भावी पिढीच्या भवितव्यासाठी ः ‘वनमहोत्सव’

पौर्णिमा केरकर वनमहोत्सव ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कित्येक जण ही बांधीलकी आजही जतन करीत आहेत. वृक्षांचे जीवन म्हणजे एक आगळावेगळा सुगंध. त्याची मुळे जमिनीत खोलवर जाऊन स्वतःसाठी जीवनरस शोषतात… मानवी मनाला जीवन जगण्याचा संदेश देत तो सर्वदूर पसरतो. तो संदेश ओळखून कार्यरत राहिलो तरच मानवी अस्तित्व टिकेल.! महोत्सव म्हटला की प्रचंड उत्साह… अमर्याद आनंद… आणि वातावरणात भरून राहिलेले चैतन्य… ... Read More »

‘छोटा परिवार, सुखी परिवार’

 प्रा. नागेश सु. सरदेसाई आजच्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी एकजूट होऊन या विषयाचा गांभीर्याने विचार करायला हवा. एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक छोटा परिवार ठेवला तर आपण आपल्या देशाला फार मदत करू शकतो. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा! ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. जनमानसामध्ये जागृती घडवून आणणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. ... Read More »

काय आहेस तू माझा…

– निशा पोकळे काय आहेस तू माझा तू माझे विचार, की अबोल काव्य आहे माझा श्रृंगार, की नुसताच आरसा आहे अंतरी मनीचे भाव माझ्या, की आहे सुंदर कल्पना माझा तू स्नेह आहे, की क्षणिक सुखाचं आकर्षण की मी म्हणू तू माझे सुंदर जीवन आहे काय आहेस तू माझा तू माझी प्रभात आहे, संध्याही तूच माझी रात्री स्वप्न ही तुझीच मला, ... Read More »

कोरोना व्हायरस आला अन्…..

– सावित्री घाडी (शिक्षिका-जी.एस.आमोणकर वि.मं. म्हापसा) या काळात आपण आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देत आहोत त्यामुळे आरोग्याचा दर्जा सुधारत आहे. सर्व प्रकारच्या व्यसनांवर मर्यादा आली आहे, त्यामुळे त्यातून उद्भवणारे आजार कमी झाले आहेत. सार्‍या मानवजातीवर या काळात योग्य निर्बंध आले आहेत. त्यामुळे मानवी जीवन संतुलित झाले आहे.  ‘‘कोरोना व्हायरस आला अन् मानवजातीला शिकविला धडा ’’ जगात सर्वत्र कोरोना व्हायरसने हाहाःकार ... Read More »

सवयीचे गुलाम

 अनुराधा गानू (आल्त-सांताक्रूझ, बांबोळी) अशा हजारो लोकांना हजारो सवयी असतील. पण या सवयी मुद्दाम कोणी लावून घेत नाहीत. त्या आपोआपच लागतात. पण एकदा लागल्या की त्या सवयीचे गुलाम आपण कधी होऊन जातो हे आपल्याला कळतच नाही, हो ना! एकदा मी आणि मैत्रीण बसस्टॉपवर उभ्या होतो. आमच्या शेजारी एक माणूस उभा होता. तो दर थोड्या थोड्या वेळाने इकडे-तिकडे बघायचा आणि डोळे ... Read More »

प्लाझ्मा थेरपीच्या मर्यादा

कोरोनाने बुधवारी गोव्यात १३६ नव्या रुग्णांचा उच्चांक प्रस्थापित केला. एकूण रुग्णसंख्येने दोन हजारांची पातळी ओलांडली. आठ बळी गेले होतेच, काल पुन्हा आणखी एक बळी गेला. एकूणच कोरोनाच्या या राक्षसाला आवरायचे कसे हा पेच आज गोव्यासमोर उभा आहे. सरकारचे आधीच तोकडे असलेले हात कोरोनाला रोखण्यात दिवसेंदिवस अधिकच अपुरे पडू लागल्योचे दिसते आहे. एकीकडे वाढत्या रुग्णसंख्येनिशी उपचार सुविधांचा भासू लागलेला तुटवडा आणि ... Read More »

कोरोनाचे राज्यात पुन्हा शतक पार

>> नवे ११२ रुग्ण; ९ वा बळी राज्यात नवव्या कोरोना बळीची काल नोंद झाली असून नवीन ११२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मडकई, चिंबल, वास्को, मांगूर, शिरोडा, मडगाव, लोटली, मंडूर, कुंकळ्ळी, नेरूल, उसगाव आदी भागात नवीन रुग्ण आढळले. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या ८६९ झाली आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह ६६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ... Read More »

रासई, कुंकळ्ळी, बाळ्ळीत ३७ कोरोनाबाधित रुग्ण

काल गुरूवारी रासई, कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत व बाळ्ळी येथे ३७ कोरोनाबाधित सापडले. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत काम करणार्‍या दोन पॉझिटिव्ह कर्मचार्‍यांच्या कुटुंबीय व तेथील इतर कर्मचार्‍यांच्या लाळेची तपासणी केली असता एकंदर ७ जण पॉझिटिव्ह सापडले. बाळ्ळी येथे काल चारजण पॉझिटिव्ह सापडले. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यातील दोघेजण वेर्णा औद्योगिक वसाहतीत काम करीत होते. त्या दोघांना व त्यांचा संपर्क आलेले ... Read More »

राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती

>> पेडणे, डिचोली, बार्देशमध्ये सतर्कतेचा इशारा राज्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. डिचोली तालुक्यातील बहुतेक नद्यांना पूर आल्यामुळे डिचोली तालुक्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. काणकोण तालुक्यातही मुसळधार पाऊस पडत असून तळपण नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शापोरा आणि तेरेखोल नदीच्या पाण्यात वाढ झाल्यामुळे पेडणे तालुक्यात धोक्याचा इशारा देण्यात ... Read More »

जीसीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

गोवा तांत्रिक शिक्षण संचालनालयाने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित अशा तीन विषयांच्या घेतलेल्या गोवा सामान्य प्रवेश परीक्षा २०२० चा निकाल जाहीर केला आहे. अभियांत्रिकी आणि फार्मसीमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती. गौरव अवस्थी याने भौतिकशास्त्रात ७० आणि रसायनशास्त्र व गणित विषयात ७२ गुण घेऊन या तिन्ही विषयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. निकालाची सविस्तर माहिती तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या ... Read More »