ऍपयुद्ध

  रामराव वाघ भारत सरकारने जरी आपल्या सुरक्षेचे कारण देऊन चिनी अप्सवर बंदी आणली तरी चिनी उद्योगांचे कंबरडे मोडणे व त्यामुळे चीनमध्ये अस्थिरता निर्माण करणे हेदेखील एक उद्दिष्ट यामागे आहे. भारत हा जगामध्ये सर्वाधिक वेगाने स्मार्टफोन ग्राहक वाढवणारा देश आहे. २०२२ मध्ये देशामध्ये ४० कोटीहून अधिक नागरिकांकडे स्मार्टफोन असणार आहेत व त्यामुळेच भारतीय ऍप-बाजारपेठ महत्त्वाची आहे. भारत सरकारने २९ जून ... Read More »

चिनी महासत्तेचा फुगा फुटेल!

दत्ता भि. नाईक हॉंगकॉंगच्या स्वातंत्र्यासाठीही भारत सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. आज भारताला सर्व बाजूंनी वेढा घालू पाहणार्‍या चीनचे विभाजन झाले तर चीन शत्रूराष्ट्रांनी वेढला जाईल. अंतर्गत असंतोषामुळे चीन कोसळला तर महासत्तेचा फुगा आपोआपच फुटेल. दि. ६ जुलै रोजी वृत्तसंस्थांनी प्रसारित केलेल्या वृत्तानुसार चिनी सेनादलांनी आपले तंबू भारत व चीन यांच्यामधील लडाखमधील गलवान खोर्‍यातील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेपासून दोन ते तीन किलोमीटर मागे ... Read More »

नदीचे सूक्त

 डॉ. सोमनाथ कोमरपंत नदी मुक्त मानाने, मुक्त हस्ताने दान देत असते. पण घेणार्‍याने ते किती घ्यावे, कसे घ्यावे याचे भान ठेवायला हवे. नदीच्या वाहत्या प्रवाहात जी अंतर्मुखता आहे, ती नको का आपण घ्यायला? सारेच सुख ओरबाडून घेतले तर शेवट काय होईल? जलतत्त्वामध्ये महासागर, समुद्र यांच्याइतकेच नदीला महत्त्व आहे. भौतिकदृष्ट्या तसेच सांस्कृतिक संदर्भमूल्य असलेली नदी नेहमीच गौरविली गेली आहे. नदी म्हणजे ... Read More »

ऋतुगंध पाऊस

 पौर्णिमा केरकर आभाळ भरलेलेच राहिले. रिते होणार होणार म्हणून कितीतरी वेळ झाडांनी वाट पाहिली… तिन्हीसांज गडद होत गेली. वार्‍याची हलकी लहर घरभर कवठी चाफ्याचा गंध घेऊन नाचली. गॅलरीचा दरवाजा उघडला तर कदंब फुलांचा भपका एकदम आत शिरला… तिन्हीसांज दाटून आली होती. आभाळात जमलेले आषाढघन आता कधीही… कोणत्याही क्षणी बरसू लागतील असेच काहीसे चित्र अवतीभवती दिसत होते. झाडेच जणू काही मेघांचा ... Read More »

गुरू परमात्मा परेशू

मीना समुद्र गुरू आकाशाच्या विशाल अंतःकरणाचा आणि धरणीच्या मायेचा असल्याने आपल्या शिष्यासाठी त्याचा हात आशीर्वादाचाच असतो आणि त्याचे पाय हे पथप्रदर्शकच असतात. असा सद्गुरू लाभणे ही जीवनातील अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आषाढ शुक्ल पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा नुकतीच साजरी झाली. चार वेद आणि अठरा पुराणे लिहिणार्‍या द्रष्ट्या व्यासऋषींची ही परमपावन जन्मतिथी. केवळ भारतालाच नव्हे तर सर्‍या जगाला धर्म, न्याय, नीती, मानसशास्त्र, ... Read More »

बँका ः आर्थिक व्यवहारांचा कणा

शशांक मो. गुळगुळे वित्तीय संस्था अनेक प्रकारच्या असल्या तरी त्यांत बँकेचे स्थान वेगळेच आहे. कारण बँका या ग्राहककेंद्रित आहेत. सामान्यांच्या जीवनासाठी निगडित आहेत. त्यामुळे आर्थिक बचत व गुंतवणुकीच्या संदर्भात बँकांचे स्थान निर्विवाद आहे हे नक्की! प्रत्येकजण आपल्या आयुष्यातला पहिला आर्थिक व्यवहार हा बँकेपासूनच करतो. प्रत्येकाचा बँकेशी संबंध येतो. आर्थिक समावेशकतेसाठी सामान्यातल्या सामान्य माणसाचा बँकेशी संबंध यायला हवा यासाठी सध्याच्या केंद्र ... Read More »

कॅरेबियन दिग्गज सर एव्हर्टन वीक्स कालवश

सुधाकर रामचंद्र नाईक १९४० ते ५० या दशकात जागतिक क्रिकेटवर आधिपत्य गाजविलेल्या वेस्ट इंडीजच्या प्रख्यात ‘थ्री डब्ल्यू’ त्रिकुटात समाविष्ट असलेल्या वीक्स यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग पाच शतकांचा विक्रम तसेच सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्याहून जलद १००० कसोटी धावांचा संयुक्त विश्‍वविक्रमही नोंदवला होता. वेस्ट इंडीजचे महान फलंदाज सर एव्हर्टन वीक्स (९५) यांचे नुकतेच वृद्धापकाल तथा आजाराने निधन झाले. १९४० ते ५० या ... Read More »

दुबेचा खात्मा

गेले काही दिवस अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेला कानपूरचा कुख्यात गुंड विकास दुबे याच्या कालच्या एन्काऊंटरद्वारे उत्तर प्रदेश पोलिसांनी आपल्या आठ सहकार्‍यांच्या हत्येचा यथायोग्य सूड उगवला असे म्हणायला हरकत नाही. आपल्याला पकडायला आलेल्या पोलीस पथकावर एखाद्या हिंदी चित्रपटातल्याप्रमाणे दुबेच्या गुंडांनी घराच्या छतावरून गोळीबार करून त्यांची निर्घृण कत्तल केली होती. त्यानंतर त्याच्या शोधार्थ पंचवीस पोलीस पथके तैनात केली गेली, त्याच्यावर पाच ... Read More »

शिक्षकांना घरातून काम करू देण्याचा प्रस्ताव

>> आरोग्य व शिक्षण सचिव नीला मोहनन यांची माहिती ाज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना घरातून काम करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या आदेशानंतर शिक्षण खात्याने शिक्षकांना घरातून काम करण्यासंबंधीचा नवा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला असून योग्य निर्णय घेतला जाणार आहे, असे आरोग्य व शिक्षण सचिव नीला मोहनन यांनी सांगितले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. काल राज्यात १०० ... Read More »

‘कोविड-१९’ उपाययोजनांसाठी संरक्षण मंत्रालयाकडून सर्वतोपरी मदत

>> आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची ग्वाही संरक्षण मंत्रालयाकडून गोवा सरकारला कोविड – १९ उपाययोजनांसाठी सर्व प्रकारची मदत केली जाणार आहे, अशी माहिती संरक्षण, आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, संरक्षण दलाच्या तिन्ही विभागाच्या राज्यातील प्रमुख अधिकार्‍यांसोबत आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. राज्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या चिंतेचा विषय आहे. राज्य सरकार कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी ... Read More »