करंझाळेत फ्लॅट फोडून दोन लाखांची चोरी

Read More »

सांग्याचे पोलीस निरीक्षक निलंबित

Read More »

सलमान तासीर हत्याप्रकरण सुरक्षा रक्षकास फाशी

पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे गव्हर्नर सलमान तासीर यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या सुरक्षा रक्षकाला तेथील दहशतवादविरोधी न्यायालयाने काल फाशीची सजा सुनावली. तासीर यांना वादग्रस्त ईश्वरनिंदा कायद्यात बदल व्हावा या त्यांच्या वक्तव्याच्या रागाने या रक्षकाने ठार मारले होते.

Read More »

दसरा सण मोठा

- अजित पैंगीणकर

नऊ दिवस चालणारा हिंदूंचा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस दुर्गा देवीचा उत्सव असतो. त्याला शारदीय नवरात्र असेही म्हणतात. दुर्गा किंवा काली ही ज्या प्रमाणे ब्राह्मणांची कुलदेवता आहे, त्याप्रमाणे अनेक क्षत्रियांचीही ती कुलदेवता आहे. देवीच्या देवळातूनही सार्वत्रिक रीतीने हा उत्सव केला जातो. पहिल्या दिवशी घटस्थापना होते. लहानशा मातीच्या ढिगार्‍यावर गहू पेरून त्यावर मातीचा घट ठेवतात. घटावर देवीची स्थापना करतात. नऊ दिवस देवीचे पूजन करतात. रोज माळ घालणे, कुमारीचे पूजन करणे, अखंड दीप लावणे, उपवास करणे, सप्तशतीचा पाठ करणे, ब्राह्मण सुवासिनींना भोजन घालणे, हे आचार विविध कुळात पाळले जातात.

Read More »

ऐतिहासिक पारगड किल्ला

- चंद्रकांत रामा गावस

सह्याद्रीची मुख्य रांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेत सर्वात दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड किल्ला होय. कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुका आहे. चंदगड तालुक्यामध्ये पारगड किल्ला मोडतो. चंदगड या तालुक्याच्या गावापासून साधारण ३० कि. मी. अंतरावर निसर्गरम्य तिळारी प्रकल्पापासून पुढे कोल्हापूर - सिंधुदुर्ग सीमेवर ऐतिहासिक पारगड किल्ला आहे. पारगड नावाचे गाव किल्ल्यामध्येच वसलेले आहे. पारगडापर्यंत गाडीमार्ग आहे. पारगडापर्यंत चंदगडहून एस. टी. बसची सोय उपलब्ध आहे. ही बस गडाच्या पायर्‍यांपर्यंत जाते. खाजगी वाहन गडाला वळसा घालून गडाच्या माथ्यावर नेता येते. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा ऐतिहासिक किल्ला पाहणे पर्यटकांसाठी एक दुग्धशर्करायुक्त योग आहे. महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळ या दृष्टिकोनातून या किल्ल्याचे जतन व विकास करावयास प्रारंभ केला आहे.

Read More »

पार्से गावची श्री देवी भगवती महिषासुरमर्दिनी

- विजय प्रभू पार्सेकर देसाई नानेरवाडा-पेडणे.

