याची माहिती त्याने दिली.

Read More »

गॅस, डिझेल दरवाढ तूर्त नाही ः मुखर्जी

स्वयंपाकाचा गॅस, डिझेल व केरोसीनचे दर वाढवण्याचा सध्या विचार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काल सांगितले. कच्च्या तेलाच्या दरांवर भारत सरकारचे नियंत्रण नसल्याचे ते म्हणाले. भारताला दरवर्षी १०० दशलक्ष टन तेल लागते. त्यापैकी ७५ टक्के तेल आयात केले जाते.

Read More »