आमदार मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर

पणजी मतदारसंघाचे आमदार बाबुश मोन्सेरात यांची प्रकृती बिघडल्यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये त्यांना काल दाखल करण्यात आले. आमदार मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. दरम्यान, आमदार मोन्सेरात यांची प्रकृती उच्च रक्तदाबामुळे बिघडल्याची माहिती इस्पितळातील सूत्रांनी दिली. आमदार मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे कारण नाही, असे पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ... Read More »

विधानसभा अधिवेशनासाठी मार्गदर्शक सूचना जारी

गोवा विधानसभेच्या येत्या सोमवार दि. २७ जुलै २०२० रोजी होणार्‍या एकदिवसीय पावसाळी अधिवेशनासाठी कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर खास मार्गदर्शक सूचना काल जारी करण्यात आल्या आहेत. या अधिवेशनातील कामकाज पाहण्यासाठी नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांना विधानसभेच्या आवारात चार वैयक्तिक कर्मचारी सोबत नेण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर मंत्र्यांना २ वैयक्तिक कर्मचारी आणि आमदारांना १ वैयक्तिक कर्मचारी सोबत नेण्यास मान्यता ... Read More »

आमदारांच्या अपात्रता याचिकेवर आज सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकेवर शुक्रवार दि. २४ जुलैला सुनावणी होणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ७ ऑगस्टला सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु, या अपात्रता याचिकेवर जलदगतीने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आल्याने लवकर ... Read More »

सचिन पायलट यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर काल सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष जोशी यांनी केलेली मागणी फेटाळून लावली. त्यामुळे उच्च न्यायालयातील सुनावणीचा आणि निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी सचिन पायलट यांच्यासह १९ आमदारांना अपात्र घोषित करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. या नोटीसीला ... Read More »

सरकारी महाविद्यालयांत हॉस्टेल्स उभारणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाच्या बैठकीमध्ये केंद्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानातून साखळी, खांडोळा, केपेच्या सरकारी महाविद्यालयासाठी हॉस्टेल्स बांधण्याचा निर्णय काल घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक ईडीसी इमारतीतील जीएसआयडीच्या कार्यालयात घेण्यात आली आहे. या बैठकीमध्ये पीडित महिला आणि मुलांसाठी बांबोळी येथे वन स्टॉप सेंटर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंसेला बळी पडलेल्या महिलांना वैद्यकीय, कायद्याची ... Read More »

मालिका विजयासाठी इंग्लंड, वेस्ट इंडीज सज्ज

>> निर्णायक तिसरा कसोटी सामना आजपासून इंग्लंड व वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा व निर्णायक कसोटी सामना आजपासून मँचेस्टर येथे खेळविला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून विंडीजने आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने दुसरी कसोटी जिंकून आव्हान कायम राखले होते. आता तिसर्‍या सामन्याचा विजेता मालिका आपल्या खिशात घालणार आहे. दुसरा कसोटी सामना झालेल्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरच तिसरा सामना होणार आहे. दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या ... Read More »

भारतीय मिश्र रिले संघाला मिळणार सुवर्णपदक

>> बहरीन संघाची खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी जकार्ता येथे २०१८साली पार पडलेल्या आशिया खेळांतील ४४०० रिलेमध्ये जकार्ताला मिळालेले सुवर्णपदक धावपटू केमी अदेकोया उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्याने काढून घेण्यात आले. त्यामुळे आता रौप्यपदक विजेत्या भारतीय संघाला सुवर्णपदकाचा मान मिळणार आहे. ऍथलेटिक्स इंटिग्रीटी युनिट्‌ने बहरीनच्या संघावर कारवाई करीत भारताला हे सुवर्णपदक बहाल केले. २०१८च्या आशियाई खेळांत रौप्यपदक मिळविलेल्या भारतीय संघात मोहम्मद ... Read More »

बेभरवशाचे ऍप

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी ‘आरोग्यसेतू’ ऍप ज्यांना ‘सुरक्षित’ असल्याचा निर्वाळा देत असेल, त्यांनाच प्रवेश देण्याचे जे परिपत्रक काढले, त्याबाबत वाद निर्माण होताच मुख्यमंत्र्यांनी काल स्वतः त्यासंदर्भात स्पष्टीकरण केले. ज्यांच्याजवळ स्मार्टफोन आहेत, त्यांनाच हे परिपत्रक लागू असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने या वादाला जे राजकीय स्वरूप देण्याचे प्रयत्न चालवले होते, ते ... Read More »

लक्षणविरहित रुग्णांना घरीच क्वारंटाइन

>> केंद्रीय मार्गदर्शक तत्वांनुसार राज्य सरकारचा प्रस्ताव सध्या तरी आणखी लॉकडाऊनचा विचार नसल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना स्पष्ट केले. तसेच लक्षण विरहित रुग्णांना घरीच क्वारंटाइन करण्याबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव असून केंद्रीय मार्गदर्शक तत्वांनुसार तो अमलात आणला जाईल, असे ते म्हणाले. कोरोनाचा संसर्ग झालेल्या मात्र त्यासंबंधीची कोणतीही लक्षणे व दिसणार्‍या रुग्णांना होम क्वारंटाइन ... Read More »

राज्यात नवे १४९ पॉझिटिव्ह रुग्ण

>> तिघांचा मृत्यू : बळींची संख्या झाली २९ >> वास्कोत सर्वाधिक २८ रुग्ण सापडले राज्यात सलग दुसर्‍या दिवशी तिघांचा कोरोनाने बळी घेतला असून बळींची संख्या २९ झाली आहे. नवीन १४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या १६०७ झाली आहे. बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह ९२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतपर्यंत ४१७६ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून आत्तापर्यंत २५४१ ... Read More »