वास्कोत दामोदर सप्ताहास प्रारंभ

>> कोरोना संकट दूर करण्याचे श्रीचरणी गार्‍हाणे वास्कोचे ग्रामदैवत देव दामोदराच्या चरणी श्रीफळ अर्पण करून १२१ व्या अखंड २४ तासांच्या वार्षिक दामोदर भजन सप्ताहाची काल रविवारी प्रारंभ झाला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा हा सप्ताह सार्वजनिकरित्या साजरा न करण्याचे समितीने ठरवले असून काल प्रथमच १२१ वर्षांच्या इतिहासात सप्ताहाची सुरुवात भाविकांना प्रवेश न देता झाली. जोशी कुटुंबातील प्रशांत जोशी यांच्या हस्ते श्रीचरणी ... Read More »

तर भारत सिडनी कसोटी जिंकला असता

>> इरफानची स्टीव बकनर यांच्यावर खरमरीत टीका टीम इंडियाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने आयसीसीचे माजी पंच स्टीव बकनर यांच्यावर सडकून टीका केली आहे. तब्बल १२ वर्षांचा कालावधी घेतल्यानंतरही केवळ दोनच चूका मान्य केल्याबद्दल त्याने आश्‍चर्यदेखील व्यक्त केले आहे. अँड्र्‌यू सायमंंडस् ज्यावेळी फलंदाजी करत होता, तेव्हा तो ३ वेळा बाद झाला होता. परंतु पंचाने एकदाही त्याला बाद घोषित केले नाही, ... Read More »

हिमाकडून ‘सुवर्ण’ समर्पित

जकार्ता पालेमबाग येथे २०१८ साली झालेल्या १८व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील मिश्र रिले प्रकारात मिळवलेले सुवर्णपदक ‘कोरोना वॉरियर्स’ना समर्पित करत असल्याचे ट्विट भारताची आघाडीची धावपटू हिमा दास हिने काल रविवारी केले. हिमाबरोबर भारतीय संघात मोहम्मद अनास, एम.आर पुवम्मा आणि अरोकिया राजीव यांचा समावेश होता. या स्पर्धेत बहारिनने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. परंतु, बहारिन संघातील केमी अँडेकोया ही उत्तेजन सेवन चाचणीमध्ये दोषी ... Read More »

आता माघार नाही!

 डॉ. मधू घोडकीरेकर (सहयोगी प्राध्यापक, न्याय वैद्यक विभाग, गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी) भरतीलाही एक मर्यादा असतेच. तिथे पोहोचली की ओहोटीला सुरुवात होते. या कोरोनाच्या लाटेलाही अशी मर्यादारेखा असणार व तेथूनच तिची ओहोटी सुरू होणार. तोपर्यंत आम्हाला रेतीत घट्ट पाय रोवून राहायचे आहे. कोरोनाला सांगून टाकायचे आहे, आता आमची माघार नाही! यंदाचा पावसाळा कधी आला अन् श्रावण कधी सुरू झाला कळलेच ... Read More »

सचिन पायलट यांचे क्रॅश लँडिंग?

 दत्ता भि. नाईक सचिन पायलट यांनी कॉंग्रेस पक्ष सोडल्यामुळे अनेक प्रश्‍न उद्भवलेले आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाणार नाही असे सध्यातरी म्हटलेले आहे. ते स्वतःचा नवीन पक्ष स्थापू शकतात. अखेरीस पायलट यांच्या क्रॅश लँडिंगमुळे काय काय निष्पन्न होईल ते आता पाहावे लागेल. सोमवार, दि. १३ जुलै रोजी राजधानी जयपूर येथे आयोजित राजस्थान प्रदेश कॉंग्रेसच्या प्रदेश विधानसभा सदस्यांच्या बैठकीत प्रदेश कॉंग्रेसचे ... Read More »