बुधवार २८ सप्टेंबरपासून नवरात्रौत्सव सुरू झालेला आहे. प्राचीन काळी आणि मध्ययुगीन भारतात ज्या प्रमुख उपास्य देवता होत्या, त्यात श्री देवी भगवतीचे स्थान आणि महात्म्य फार मोठे आहे, असे इतिहास सांगतो. देवी भगवतीचे उपासक एका विशिष्ट तत्वज्ञानाचे भोक्ते होते. आणि म्हणूनच प्रत्येक गावात भगवती मंदिर आहे. काही ठिकाणी ते निराळ्या नावानेही आहे. आमचा पार्से गाव त्याला अपवाद कसा असणार? येथील भगवतीचे देऊळ हजार वर्षांपेक्षाही पुरातन असून हे पूर्वी चावडेवाड्यावर होते. माझे पूर्वज केशव परोब यांस मर्दुमकी गाजवल्याबद्धल आदिलशाहकडून अकरा गावे वतन आणि पालखी देऊन त्यांना राजमान्य राजश्री पालखीपदस्य केशव उपाख्य आबासाहेब प्रभू पार्सेकर देसाईम्हणून गौरवण्यात आले. त्यांनी सातशे वर्षांपूर्वी चावडेवाड्यावरून आई भगवतीची स्थापना सध्याच्या ठिकाणी केली. माझे पणजोबा जिवाजी उपाख्य आपासाहेब प्रभू पार्सेकर देसाईंनी सभागृह आणि नंतर माझ्या आजोबांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत बाहेरील मंडप आणि एक दीपस्तंभ बांधण्यात आला. आई भगवती ही आमची कुलदेवता आणि ग्रामदेवताही आहे. पूर्वाश्रमीचे परोब हे स्थलांतरित नसून पार्से गावातील वायडोंगरी येथील. म्हणूनच त्यांची कुल आणि ग्रामदेवता एकच आहे. इतरांचे तसे नाही.

Read More »

सोपटेही गेले!

दयानंद सोपटे यांच्या रूपाने भाजपाचा दुसरा आमदार अटकळीप्रमाणेच राजीनामा देऊन काल कॉंग्रेसच्या वाटेला लागला. आणखी एक दोघेही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून कॉंग्रेसच्या पंढरीची वाट चालू लागतील याविषयी आता काही संशय उरलेला नाही. पाटणेकरांनी पक्ष सोडताना डिचोलीचा विकास आणि मतदारसंघासाठी शंभर नोकर्‍यांचे आश्वासन मिळाल्याचे कारण पुढे केले होते. सोपट्यांना कदाचित पेडण्याच्या विकासाचे आश्वासन मिळाले असेल. काणकोण आणि मुरगावचा विकासही कॉंग्रेसला करावासा वाटतो आहे. मतदारसंघ पुनर्रचनेतून निर्माण झालेल्या बिकट पेचप्रसंगातून सोपटे यांना गमावण्याची पाळी भाजपावर आली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे सोपटे यांना मतदारसंघ उरला नव्हता. त्यामुळे ते गेला काही काळ अस्वस्थ होतेच. पक्षाने त्यांना उत्तर गोव्याचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली असली तरी ही केवळ निवडणुकीपुरती जबाबदारी असल्याने सोपटे नाराज होते. त्यानंतर आपले काय होणार ही चिंता त्यांना सतावत असावी. सध्याच्या राजकारणामध्ये एकदा बाहेर फेकली गेलेली माणसे वैयक्तिक करिश्मा गाठीशी नसेल तर पुन्हा कधी त्या वर्तुळात परतत नाहीत हे सोपटे यांना पुरते ठाऊक आहे.

Read More »

दयानंद सोपटे यांचा भाजपला रामराम

Read More »

दयानंद सोपटे यांचा भाजपला रामराम

मांद्रे मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आपण कॉंग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस पक्षाचे भाषिक व सांस्कृतिक धोरण आपल्याला मान्य आहे काय, असा प्रश्‍न विचारला असता, ते तेथील कार्यकर्त्यांना, मतदारांना मान्य आहे म्हणूनच त्यांनी कॉंग्रेस प्रवेशास पाठिंबा दिल्याचे सोपटे यांनी सांगितले.

Read More »

पाटणेकर व सोपटे यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

यावेळी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे व पंचायतमंत्री बाबू आजगावकर उपस्थित होते. सोपटे यांच्या प्रवेशामुळे पेडणे तालुक्यात कॉंग्रेस संघटित होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया आजगावकर यांनी व्यक्त केली. आरोग्यमंत्र्यांनी या दोघांच्याही कॉंग्रेस प्रवेशाचे स्वागत केले.

Read More »