कुवेतमध्ये विदेशी कामगारांच्या संख्येवर मर्यादा

>> गोमंतकीय नागरिकांनाही बसणार फटका कुवेत प्रशासनाने विदेशी कामगारांच्या संख्येवर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतल्याने तेथे कार्यरत असलेल्या अनेक गोमंतकीय नागरिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कुवेत नॅशनल ऍसेंब्लीच्या न्याय व विधी समितीने विदेशी कामगारांच्या संख्येवर मर्यादा घालणार्‍या मसुदा विधेयकाला मान्यता दिली आहे. त्यामुळे कायद्याची अमलबजावणी सुरू झाल्यानंतर कुवेतमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे ७ लाख भारतीय नागरिकांना परतावे लागणार आहे. ... Read More »

चीनचे सैन्य मागे हटले

कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत ज्या ठिकाणाहून सैन्य मागे घेण्याचे निश्चित झाले होते, तिथून चीनचे सैन्य, वाहने, तंबू आणि सैनिक एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. एएनआयने हे वृत्त दिले आहे. परंतु सैन्य, वाहने अजूनही या भागामध्ये आहेत. या सर्व परिस्थितीवर भारतीय सैन्याचे बारीक लक्ष आहे. संपूर्ण पूर्व लडाखमध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत जशाप्रकारे स्थिती होती, तीच स्थिती कायम करण्याची भारताची मागणी आहे. ... Read More »

राज्यात ४५ पोलिसांना कोरोना

राज्यातील पोलीस खात्यातील आत्तापर्यंत ४५ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यातील ३६ जणांवर कोविड इस्पितळ, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर ९ पोलीस कर्मचारी बरे झाले आहेत. दक्षिण गोव्यातील ३२ पोलीस कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. उत्तर गोव्यात एका पोलिसाला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. तसेच, पोलीस विशेष विभागाने ३, एटीएस विभागाचा १, एससीआरबी विभाग ... Read More »

पु. शि. नार्वेकर, भेंब्रे व देवदत पाटील यांना पुरस्कार

गोवा सरकारचे भाषा पुरस्कार जाहीर झाले असून मराठी साठीचा बा द सातोस्कर भाषा पुरस्कार पु. शि. नार्वेकर यांना,कोकणी साठीचा रवींद्र केळेकर भाषा पुरस्कार उदय भेंब्रे यांना तर संस्कृत साठीचा दुर्गाराम उपाध्ये पुरस्कार देवदत पाटील यांता जाहीर झाला आहे.डॉ सोमनाथ कोमरपंत, दामोदर मावजो व लक्षण पित्रे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रत्येकी एक लाख रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे ... Read More »

अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडची जागा धोक्यात

>> आर्चर, वूडच्या वेगाला मिळू शकते झुकते माप इंग्लंडचा अनुभवी जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाबाहेर बसवले जाण्याची शक्यता आहे. बुधवारपासून हा कसोटी सामना खेळविला जाणार आहे. जोफ्रा आर्चर व मार्क वूड या वेगवान गोलंदाजांना जेम्स अँडरसनच्या जोडीला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलद मध्यमगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्यासह अष्टपैलू ख्रिस वोक्स यालादेखील संघात ... Read More »

कुशल मेंडीसची जामिनावर सुटका

पानादुरा शहरात अतिवेगाने गाडी चालवताना एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याने मृत्यूस कारणीभूत ठरल्याने अटक करण्यात आलेला श्रीलंकन क्रिकेट संघाचा नियमित सदस्य कुशल मेंडीसची काल न्यायालयाने जामिनावर सुटका केली.कुशल हा श्रीलंकेचा यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्याला सायकलवरून जाणार्‍या एका ६४ वर्षीय वृद्ध व्यक्तीला आपल्या कारखाली चिरडल्याने कोलंबो पोलिसांनी रविवारी अटक केली होती. कुशलच्या गाडीखाली चिरडला गेल्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीस तात्काळ इस्पितळात दाखल करण्यात आले ... Read More »

आरोग्याची त्रिसूत्री  आहार- विहार- उपचार

– डॉ. मनाली म. पवार (पणजी) आपली प्रतिकारशक्ती चांगली असल्यास कोणताही व्हायरस आपल्या आरोग्याचे नुकसान करू शकत नाही. कोरोनाची भीती नसली तरी सामाजिक अंतर व मास्कचा वापर नियमित केल्यास किंवा प्रशासनाने घातलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास पावसाळ्यातील इतर आजार म्हणा किंवा कोरोना व्हायरसवर आपण सहज मात करू शकतो. सध्या पावसाळा व त्याचबरोबर कोविड-१९ चा अनलॉक काळ सुरू झाला आहे म्हणून ... Read More »

योगसाधना – ४६५ अंतरंग योग – ५१ यम-नियमांचे पालन आवश्यक

 डॉ. सीताकांत घाणेकर मानवाने सृष्टीमध्ये वावरताना कसलीही बंधने पाळली नाहीत. फक्त तो इंद्रियसुखाच्या मागे लागला. निसर्गाला त्याने नष्ट केले. योगसाधनेची जी चार मुख्य अंगे आहेत- आहार- विहार- आचार- विचार… यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला नाही. मग पालन कुठून होणार? विश्‍वात अनेक राष्ट्रे- राज्ये आहेत. इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकला की लक्षात येते की विविध राजांच्या राजवटी दीर्घकाळ टिकल्या नाहीत- मग ते राजे चांगले ... Read More »

पौगंडावस्थेतील समस्यांवर उपाय

 वैद्य स्वाती हे. अणवेकर (म्हापसा) मुलांशी कायम मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे म्हणजे मुलं आपल्यापासून काहीच लपवून ठेवत नाहीत. तसेच त्यांना जर मोबाइल, इंटरनेटच्या व्यसनांपासून लांब ठेवायचे असल्यास त्यांना मैदानी खेळ, संगीत, चित्रकला… अशा क्षेत्रात भाग घ्यायला प्रोत्साहित करावे. त्यांना वाचन व लिखाणाची आवड जोपासायला लावावी. पौगंडावस्थेतील समस्यांवर आपण मागील काही लेखांमधून प्रकाश टाकला. आता या समस्यांवर उपाय म्हणून आपण कोणकोणती काळजी ... Read More »

‘ऍलर्जी’ म्हणजे काय?

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर (श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) काही त्रास हे आनुवंशिक असतात. त्यांची चिकित्सा करणे खूपच अवघड जाते. जेथे आपल्याला वाटते की अमुक गोष्टींमुळे आपल्याला किंवा इतरांना त्रास होतोय, त्या गोष्टी त्वरित थांबवाव्यात. प्रत्येक गोष्ट ही सर्वानाच चालून जाईल, उपयोगी पडेल असे नाही होत. त्यांचे दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात. ऍलर्जी म्हणजे काही विशिष्ट प्रकारच्या गोष्टी/अन्नांबाबत अहितकारक प्रतिक्रिया निर्माण करणारी शरीराची आरोग्यविषयक ... Read More »