जय गंगे भागीरथी

 डॉ. सोमनाथ कोमरपंत तिन्हीसांजेला गंगाकिनारी ‘गंगाआरती’ होते; नदीपात्रात ‘दीपदान’ केले जाते. ते पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. मनातील उदात्त भाव जागे होतात. पण या ‘आरती’त जर आर्तता नसेल आणि तिच्या रक्षणासाठी ‘नेत्रांची निरांजने’ जोवर तेवणार नाहीत तोपर्यंत सारे व्यर्थ आहे. ‘नदीचे सूक्त’ आणि ‘साहित्यातील नदीवर्णन’ या लेखांत गंगा नदीचा उल्लेख होणे अपरिहार्य होते. पण भारतवर्षाची भाग्यरेषा प्राचीन कालापासून खुलविणारी जीवनदायिनी म्हणून ... Read More »

कुत्सित

 दत्ताराम प्रभू-साळगावकर सर्वसाधारणपणे बोलणं किंवा सांगणं हे सरळ, स्वच्छ असावं. बोलण्याला अर्थ असतो, महत्त्व असतं व प्रसंगी पत्थ्यही असतं, नव्हे असावंच. शब्द उधळण्यासाठी नसतात. बोलणं म्हणजे काय? जे आपण आपल्या मुखकमलातून उच्चारतो ते बोल; त्याला सांगणं म्हटलं तरी चालेल. बोलणं आणि सांगणं एकच. सर्वसाधारणपणे बोलणं किंवा सांगणं हे सरळ, स्वच्छ असावं. बोलण्याला अर्थ असतो, महत्त्व असतं व प्रसंगी पत्थ्यही असतं, ... Read More »

सॅल्यूट… त्या असीम धैर्याला!

पौर्णिमा केरकर ‘ऑपरेशन विजय’ची असीम धैर्यगाथा ही तमाम भारतीय नागरिकांसाठी अभिमान- स्वाभिमानाची गोष्ट आहे. हा अभिमान कारगिलच्या भूमीत पाय ठेवताक्षणी शरीरातील नसनस रोमांचित करतो. तो अती थंड बर्फाळ प्रदेश पाहताना आमचे जवान या अशा कडाक्याच्या थंडीत कसे बरे लढले असावेत? २०१८ सालचा मे महिना. लेह-लडाख ते श्रीनगर-द्रास-कारगिलमार्गे असा प्रवास करायचा होता. आजपर्यंत देशाच्या विविध राज्यांतील ग्रामीण भागांत प्रवास केलेला आहे. ... Read More »

जंतर-मंतर

 मीना समुद्र शब्दातलं ‘जंतर-मंतर’ लक्षात आलं की लेखनातलं ‘तंतर’ (तंत्र) लक्षात आलंच म्हणून समजावं. सध्याच्या ‘मरगळलेल्या’ काळात आठवणींचा ‘तिळा उघडल्या’वर असे वरवर निरर्थक वाटणारे ‘कळीचे’ शब्द भोवती गोळा होतात आणि मनात स्मरण-रंजनाचा खेळ रंगतो. तिन्हीसांजेला काळोख दाटत आला तशी चिंटूची आई देवाजवळ सांजवात लावायला उठली. बाहेर अंगणात खेळणारे चिंटूचे सवंगडीही घरोघर पसार झाले तेव्हा आईची हाक ऐकून चिंटू धावत धावत ... Read More »

नागरी व राष्ट्रीय बँकांवर शासकीय नियंत्रण

 प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट या बँकांची स्वायत्तता आणि या बँकांशी सर्वसामान्य माणसाचे असलेले नाते पाहता या नव्या नियंत्रणाने धक्का पोचणार नाही याचीही काळजी शासनाने व रिझर्व्ह बँकेने घेणे आवश्यक आहे. सहकार चळवळीतून जन्माला आलेल्या आणि ग्रामीण व नागरी भागांतील अर्थव्यवस्थेला वरदान ठरून ऊर्जितावस्थेला आणणार्‍या नागरी व बहुराज्य नागरी सहकारी बँका केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत हे ... Read More »